ज गामधील सर्वांत मोठी यशस्वी लोकशाही असलेला आपला देश आहे.
ताज्या घडामोडी
कृषी पदवीधर तरूणांनी समाजासाठी काम करावे ः राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
नगर : ‘‘देशात प्रामाणिकपणे काम केलेले अनेक शेतकरी आत्मविश्वासाने पुढे गेले आहेत. परदेशातील लाखो रुपयांची नोकरी सोडून समाजासाठी काम करत आहेत. कृषी पदवी घेतलेल्या तरुणांनी आत्मविश्वासाने काम करून समाजासाठी आणि देशासाठी एक उदाहरण बनावे,’’ असे मत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केले.
नगर : ‘‘देशात प्रामाणिकपणे काम केलेले अनेक शेतकरी आत्मविश्वासाने पुढे गेले आहेत. परदेशातील लाखो रुपयांची नोकरी सोडून समाजासाठी काम करत आहेत. कृषी पदवी घेतलेल्या तरुणांनी आत्मविश्वासाने काम करून समाजासाठी आणि देशासाठी एक उदाहरण बनावे,’’ असे मत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केले.
राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठात गुरुवारी (ता. ५) पदवीदान दीक्षान्त समारंभ झाला. कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा, अधिष्ठाता (कृषी) डॉ. अशोक फरांदे, कुलसचिव सोपान कासार, कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. दिलीप पवार, महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष हरिभाऊ जावळे, विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्य आमदार प्रकाश गजभिये, तुषार पवार, नाथाजी चौगुले, सुनीता पाटील, डॉ. पंकजकुमार महाले, संशोधन संचालक तथा विस्तार शिक्षण संचालक डॉ. शरद गडाख आणि विद्या शाखेचे उपकुलसचिव श्री. पी. टी. सूर्यवंशी, माजी कुलगुरू डॉ. किसनराव लवांडे, डॉ. वेंकट मायंदे उपस्थित होते.
या वेळी ५२ विद्यार्थ्यांना पीएच. डी., ३०८ विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवी व ४७०७ विद्यार्थ्यांना पदवी अशा एकूण ५०६७ पदव्या प्रदान करण्यात आल्या. तसेच २०१८-१९ मध्ये बी.एस्सी, (कृषी) पदवीत प्रथम आलेली मोहिनी अशोक जगताप (नाशिक), बी.एस्सी. (उद्यान विद्या) मध्ये प्रथम आलेली गायत्री पांडुरंग चव्हाण (पुणे), कृषी अभियांत्रिकीमध्ये प्रथम आलेला अभिजित राजेंद्र जाधव (कराड) यांना सुवर्णपदक देऊन राज्यपालांच्या हस्ते गौरव करण्यात आला. कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा यांनी विद्यापीठाचा कृषी शिक्षण, संशोधन व विस्तार शिक्षणाचा अहवाल सादर केला.
राज्यपालांनी केले पहिल्यांदाच भाषण
महात्मा फुले कृषी विद्यापीठासह अन्य विद्यापीठात दरवर्षी पदावीदान दीक्षान्त समारंभ होतो. राज्यपाल पदवीदान करतात, तर प्रमुख पाहुणे भाषण करतात. या कार्यक्रमासाठी नियोजित प्रमुख पाहुणे निती आयोगाचे सदस्य रमेश चंद आले नाहीत. त्यामुळे कुलगुरूंनी राज्यपालांना भाषण करण्याची विनंती केली आणि यंदा पहिल्यांदाच राज्यपालांनी थेट भाषण करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले हे राज्यात पहिल्यांदा घडले.
- 1 of 1026
- ››