सोलापुरात कृषी विभाग शेतकऱ्यांना देणार अवजारे

सोलापुरात कृषी विभाग शेतकऱ्यांना देणार अवजारे
सोलापुरात कृषी विभाग शेतकऱ्यांना देणार अवजारे

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या कृषी समितीने लाभार्थ्यांना ट्रॅक्‍टरसाठी पैसे देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आता ट्रॅक्‍टरऐवजी इतर कृषी अवजारे देण्यासाठी पैसे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती उपाध्यक्ष शिवानंद पाटील यांनी दिली. दरम्यान, स्पर्धा परीक्षेसाठी प्रत्येक तालुक्‍यात अभ्यासिका उभारण्याचा निर्णयही घेण्यात आला.

जिल्हा परिषदेत उपाध्यक्ष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विषय समिती सभापतींची बैठक झाली. समाजकल्याण समितीच्या सभापती शीला शिवशरण, अर्थ व बांधकाम समिती सभापती विजयराज डोंगरे, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती रजनी देशमुख, पक्षनेते आनंद तानवडे यांच्यासह वसंत देशमुख, मदन दराडे, अरुण तोडकर उपस्थित होते.

मागील सर्वसाधारण सभेत सदस्यांनी बजेट सभा घेण्याची मागणी केली. परंतु, लोकसभा निवडणूक आचारसंहितेमुळे प्रशासनाने बजेट मांडले. त्यामुळे पुन्हा बजेट सभा घेण्याची आवश्‍यकता नसल्याचे अध्यक्ष संजय शिंदे यांनी जाहीर केले होते. परंतु, सदस्यांनी आपल्या सूचना मांडाव्यात, असे सुचविले होते.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा अभ्यास करण्यासाठी तालुकास्तरावर अभ्यासिका केंद्र सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी समाजकल्याण विभागाकडून ३५ लाख रुपये निधीची तरतूद केली आहे. यातून दर्जेदार आणि स्पर्धा परीक्षेला पूरक पुस्तके उपलब्ध करून दिली जातील. समाजकल्याण विभागाकडून अपंगांना घरकुलासाठी एक लाख २० हजार रुपयांच्या निधीची तरतूद केली होती. आता घरकुलासाठी राखीव असलेल्या निधीतून चार शेळी, एक बोकड देण्याचा निर्णय घेण्यात आला.चा

लू वर्षी जिल्हा परिषदेच्या सेस उत्पनात घट झाली आहे. मागील वर्षी जिल्हा परिषदेचे ४६ कोटी ६५ लाख रुपयांचे बजेट होते. परंतु, सुमारे तीन कोटी उत्पन्न घटले आहे. यंदाच्या आर्थिक वर्षासाठी ४३ कोटी ८५ लाख रुपये बजेट आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पुस्तके उपलब्ध व्हावीत, यासाठी सुमारे ३५ लाख निधी देण्यात येईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com