agriculture news in Marathi agriculture has devastated by AMPHAN Maharashtra | Agrowon

`अम्फान’चा शेतीला मोठा फटका 

वृत्तसेवा
रविवार, 24 मे 2020

अम्फान चक्रीवादळाने पश्‍चिम बंगालला मोठा तडाखा दिला आहे. राज्यातील २३ पैकी १४ जिल्ह्यातील पिके उध्वस्त झाली आहेत.

कोलकाता: अम्फान चक्रीवादळाने पश्‍चिम बंगालला मोठा तडाखा दिला आहे. राज्यातील २३ पैकी १४ जिल्ह्यातील पिके उध्वस्त झाली आहेत. चक्रीवादळामुळे आतापर्यंतचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. सुरुवातीच्या अंदाजानुसार हुगली जिल्ह्यात ६००कोटी तर बिरभूम जिल्ह्यात ४६२ कोटींचे शेतीचे नुकसान झाले आहे, अशी माहिती पश्‍चिम बंगालचे कृषिमंत्री अशिष बॅनर्जी यांनी दिली. 

अम्फान चक्रीवादळाने पश्‍चिम बंगाल किनारपट्टी भागाला जोरदार तडाखा दिला. या शेती, घरे, पायाभुत सुविधांचे मोठे नुकसान झाले. पुर्व मिदनापूर या किनारपट्टी भागातील जिल्ह्यात ४७ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. तसेच बुरद्वान पुर्व जिल्ह्यातील भात पिकाचे ७० टक्के तर बंकुरा जिल्ह्यात ५० टक्के नुकसान झाले आहे. कृषी विभागा राज्यातील नुकसानीची पाहणी करत आहे. 

कृषिमंत्री बॅनर्जी म्हणाले, ‘‘राज्यातील २३ पैकी १४ जिल्ह्यांना वादळाचा तडाखा बसला आहे. या जिल्ह्यांतील शेतीपिके नष्ट झाली आहेत. नेट कनेक्टिव्हीटी मिळत नसल्याने आम्हाला आतापर्यंत सर्व जिल्ह्यांचा नुकसानीचा अहवाल मिळाला नाही. परंतु प्राथमिक अहवालातून वादळाने केलेल्या विध्वंसाचा अंदाज आला आहे. वादळामुळे आतापर्यंतचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. 

 
पिकांचे मोठे नुकसान 
‘‘पुर्व मिदनापूर जिल्ह्यातील ३० हजार हेक्टरवरील भात पिकाचे, तीळाचे १२ हजार हेकट्र आणि भाजीपाल्याचे ५ हजार हेक्टरवरील नुकसान झाले आहे. तसेच जिल्ह्यातील विड्याच्या पानांनाही मोठा फटका बसला आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याची आशा आहे. बिरभूम जिल्ह्यातील केवळ ३० टक्के भाताची काढणी झाली आहे आणि आता उर्वरित भात पाण्याखाली आहे. बनकुरा जिल्ह्यात जवळपास ५० टक्के भात शेतात भिजून पडला आहे. हा भात दोन ते तीन दिवसांपासून शेतात पाण्याखाली आहे. मुर्शिदाबाद जिल्ह्यात आंबा बागांना फटका बसला आहे. ३० टक्के आंबा फळे गळून पडली आहेत. हावडा जिल्ह्यातील फुलशेती पाण्याखाली गेली आहे,’’ अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. 

वादळामुळे झालेले नुकसान 
- शेती, घरे, पायाभुत सुविधांचे मोठे नुकसान 
- राज्यातील २३ पैकी १४ जिल्ह्यांना वादळाचा तडाखा 
- भात, तीळ, आंबा, भाजीपाला, फुले आदी पिकांना फटका 
- हजारो हेक्टरवरील भात पिक तीन दिवसांपासून पाण्याखाली 
- भात पिकाचे ७० टक्क्यांपर्यंत नुकसान 
- ३० टक्के आंबा फळे गळून पडली 


इतर ताज्या घडामोडी
स्वामीनाथन सूत्रानुसार हमीभाव दिल्याचा...नाशिक: स्वामीनाथन सुत्राप्रमाणे उत्पादन खर्च...
उस्मानाबाद, लातूर, बीडमध्ये पावसाचा जोर औरंगाबाद : मराठवाड्यातील पाच जिल्ह्यात बुधवारी (...
नगरच्या ४० महसूल मंडळांत जोरदार पाऊसनगर : जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी बुधवारी (ता.३)...
परभणी, नांदेड, हिंगोलीत पावसामुळे कापूस...परभणी : परभणी, नांदेड, हिंगोली जिल्ह्यात गेल्या...
बुलडाण्यात पीककर्जाचे ७ टक्केच वाटप बुलडाणा : पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरणीच्या...
कोल्हापूर जिल्ह्यात दिवसभर संततधार...कोल्हापूर : जिल्ह्यात दिवसभर संततधार पाऊस सुरूच...
निसर्ग चक्रीवादळाचा पुणे जिल्ह्याला...पुणे : निसर्ग चक्रीवादळाचा जिल्ह्यालाही फटका...
नाशिकच्या पूर्व भागात वादळामुळे नुकसान नाशिक : जिल्ह्यात बुधवार (ता.३) सकाळपासून सर्वदूर...
सांगली जिल्ह्यात बरसला मुसळधार सांगली : कोकणचे प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या...
विदर्भात सर्वदूर मान्सूनपूर्व पावसाची...नागपूर : विदर्भात सर्वदूर मान्सूनपूर्व पावसाने...
साताऱ्यात वाऱ्यासह मुसळधार पाऊस सातारा : जिल्ह्यात बुधवारी सकाळापासून...
‘निसर्ग’मुळे रत्नागिरी जिल्ह्यात...रत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळाने जिल्ह्यात...
भाटी मिऱ्या समुद्रात नांगरलेली जहाज...चिपळूण, रत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळाचा जोरदार...
जीएम पिकांच्या मान्यतेसाठी केंद्राकडे...नागपूर: जागतिकस्तरावर जीएम पिकांच्या लागवडीस...
विविध मागण्यांसाठी रेशन दुकानदार ...नाशिक: राज्यातील स्वस्त धान्य दुकानदार व...
मका खरेदी तातडीने सुरू कराबुलडाणा ः मोताळा तालुक्‍यात मागील दहा दिवसांपासून...
शेतकऱ्यांना त्रास झाल्यास भाजप आंदोलन...अकोला ः शेतकऱ्यांना बी-बियाणे, कर्जपुरवठा तसेच...
सिंधुदुर्गात पाऊस सुरूच सिंधुदुर्ग: जिल्ह्यात तिसऱ्या दिवशीही...
जादा खरेदी दर, नापासच्या अधिक ...अकोला ः महाबीजने सोयाबीन वाणाच्या प्रमाणित...
ऊस उत्पादक केंद्राचे वैरी आहेत काय? कोल्हापूर: केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलेल्या...