agriculture news in Marathi agriculture department work on online Maharashtra | Page 2 ||| Agrowon

कृषी खात्याची मदार ‘ऑनलाइन’वर

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 24 मार्च 2020

कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या बिकट स्थितीतही कृषी विभागाचे कामकाज विस्कळित होणार नाही, याची दक्षता कृषी आयुक्त सुहास दिवसे यांच्याकडून घेतली जात आहे.

पुणे: कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या बिकट स्थितीतही कृषी विभागाचे कामकाज विस्कळित होणार नाही, याची दक्षता कृषी आयुक्त सुहास दिवसे यांच्याकडून घेतली जात आहे. राज्यभरातील कृषीविषयक कामकाजावर आता व्हिडिओ कॉन्फ्रसिंग, व्हॉटस्ॲप; तसेच ऑनलाइन सुविधांचा आधार घेतला जात आहे.

बहुतेक शासकीय कार्यालयांमध्ये शुकशुकाट असला, तरी कृषी आयुक्तालयामध्ये आयुक्तांकडून रोज नियमित कामकाज केले जात आहे. ‘बैठका किंवा दौरे रद्द करण्यात आले असले तरी आयुक्त स्वतः व्हिडिओ कॉन्फ्रसिंगवरून नियोजनाचा आढावा घेतात. काही विषयांमध्ये संचालक कार्यालयांशी संपर्क साधून विषय मार्गी लावले जात आहेत. अधिकाऱ्यांना व्हॉटस्ॲपवरून नियमित अपडेटस्, सूचना आणि नेमून दिलेल्या कामांचा आढावादेखील घेत आहेत,’ अशी माहिती सूत्रांनी दिली. 

कोरोनामुळे सरकारी कार्यालये किंवा मंत्रालयात कृषी किंवा संलग्न विभागातील कामे आता पिछाडीवर गेली आहेत. वित्त विभाग किंवा मुख्यमंत्री कार्यालयाकडून आता आरोग्य विभाग; तसेच महसूल विभागाशी संबंधित विषयांना प्राधान्य दिले जात आहे. एरवी मार्च महिन्यात कृषी विभागात ‘मार्च एन्ड’ची धावपळ चालू असते. विविध योजनांचा आढावा, नव्या योजनांचे नियोजन आणि हाती असलेला कोट्यवधी रुपयांचा निधी पडून न राहाता ३१ मार्चच्या आत खर्ची टाकण्याकडे अधिकाऱ्यांचा कल असतो.
 
मार्च एन्डच्या अनुषंगाने योजना व खर्चाच्या नियोजनाला सध्यादेखील प्राध्यान्य दिले जात आहे. मात्र, पुढील हंगामाच्या नियोजनाला यंदा पुरेसा वेळ मिळणार नसल्याचे जाणवते. 
एप्रिल महिन्यात एरवी राज्यभर खरीप नियोजनाच्या बैठका; तसेच मुख्यमंत्र्यांकडे खरीप हंगाम नियोजनाची बैठक घेतली जाते. सध्या सर्व जण कोरोनाचा मुकाबला करण्यात गुंतलेले असल्यामुळे कृषीविषयक नियोजनासाठी एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत वाट पहावी लागेल, असे सूत्रांनी स्पष्ट केले.

भविष्यात अडचणी येतील
कोरोनामुळे कृषी उद्योगाशी संबंधित खते, बियाणे किंवा कीडनाशके कंपन्यांना नेमक्या कोणत्या समस्या उद्भवत आहेत किंवा भविष्यात कोणते प्रश्न उभे राहतील, याचा अंदाज कृषी विभागाला आलेला नाही. राज्यात खताचा मुबलक साठा आहे. बियाणे किंवा कीटकनाशकांबाबत अडचणी असल्याची ओरड अद्याप तरी आलेली नाही. तथापि, जागतिक पातळीवर कोरोना आटोक्यात न आल्यास चीन किंवा युरोपातून येणारा कच्चा माल व काही आयात उत्पादनांच्या अनुषंगाने भविष्यात अडचणी येवू शकतात, अशी भीती एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने व्यक्त केली. 


इतर अॅग्रो विशेष
`अमूल`कडून शेतकऱ्यांना मंदीतही २००...पुणे : राज्यातील डेअरी उद्योग सध्या अतिशय बिकट...
राज्यात कोरोना रुग्णसंख्या ७४८;...मुंबई : राज्यातील कोरोनाचा विळखा वाढत चालला...
केंद्र सरकारकडून रासायनिक खत अनुदानात...पुणे: ऐन लॉकडाऊनच्या गोंधळात केंद्र सरकारने...
शेतकरी कंपन्यांची संकलन केंद्रे...पुणे:  ‘ई-नाम’ प्रणालीत गेल्या दोन...
कोरोनामुळे हापूस अडचणीत; मुंबई बाजार...मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वाशी...
कोरोनामुळे ‘टोमॅटो बेल्ट’ लॉकडाऊन; पुणे...पुणेः गेल्या काही वर्षात जिल्‍ह्यातील जुन्नर, खेड...
कोल्हापूर कृषी महाविद्यालयाकडून...कोल्हापूर : येथील कोल्हापूर कृषी महाविद्यालयाच्या...
राज्यात उष्ण, दमट हवामानाचा अंदाज;...पुणे : तापमानाचा पारा चाळीशी पार गेल्याने उन्हाचा...
राज्यात आत्तापर्यंत तेरा हजार टन...नगर ः कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर...
प्रयोगशीलतेतून मिळवले आर्थिक स्थैर्यनाशिक जिल्ह्यातील आडगाव येथील शिवाजी शंकर देशमुख...
...शेतकरी मात्र 'फार्म क्वाॅरंटाइन' !सांगली : कोरोनाने सर्वांची झोप उडाली आहे. संपूर्ण...
केसरची चव यंदा दुर्मिळ; संकटांमुळे आंबा...औरंगाबाद: यंदा बहुतांश आंबा बागांना मोजकाच मोहर...
राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या...मुंबई : राज्यात कोरोनाबाधित १४५ नवीन रुग्णांची आज...
दूध भुकटी योजनेसाठी १८७ कोटी मंजूर मुंबई: कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या विपरीत...
फळे, भाजीपाला थेट विक्रीसाठी ...नगर : फळे, भाजीपाला विक्रीसाठी नगर जिल्ह्यामधील...
पहिल्याच दिवशी २६० किलो मोसंबी वाजवी...औरंगाबाद : आधी बागवानाने मागितली तेव्हा दिली नाही...
कृषी उत्पादनांसह निर्धारीत अत्यावश्‍यक...नवी दिल्ली: देशात कोरोना विषाणूचा प्रसार...
समाजविघातक वृत्तींवर कडक कायदेशीर...मुंबई: कृपा करून शिस्त पाळा, सहकार्य करा असे मी...
शेती अवजारे, स्पेअरपार्टस् दुकानांना...नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्रालयाने शुक्रवारी (ता...
मराठवाड्यात आजही वादळी पावसाची शक्यता पुणे: उन्हाचा ताप वाढल्याने सोलापूर, मालेगाव,...