बदल्यांचा धूमधडाका सुरूच

बदल्यांचा धूमधडाका सुरूच
बदल्यांचा धूमधडाका सुरूच

पुणे : राज्यात खरीप हंगाम शेवटच्या टप्प्यात असताना बदल्यांचा धडका सुरूच आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा ‘सेकंड लॉट’ बाहेर पडला आहे. बदल्यांबाबत वाद झाल्यास संपूर्ण यादीवर न्यायालयीन स्थगिती येते. त्यामुळे बदलीपात्र अधिकाऱ्यांची यादी न करता वेगवेगळे आदेश काढण्याची पद्धत या वेळी देखील चालू ठेवण्यात आली आहे.

लातूर जेडीए (कृषी सहसंचालक) कार्यालयातील एसएओ (अधीक्षक कृषी अधिकारी) दत्तात्रय मुळे यांची बदली झाली आहे. त्यांना आता बीड आत्माच्या प्रकल्प संचालकपदी नेमण्यात आले आहे. उस्मानाबाद एसएओ कार्यालयातील उपसंचालक आता लातूर झेडपीत एडीओ (जिल्हा कृषी विकास अधिकारी) बनले आहेत. बीडच्या अंबाजोगाईचे उपविभागीय कृषी अधिकारी राजकुमार मोरे यांना लातूर एसएओ कार्यालयात उपसंचालकपद मिळाले आहे. लातूर आत्माच्या उपसंचालकपदी आता हिंगोली झेडपीचे एडीओ रवींद्र पाटील यांची नियुक्ती झाली आहे. राज्यात मक्यावर लष्करी अळीने धुडघूस घातलेला आहे. अशा वेळी पीक संरक्षण उपसंचालक म्हणून महत्त्वाची भूमिका बजावणारे रामचंद्र लोकरे यांची मृदसंधारण विभागात बदली करण्यात आली आहे. गुणनियंत्रण व मृदसंधारण विभागात बदलीसाठी अधिकाऱ्यांमध्ये प्रचंड रेटारेटी असते. 

सांगलीचे एसएओ राजेंद्र साबळे यांना पुणे आत्माचे प्रकल्प संचालकपद मिळाले आहे. सांगली आत्माचे प्रकल्प संचालक शिवाजी शेळके आता कोल्हापूरच्या जेडीए कार्यालयातील एसएओ बनले आहेत. सांगलीसाठी कोण नवा एसएओ मिळतो याबाबत उत्सुकता होती. या पदासाठी आता सिंधुदुर्गचे एसएओ बसवराज मास्तोळी यांची निवड केली गेली आहे. तसेच, सांगलीच्या आत्मा उपसंचालकपदी कृषी आयुक्तालयाच्या गळीत धान्य विभागाचे उपसंचालक प्रभाकर पाटील यांची नियुक्ती झाली आहे. रायगड आत्माचे प्रकल्प उपसंचालकपदी मदन मुकणे याच पदावर आता सोलापूरला काम बघतील. विधानसभा अध्यक्षांकडे जनसंपर्क अधिकारी म्हणून काम बघणारे उपसंचालक राजेश्वर पाटील आता रायगडला आत्मा उपसंचालक म्हणून कामकाज सांभाळणार आहेत. 

कोल्हापूर जेडीए कार्यालयातील एसएओ उमेश पाटील यांची नियुक्ती आता कोल्हापूर रामेतीच्या प्राचार्यपदी झाली आहे. तर, आधीच्या प्राचार्या सुनंदा कुराडे यांना कोल्हापूर आत्माचे प्रकल्प संचालकपद मिळाले आहे. पालघर झेडपीचे एडीओ कुंडलिक कारखिले यांना कृषी आयुक्तालयात उपसंचालकपदी नियुक्त केले गेले आहे. मात्र, हे उपसंचालकपद कोणते हे गुलदस्तात आहे. कृषी आयुक्तालयातील आणखी एका रिक्त उपसंचालकपदी शिरीषकुमार जाधव यांची नियुक्ती झाली आहे. जाधव हे रत्नागिरीच्या एसएओ कार्यालयात उपसंचालक होते. सातारा आत्माचे प्रकल्प उपसंचालक विजयकुमार राऊत आता सातारा एसएओ कार्यालयात उपसंचालक म्हणून कामकाज सांभाळणार आहेत. अकोल्याच्या जिल्हा बीज प्रमाणीकरण अधिकारी वंदना केंद्रे आता अकोला जिल्हा बीज परीक्षण प्रयोगशाळेत प्रमुख म्हणून काम सांभाळणार आहेत. अकोटचे उपविभागीय कृषी अधिकारी बालाजी किरवले यांना लातूर आत्माचे प्रकल्प उपसंचालकपद मिळाले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com