Agriculture news in Marathi Agriculture graduate youth should work for the community: Governor Bhagat Singh Koshari | Page 3 ||| Agrowon

कृषी पदवीधर तरूणांनी समाजासाठी काम करावे ः राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 6 डिसेंबर 2019

नगर : ‘‘देशात प्रामाणिकपणे काम केलेले अनेक शेतकरी आत्मविश्‍वासाने पुढे गेले आहेत. परदेशातील लाखो रुपयांची नोकरी सोडून समाजासाठी काम करत आहेत. कृषी पदवी घेतलेल्या तरुणांनी आत्मविश्‍वासाने काम करून समाजासाठी आणि देशासाठी एक उदाहरण बनावे,’’ असे मत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केले.

नगर : ‘‘देशात प्रामाणिकपणे काम केलेले अनेक शेतकरी आत्मविश्‍वासाने पुढे गेले आहेत. परदेशातील लाखो रुपयांची नोकरी सोडून समाजासाठी काम करत आहेत. कृषी पदवी घेतलेल्या तरुणांनी आत्मविश्‍वासाने काम करून समाजासाठी आणि देशासाठी एक उदाहरण बनावे,’’ असे मत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केले.

राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठात गुरुवारी (ता. ५) पदवीदान दीक्षान्त समारंभ झाला. कुलगुरू डॉ. के. पी. विश्‍वनाथा, अधिष्ठाता (कृषी) डॉ. अशोक फरांदे, कुलसचिव सोपान कासार, कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. दिलीप पवार, महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष हरिभाऊ जावळे, विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्य आमदार प्रकाश गजभिये, तुषार पवार, नाथाजी चौगुले, सुनीता पाटील, डॉ. पंकजकुमार महाले, संशोधन संचालक तथा विस्तार शिक्षण संचालक डॉ. शरद गडाख आणि विद्या शाखेचे उपकुलसचिव श्री. पी. टी. सूर्यवंशी, माजी कुलगुरू डॉ. किसनराव लवांडे, डॉ. वेंकट मायंदे उपस्थित होते. 

या वेळी ५२ विद्यार्थ्यांना पीएच. डी., ३०८ विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवी व ४७०७ विद्यार्थ्यांना पदवी अशा एकूण ५०६७ पदव्या प्रदान करण्यात आल्या. तसेच २०१८-१९ मध्ये बी.एस्सी, (कृषी) पदवीत प्रथम आलेली मोहिनी अशोक जगताप (नाशिक),  बी.एस्सी. (उद्यान विद्या) मध्ये प्रथम आलेली गायत्री पांडुरंग चव्हाण (पुणे), कृषी अभियांत्रिकीमध्ये प्रथम आलेला अभिजित राजेंद्र जाधव (कराड) यांना सुवर्णपदक देऊन राज्यपालांच्या हस्ते गौरव करण्यात आला. कुलगुरू डॉ. के. पी. विश्‍वनाथा यांनी विद्यापीठाचा कृषी शिक्षण, संशोधन व विस्तार शिक्षणाचा अहवाल सादर केला.  

राज्यपालांनी केले पहिल्यांदाच भाषण 
महात्मा फुले कृषी विद्यापीठासह अन्य विद्यापीठात दरवर्षी पदावीदान दीक्षान्त समारंभ होतो. राज्यपाल पदवीदान करतात, तर प्रमुख पाहुणे भाषण करतात. या कार्यक्रमासाठी नियोजित प्रमुख पाहुणे निती आयोगाचे सदस्य रमेश चंद आले नाहीत. त्यामुळे कुलगुरूंनी राज्यपालांना भाषण करण्याची विनंती केली आणि यंदा पहिल्यांदाच राज्यपालांनी थेट भाषण करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले हे राज्यात पहिल्यांदा घडले.


इतर ताज्या घडामोडी
तापावर गुणकारी गुळवेलजळजळ होणे, बारीक ताप येणे, उष्णता वाढणे या...
सुधारित पद्धतीने करा हळद काढणीसर्वसाधारणपणे जातीपरत्वे हळद काढण्यास ७ ते ९...
अंजीर-सिताफळ संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ...पुणे : महात्मा फुले कृषी विद्यापिठाच्या ...
तोलाई मजुरीसाठी सांगली बाजार समितीच्या...सांगली : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तोलाई...
परभणी जिल्ह्यात सिंचनाची ५० कोटींवर...परभणी : जिल्ह्यातील लघू, मध्यम, मोठ्या...
खानदेशात रब्बी ज्वारी, मक्यावर लष्करी...जळगाव : खानदेशात खरिपात शेतकऱ्यांना फटका बसलेला...
परभणीत गाजर ८०० ते १५०० रुपये...परभणी  : येथील पाथरी रस्त्यावरील फळे...
औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यांत साडेआठ...औरंगाबाद : औरंगाबाद, जालना, बीड या तीन...
अमरावती विभागात सहा लाख ८३ हजार शेतकरी...अमरावती ः महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
एम्प्रेस गार्डनच्या पुष्पप्रदर्शनाला...पुणे ः एम्प्रेस बोटॅनिकल गार्डनच्या वतीने आयोजित...
अकोल्यात भारिप, वाशीममध्ये...अकोला ः जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष...
पुणे जिल्ह्यात उद्या पल्स पोलिओ लसीकरण...पुणे : पोलिओच्या आजाराचे उच्चाटन करण्याच्या...
पत्नीच्या नावे कामकाजासाठी येणाऱ्या...बुलडाणा ः स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना...
पाणी, शेती विकासासह समाजकारणाला...नगर : निवडणुकीत पराभव मी मानत नाही. लोकांचे...
पुणे जिल्ह्यात ज्वारी पिकावर चिकट्याचा...पुणे ः पुणे जिल्ह्याच्या पश्चिम जिरायत भागात...
प्रशासकीय कामकाज सेवा हमी कायद्यानुसार...अकोला ः शासकीय योजनांचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत...
वीज रोहित्र ४८ तासांत बदलून द्या;...अकोला ः वीज रोहित्रांबाबत शेतकऱ्यांच्या असंख्य...
अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना न्याय न...मुंबई ः केंद्र सरकारचे कृषीविषयक धोरण सातत्याने...
पुणे, मुंबई बाजार समितीच्या निवडणुका...पुणे ः उच्च न्यायालयाच्या आदेशाने सुरू असलेल्या...
फडणवीस सरकारच्या टेंडर मॅनेजमेंट...मुंबई ः काँग्रेस पक्षाने २६ ऑगस्ट २०१९ व २९ ऑगस्ट...