agriculture news in Marathi, agriculture department transfer by counseling, Maharashtra | Agrowon

कृषी विभागाच्या बदल्या यंदाही समुपदेशनाने

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 21 मे 2019

पुणे : कृषी विभागातील बदल्यांचा घोडेबाजार यंदादेखील टळण्याची शक्यता आहे. कृषी आयुक्तालयाने समुपदेशन पद्धतीने बदल्या करण्याबाबत तयारी पूर्ण केली असली, तरी निवडणूक आचारसंहितेमुळे तूर्त वेळापत्रक जाहीर झालेले नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

कृषी विभागात वर्षानुवर्षे सोनेरी टोळीकडून मलिदा लाटून बदल्या केल्या जात होत्या. अनेक तक्रारी होऊनही या समस्येवर उपाय सापडला नव्हता. मात्र, तत्कालीन कृषी आयुक्त सच्चिंद्र प्रताप सिंह यांनी गेल्या हंगामात बदल्या करताना समुपदेशन पद्धतीतून प्रथमच घोडेबाजार रोखला होता.

पुणे : कृषी विभागातील बदल्यांचा घोडेबाजार यंदादेखील टळण्याची शक्यता आहे. कृषी आयुक्तालयाने समुपदेशन पद्धतीने बदल्या करण्याबाबत तयारी पूर्ण केली असली, तरी निवडणूक आचारसंहितेमुळे तूर्त वेळापत्रक जाहीर झालेले नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

कृषी विभागात वर्षानुवर्षे सोनेरी टोळीकडून मलिदा लाटून बदल्या केल्या जात होत्या. अनेक तक्रारी होऊनही या समस्येवर उपाय सापडला नव्हता. मात्र, तत्कालीन कृषी आयुक्त सच्चिंद्र प्रताप सिंह यांनी गेल्या हंगामात बदल्या करताना समुपदेशन पद्धतीतून प्रथमच घोडेबाजार रोखला होता.

“समुपदेश बदल्यांची मूळ संकल्पना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आहे. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेमुळे सर्व खात्यांमधील बदल्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी समुपदेशन धोरण लागू केले. त्यामुळेच गेल्या हंगामात कृषी विभागात प्रथमच ‘देवघेव’ न होता बदल्या झाल्या,’’ अशी माहिती सूत्रांनी दिली.

राज्यातील कृषी कर्मचाऱ्यांचे लक्ष आता समुपदेशान फेऱ्यांच्या वेळापत्रकाकडे लागून आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, कृषी आयुक्त सुहास दिवसे यांच्याकडून समुपदेशन प्रक्रियेद्वारे ३१ मेपूर्वी बदल्या केल्या जाणार आहेत. त्यात गट ‘ब’मधील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा समावेश आहे. तसेच, कृषी सहसंचालकांकडून समुपदेशाने गट क कर्मचाऱ्यांच्या बदल्या होतील. 

“कृषी विभागातील चांगल्या कर्मचाऱ्यांची समुपदेश पद्धतीमुळे घोडेबाजारातून सुटका झाली आहे. तरीही काही मोक्याची पदे किंवा विशिष्ठ्य भौगोलिक क्षेत्रात पद मिळण्यासाठी थेट मंत्रालयातून ‘जॅक’ लावणारे अधिकारी बरेच आहेत. गेल्या हंगामात आयुक्तांनी बदल्या करूनदेखील अनेक कर्मचारी आयुक्तालयाचे आदेश झुगारून खुर्च्यांना चिकटून बसले,” असेही सूत्रांनी स्पष्ट केले. 

