agriculture news in Marathi agriculture exhibition in Aurangabad from 27 December Maharashtra | Agrowon

औरंगाबादेत २७ ते ३० डिसेंबरदरम्यान होणार 'कृषी जागर'

टीम अॅग्रोवन
रविवार, 1 डिसेंबर 2019

पुणे: राज्यातील शेतकऱ्यांना तंत्रज्ञान व माहितीचे पर्वणी ठरणारे ‘सकाळ-ॲग्रोवन’चे भव्य कृषी प्रदर्शन २७ ते ३० डिसेंबरदरम्यान औरंगाबाद येथे होत आहे. ‘सकाळ-ॲग्रोवन’चे कृषी प्रदर्शन म्हणजे शेतकऱ्यांसाठी कृषिविषयक विविधांगी ज्ञानाची शिदोरी समजली जाते. राज्यात असलेल्या तीव्र दुष्काळानंतर, अतिवृष्टी, महापुरामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे. नैसर्गिक आपत्तींच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला धीर देण्याचा प्रयत्नदेखील ‘ॲग्रोवन’कडून प्रदर्शनाच्या निमित्ताने होत आहे. औरंगाबादच्या बीड बायपासजवळील जबिंदा ग्राउंडवर हे प्रदर्शन भरणार आहे. 

पुणे: राज्यातील शेतकऱ्यांना तंत्रज्ञान व माहितीचे पर्वणी ठरणारे ‘सकाळ-ॲग्रोवन’चे भव्य कृषी प्रदर्शन २७ ते ३० डिसेंबरदरम्यान औरंगाबाद येथे होत आहे. ‘सकाळ-ॲग्रोवन’चे कृषी प्रदर्शन म्हणजे शेतकऱ्यांसाठी कृषिविषयक विविधांगी ज्ञानाची शिदोरी समजली जाते. राज्यात असलेल्या तीव्र दुष्काळानंतर, अतिवृष्टी, महापुरामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे. नैसर्गिक आपत्तींच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला धीर देण्याचा प्रयत्नदेखील ‘ॲग्रोवन’कडून प्रदर्शनाच्या निमित्ताने होत आहे. औरंगाबादच्या बीड बायपासजवळील जबिंदा ग्राउंडवर हे प्रदर्शन भरणार आहे. 

कृषी प्रदर्शनासाठी पारस ग्रुप हे मुख्य प्रायोजक आहेत. तर महाफीड फर्टिलायझर्स, एमआयटी कॉलेज (औरंगाबाद), पूर्वा केमटेक आणि महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा) हे सहप्रायोजक आहेत. ‘ॲग्रोवन’कडून यापूर्वी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय प्रदर्शनामुळे हजारो शेतकऱ्यांना शेतीमधील समस्यांशी लढण्याचे बळ मिळाले आहे.

आधुनिक शेतीची तंत्र प्रात्यक्षिकांसह समजण्यास या प्रदर्शनाचा उपयोग होत असल्यामुळे शेतकऱ्यांना ‘ॲग्रोवन’च्या प्रदर्शनानंतर नवे प्रयोग करण्यास प्रोत्साहन मिळते. औरंगाबादच्या कृषी प्रदर्शनात बागायती, कोरडवाहू तसेच संरक्षित शेतीमधील उपायांवर मंथन घडवून आणण्याचा प्रयत्न ‘ॲग्रोवन’चा आहे. शेतकऱ्यांना यानिमित्ताने शास्त्रज्ञ, अभ्यासकांची प्रत्यक्ष भेट होईल. विविध कंपन्यांची उत्पादने तसेच नवतंत्रांची ओळख होणार आहे. 

