agriculture news in marathi Agriculture department taking initiative for locust control : agri minister Bhuse | Page 2 ||| Agrowon

टोळधाड निर्मूलनासाठी कृषी विभागाचा पुढाकार : कृषिमंत्री भुसे

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 29 मे 2020

महाराष्ट्रात चार दिवसांपूर्वी टोळधाड आलेली आहे. राज्यभर ही कीड वाढण्याधीच संपण्याचा कृषी विभागाचा प्रयत्न आहे. शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी कृषी विभाग घेत असल्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी सांगितले. 

नगर : महाराष्ट्रात चार दिवसांपूर्वी टोळधाड आलेली आहे. राज्यभर ही कीड वाढण्याधीच संपण्याचा कृषी विभागाचा प्रयत्न आहे. त्यासाठी रात्री कृषी विभागाकडून कीटकनाशकांची फवारणी करून कीड वाढण्याआधीच संपवण्याला यश येईल. शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी कृषी विभाग घेत असल्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी सांगितले. 

खरीप आढावा बैठकीसाठी नगरला आल्यानंतर ‘ॲग्रोवन’ शी बोलताना कृषिमंत्री दादा भुसे म्हणाले, ‘‘अमरावती जिल्ह्याच्या काही गावांत २४ मे रोजी टोळधाड आलेली असून ती वाऱ्याच्या दिशेने पुढे सरकत आहे. ही कीड दिवसा प्रवास करते. लाखोंच्या संख्येने असलेली ही कीड शेतकऱ्यांचे नुकसान करत आहे. त्याबाबत स्थानिक शेतकऱ्यांच्या अहवाल आल्यानंतर त्याच रात्री कृषी विभागाने त्यावर उपाययोजना सुरू केल्या आहेत.

दिवसा मोठा आवाज करून त्या किडींना हाकलून दिले जात आहे. रात्री या किडीची थवा जेथे थांबत आहे तेथे कृषी विभागाचे कर्मचारी कीटकनाशकांची फवारणी करत आहे. त्यासाठी लागणारे कीटकनाशके विभागाकडून उपलब्ध करून दिले जात आहे. मोठ्या झाडांवर हे कीटक थांबले आहेत, तेथे अग्निशामक दलाच्या गाडीतून तर फवारणी केली जाते. या किडीची वाढ होण्याआधीच ती संपवण्याचा कृषी विभागाचा प्रयत्न आहे आणि त्याला नक्की यश येऊन शेतकऱ्यांचे नुकसान टळले असे भुसे म्हणाले. मी त्याबाबत सातत्याने आढावा घेत असल्याचे भुसे म्हणाले. 


इतर बातम्या
सीईटीऐवजी गुणांद्वारे कृषी...अमरावती ः बारावीनंतर कृषी अभ्यासक्रमाला...
वीजबिले माफ न केल्यास कंपनीचे कार्यालय...बुलडाणा ः लॉकडाउनच्या काळातील तीन महिन्यांचे...
सत्तास्थापनेसाठी भाजपकडूनच विचारणा केली...मुंबई : सहा महिन्यांपूर्वी राज्यात सत्तास्थापन...
वऱ्हाडात दूधाचे दर स्थिरअकोला ः या भागातील दूध संघ डबघाईस आल्याने दूध...
वाशीम जिल्ह्यावर खरिपात पावसाची कृपावाशीम ः जिल्ह्यात यंदाच्या मोसमात आत्तापर्यंत...
वर्धा जिल्ह्यात दूध उत्पादकांना दराचा...नागपूर ः लॉकडाउनमुळे मागणी घटल्याचे सांगत खासगी...
नाशिकमध्ये कमी दूध दरामुळे उत्पादकांची...नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार...
वीज बिले माफ न केल्यास उद्रेक ः...नाशिक : लॉकडाऊन काळात वीज कंपन्यांनी घरगुती वीज...
एचटीबीटी कपाशीची शेतकऱ्यांकडून पाहणीअकोला ः शेतकऱ्यांना तंत्रज्ञान स्वातंत्र्य मिळावे...
दुर्मीळ निलमणी आमरीचे सातपुड्यात...जळगाव ः जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगा या अनेक...
दूध पावडरला प्रतिकिलो ५० रुपये अनुदान...इस्लामपूर, जि. सांगली ः कोरोना सारख्या साथीत...
भ्रष्टाचाराच्या चौकशीचे आदेश;तरीही चार...पुणे: पंतप्रधान पॅकेजमधून राबविण्यात आलेल्या...
अकोला जिल्ह्यात सोयाबीन उगवणशक्तीबाबत...अकोला ः  सोयाबीन पिकाची पेरणी जुलैच्या...
अन्नधान्य पिकांच्या योजनांसाठी २७ कोटीपुणे: राज्यातील अन्नधान्य पिकांच्या योजनांसाठी...
ग्लायफोसेट वापराच्या मसुद्याविरुद्ध दाद...पुणे: केंद्र सरकारने ग्लायफोसेट तणनाशकाच्या...
सोयाबीन बियाणे कंपन्यांवर राज्यात ४६...औरंगाबाद ः सोयाबीनच्या बोगस बियाण्यामुळे पिकाची...
दूध व्यवसाय झाला आतबट्ट्याचा; शेतकरी...पुणेः मागील काही वर्षांपासून संकटात असलेल्या दूध...
राज्यात पाऊस जोर धरण्याची शक्यता पुणे : मॉन्सून सक्रिय होण्याचा पोषक हवामान होत...
विश्वजित माने प्रभारी कृषी आयुक्तपुणे : राज्याचे कृषी आयुक्त सुहास दिवसे यांची...
कोल्हापुरात आज घरगुती वीज बिलांची होळी ...कोल्हापूर  : दिल्ली सरकारने शंभर...