कृषी खात्याची मदार ‘ऑनलाइन’वर

कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या बिकट स्थितीतही कृषी विभागाचे कामकाज विस्कळित होणार नाही, याची दक्षता कृषी आयुक्त सुहास दिवसे यांच्याकडून घेतली जात आहे.
agriculture department
agriculture department

पुणे: कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या बिकट स्थितीतही कृषी विभागाचे कामकाज विस्कळित होणार नाही, याची दक्षता कृषी आयुक्त सुहास दिवसे यांच्याकडून घेतली जात आहे. राज्यभरातील कृषीविषयक कामकाजावर आता व्हिडिओ कॉन्फ्रसिंग, व्हॉटस्ॲप; तसेच ऑनलाइन सुविधांचा आधार घेतला जात आहे. बहुतेक शासकीय कार्यालयांमध्ये शुकशुकाट असला, तरी कृषी आयुक्तालयामध्ये आयुक्तांकडून रोज नियमित कामकाज केले जात आहे. ‘बैठका किंवा दौरे रद्द करण्यात आले असले तरी आयुक्त स्वतः व्हिडिओ कॉन्फ्रसिंगवरून नियोजनाचा आढावा घेतात. काही विषयांमध्ये संचालक कार्यालयांशी संपर्क साधून विषय मार्गी लावले जात आहेत. अधिकाऱ्यांना व्हॉटस्ॲपवरून नियमित अपडेटस्, सूचना आणि नेमून दिलेल्या कामांचा आढावादेखील घेत आहेत,’ अशी माहिती सूत्रांनी दिली.  कोरोनामुळे सरकारी कार्यालये किंवा मंत्रालयात कृषी किंवा संलग्न विभागातील कामे आता पिछाडीवर गेली आहेत. वित्त विभाग किंवा मुख्यमंत्री कार्यालयाकडून आता आरोग्य विभाग; तसेच महसूल विभागाशी संबंधित विषयांना प्राधान्य दिले जात आहे. एरवी मार्च महिन्यात कृषी विभागात ‘मार्च एन्ड’ची धावपळ चालू असते. विविध योजनांचा आढावा, नव्या योजनांचे नियोजन आणि हाती असलेला कोट्यवधी रुपयांचा निधी पडून न राहाता ३१ मार्चच्या आत खर्ची टाकण्याकडे अधिकाऱ्यांचा कल असतो.   मार्च एन्डच्या अनुषंगाने योजना व खर्चाच्या नियोजनाला सध्यादेखील प्राध्यान्य दिले जात आहे. मात्र, पुढील हंगामाच्या नियोजनाला यंदा पुरेसा वेळ मिळणार नसल्याचे जाणवते.  एप्रिल महिन्यात एरवी राज्यभर खरीप नियोजनाच्या बैठका; तसेच मुख्यमंत्र्यांकडे खरीप हंगाम नियोजनाची बैठक घेतली जाते. सध्या सर्व जण कोरोनाचा मुकाबला करण्यात गुंतलेले असल्यामुळे कृषीविषयक नियोजनासाठी एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत वाट पहावी लागेल, असे सूत्रांनी स्पष्ट केले. भविष्यात अडचणी येतील कोरोनामुळे कृषी उद्योगाशी संबंधित खते, बियाणे किंवा कीडनाशके कंपन्यांना नेमक्या कोणत्या समस्या उद्भवत आहेत किंवा भविष्यात कोणते प्रश्न उभे राहतील, याचा अंदाज कृषी विभागाला आलेला नाही. राज्यात खताचा मुबलक साठा आहे. बियाणे किंवा कीटकनाशकांबाबत अडचणी असल्याची ओरड अद्याप तरी आलेली नाही. तथापि, जागतिक पातळीवर कोरोना आटोक्यात न आल्यास चीन किंवा युरोपातून येणारा कच्चा माल व काही आयात उत्पादनांच्या अनुषंगाने भविष्यात अडचणी येवू शकतात, अशी भीती एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने व्यक्त केली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com