या प्रदर्शनाला विशेषतः मध्य महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित राहणार आहेत. शासनाचे विविध विभाग, कृषी संशोधन संस्था, बॅंका, कृषी शिक्षण संस्था, बियाणे, खते, कीटकनाशके, अवजारे क्षेत्रातील कंपन्या तसेच ट्रॅक्टर, हार्वेस्टिंग यंत्रे, कापणी यंत्रे, प्रक्रिया उद्योग, पॅकेजिंग, कोल्डस्टोअर उद्योग, ठिबक व तुषार सिंचन, टिश्‍यूकल्चर, ग्रीन हाउस टेक्नॉलॉजी आणि इंप्लिमेंट्स, कृषी साहित्य ग्रेडिंग, वेईंग, सॉर्टिंग आजारे उत्पादन क्षेत्रातील नामवंत कंपन्या या प्रदर्शनात सहभागी होत आहेत. 

स्टॉल बुकिंगसाठी...
राज्यातील हजारो प्रयोगशील शेतकऱ्यांपर्यंत पोचण्याची संधी असलेल्या ‘अॅग्रोवन’च्या या कृषी प्रदर्शनात स्टॉल बुकिंगसाठी इच्छुकांना विलास- ८३९०९०३०५५, दत्ता-९८२२७७११३१, आत्तार- ९९२११९९६६३ यांच्याशी संपर्क साधता येईल.


इतर अॅग्रो विशेष
रेशीम संजीवनीरेशीम उद्योगाचा विस्तार व विकास करण्याच्या...
ऑनलाइन बॅंकिंग करताय, सावधान!आधुनिक युगात विज्ञानामुळे नवनवीन शोधांमुळे मानव...
‘पोकरा’मध्ये अखेर जबाबदाऱ्यांचे विभाजनअकोला ः पोकरा प्रकल्पाच्या अंमलबजावणीत कृषी...
कृत्रिम रेतन नियंत्रण कायदा कधी? पुणे: पशुधनाच्या आरोग्याला घातक असलेली सध्याची...
किमान तापमानात होतेय घटपुणे : गेल्या काही दिवसांपासून गायब झालेली थंडी...
सात-बारा कोरा करण्याची सुबुद्धी सरकारला...पंढरपूर, जि. सोलापूर: विधानसभा...
सरकारी पीकविमा कंपनी हवी : शेतकरी...नागपूर ः खासगी कंपन्या तयार नसतील तर केंद्राने...
साखर कारखान्यांना लवकरच ‘पॅकेज’मुंबई ः राज्यातील आजारी सहकारी साखर कारखान्यांना...
कमी दरात तूर घेऊन विकली हमीभावाने; दोन...यवतमाळ ः गेल्या हंगामात शेतकऱ्यांकडून कमी दरात...
सेंद्रिय भाजीपाल्याला तयार केले ‘...झुलपेवाडी (जि. कोल्हापूर) येथील चिकोत्रा सेंद्रिय...
शेतकरीहितालाच हवे सर्वोच्च प्राधान्यसहकार क्षेत्रात पूर्वीपासूनच काँग्रेस,...
सोशल मीडिया आणि बॅंकिंग जगात आज कोट्यवधी लोक संवाद करणे आणि माहिती...
बीड जिल्ह्यातील चिंचवडगावमध्ये...बीड: थंड प्रदेशात घेतले जाणारे स्ट्रॉबेरीचे...
राज्यातील ५०० कार्यालयांत शेतकरी...मुंबई : शेतकरी बांधवांना अडचणी मांडण्यासाठी,...
ढगाळ हवामानामुळे गारठा कमीचपुणे : उत्तरेकडील थंड वाऱ्यांचा अभाव, ढगाळ...
राज्य खत समितीचा ‘रिमोट’ कोणाकडे?पुणे : शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी ‘...
महारेशीम अभियानांतर्गत पाच हजार एकरची...औरंगाबाद: रेशीम विभागाच्यावतीने राबविल्या जात...
शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी सामूहिक...नाशिक : देशातील कृषी व ऋषी संस्कृतीमध्ये काळ्या...
हार्वेस्टर मालकांकडून ऊस उत्पादकांची...सोलापूर ः ऊसतोडणीसाठी शेतकरी हार्वेस्टर मशिनला...
कुऱ्हा गावाने तयार केली भाजीपाला पिकांत...अमरावती जिल्ह्यातील वरुड, मोर्शी हे तालुके संत्रा...