टेबल किंवा कक्ष बदलून ‘बदली’चे सोपस्कार
राज्यात ‘महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांचे बदल्यांचे विनियम आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम २००५’ असा कायदा लागू आहे. त्यानुसार, सहा वर्षांनंतर बदल्या केल्या जात होत्या. मात्र, नव्या धोरणानुसार तीन वर्षांत बदल्या होत आहेत. ‘बदली’ याचा अर्थ, शासकीय कर्मचाऱ्याची एका पदावरून किंवा एका कार्यालयातून किंवा एका विभागातून दुसऱ्या पदावर दुसऱ्या कार्यालयात किंवा दुसऱ्या विभागात होणारी पदस्थापना, असा आहे. मात्र, कृषी खात्यातील काही भ्रष्ट अधिकारी या संधीचा सोईस्कर फायदा घेत आहेत. आयुक्तालयापासून ते तालुका कार्यालयात फक्त एका विभागातून दुसऱ्या विभागात ‘समन्वया’ने बदल्या करून घेतल्या जातात. अनेक अधिकारी मलईदार जागा हेरून आयुक्तालयात, सहसंचालक किंवा एसएओ कार्यालयात वेटोळे घालून बसतात, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

 


इतर अॅग्रो विशेष
धानासाठी क्विंटलला पाचशे रुपये अनुदानमुंबई: राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा...
‘पीजीआर’ला मान्यतेचा मार्ग मोकळापुणे ः देशभरात शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या बिगर...
इथेनॉलसाठी मान्यता; पण प्रकल्पांसाठी...पुणे  : थेट साखरेपासून इथेनॉल तयार करण्यास...
उत्कृष्ट व्यवस्थापनातून पपईत मिळवली ओळखनंदुरबार जिल्ह्यात धमडाई येथील सुभाष व प्रनील या...
उद्या तुरळक ठिकाणी पावसाची शक्यतापुणे ः बंगाल उपसागराच्या आग्नेय भागात कमी दाबाचे...
परिश्रमपूर्वक व्यवस्थापनातून...पुणे जिल्ह्यातील रिहे येथील सुनील शिंदे...
किरकोळ व्यापाऱ्यांकरिता कांदासाठा...मुंबई ः देशात कांद्याचे उत्पादन घटल्याने...
सर्वाधिक दर मोजक्याच कांद्यालानगर ः वाढलेल्या कांदादराचा गेल्या महिनाभरापासून...
पशुखाद्य दर गगणाला भिडलेसांगली ः दुष्काळ व अतिवृष्टीचा फटका पशुखाद्य...
शेवंतीचे तीन वाण लवकरच पुणेः शेतकऱ्यांना शेवंतीच्या पांरपरिक वाणांना...
उत्तर प्रदेशात ‘एसएपी’त बदल नाहीनवी दिल्ली: उत्तर प्रदेश सरकारने सलग दुसऱ्या...
उसाचे ३८ गुंठ्यांत तब्बल १४७ टन उत्पादनकोल्हापूर जिल्ह्यातील कवठेगुलंद (ता. शिरोळ) येथील...
कमी कालावधीचा दोडका देतोय चांगला नफागेल्या दोन, तीन महिन्यांत झालेल्या पावसामुळे पुणे...
तापमानात चढ-उतारपुणे ः अरबी समुद्राच्या आग्नेय भागात असलेले कमी...
जीवघेणा बाजारदेशात बोगस, भेसळयुक्त, अनधिकृत कीडनाशकांचा वापर...
मत्स्यदुष्काळ का जाहीर होत नाही?शासनाचे मत्स्यदुष्काळाबाबतचे धोरण अत्यंत चुकीचे...
धुळे ९.४ अंश; थंडीत हळूहळू वाढपुणे ः आकाश निरभ्र झाल्याने थंडीत हळूहळू वाढ होऊ...
साईप्रवरा शेतकरी कंपनीची उलाढाल पोचली...नगर जिल्ह्यातील चिंचोली (ता. राहुरी) परिसरातील...
उन्हाळी नाचणी लागवडीचा यशस्वी प्रयोगकोल्हापूर : राज्यात उन्हाळी नाचणीचे यशस्वी...
बाजारात रानमेवा खातोय भावअकोला ः गुलाबी थंडीची चाहूल लागताच बाजारात विविध...