agriculture news in Marathi agriculture inputs industry in trouble due to lockdown Maharashtra | Page 3 ||| Agrowon

लॉकडाऊनमुळे ‘निविष्टा’ कंपन्यांची उधारी अडकली 

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 3 एप्रिल 2020

लॉकडाऊनमुळे राज्यातील खते, बियाणे व कीडनाशक विक्रेत्यांनी आर्थिक वर्षाअखेरील उधारी देण्यास असमर्थता दर्शविली आहे.

पुणे: लॉकडाऊनमुळे राज्यातील खते, बियाणे व कीडनाशक विक्रेत्यांनी आर्थिक वर्षाअखेरील उधारी देण्यास असमर्थता दर्शविली आहे. ‘हिशेब पूर्ण करण्यासाठी किमान तीन महिन्यांची मुदत हवी, असे प्रस्ताव विक्रेत्यांनी विविध कंपन्यांकडे पाठविले आहेत. 

बियाणे, खते, कीटकनाशके अशी ‘निविष्टा’ उत्पादनांची ३५ हजाराहून जादा दुकाने राज्यात असून कोरोनाच्या भीतीने बहुतेक दुकाने बंद आहेत. महाराष्ट्र फर्टिलायझर्स पेस्टिसाईडस् सीडस् असोसिएशन (माफदा) ही समस्या कंपन्यांकडे मांडली आहे. कोटयवधी रुपये अडकून पडल्याने सर्व कंपन्यांच्या व्यवस्थापनाशी माफदाने पत्रव्यवहार सुरू केला आहे. 

‘‘कंपन्यांकडे आमचे कोरे धनादेश, करारपत्रे देखील आहेत. उधारी बुडणार नाही; पण लगेच हिशेब देता देखील येणार नाहीत,” असे विक्रेते सांगत आहेत. तर माफदाच्या म्हणण्यानुसार, रिझर्व्ह बॅंकेने देशभर कर्जाचे हप्ते फेडण्यास तीन महिन्यांची मुदत दिल्याने आम्हाला देखील मानवतावादी हेतूने ३० जूनपर्यंत मुदत मिळायला हवी. तसे माफदाने कंपन्यांना कळविले देखील आहे. 

माफदाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे यांनी सांगितले की, ‘‘कोरोनामुळे राज्यातील शेतकऱ्यांवर मोठे संकट आलेले आहे. विक्रेत्यांकडून बहुतांश उधारीवर इनपुट घेऊन शेतकऱ्यांनी गेला रबी आणि खरीप हंगाम पूर्ण केला आहे. मात्र, सध्या कापूस, सोयाबीन व इतर भुसार पिके किंवा कांदा, द्राक्षासह फळे आणि भाजीपाल्याची बाजार विक्री साखळी विस्कळीत झालेली आहे. शेतकऱ्यांच्या हाती पैसा नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी विक्रेत्यांना उधारी चुकती केलेली नाही. परिणामी विक्रेते, वितरक देखील कंपन्यांना हिशेब देऊ शकत नाहीत.’’ 

लॉकडाऊनमुळे कंपन्यांचे आता हजारो कोटी रुपये अडकून पडलेले आहेत. त्यामुळे कंपन्यांना कठोर भूमिका न घेता आगामी हंगामासाठी पुन्हा विक्रेत्यांना माल द्यावा लागेल, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

वितरकांच्या म्हणण्यानुसार, इनपुट कंपन्यांचे आम्ही १०० टक्के पैसे अडकवून ठेवलेले नाहीत. ‘‘७० ते ८० टक्के वसुली कंपन्यांची यापूर्वीच झालेली आहे. मात्र, वर्षाअखेरीस हिशेब पूर्ण करून उर्वरित २० ते ३० टक्के रक्कम दिली जाते. ही रक्कम सध्या देता येणार नाही. शेतकऱ्यांना उधारी चुकती करण्यासाठी आम्ही अजिबात सक्ती करणार नाही. त्यामुळे कंपन्यांना आमची स्थिती समजावून घ्यावी लागेल,’’ असे वितरकांच्या गोटातून सांगण्यात आले. 

कॅश क्रेडिट वाढवून मागणार 
राज्यातील खते, बियाणे व कीड़नाशके उत्पादनांचे वितरक व विक्रेत्यांना विविध बॅंकांकडून कॅश क्रेडिटची सुविधा दिली जाते. त्या आधारे अनेक विक्रेते विविध कंपन्यांकडून माल उचलतात व शेतकऱ्यांना उधारीवर पुरवितात. लॉकडाऊनमुळे विक्रेत्यांची उधारी अडकली आहे आणि दुसऱ्या हंगामासाठी ऑर्डर द्यायच्या आहेत. अशा स्थितीत इनपुट व्यापार सुरळीत होण्यासाठी कॅश क्रेडिटची सुविधा वाढवून देण्यासाठी विक्रेत्यांकडून बॅंकांकडे पाठपुरावा केला जाणार आहे. 
 


इतर अॅग्रो विशेष
अंदमानात उद्या मॉन्सूनची प्रगती शक्य पुणे: बंगालच्या उपसागरात आलेल्या ‘अम्फान’...
राज्यात कापूस बियाणे विक्रीला प्रारंभ अकोला ः आगामी हंगामासाठी कापूस बियाणे...
मध्यम धाग्याच्या कापूस खरेदीची ...नागपूर ः एफएक्‍यु ग्रेडमधीलच तिसऱ्या दर्जाच्या...
मराठवाडा पाणी परिषदेचे शनिवारी ऑनलाइन...औरंगाबाद: लॉकडाउनमुळे मराठवाडा पाणी परिषदेची...
'ग्रामपंचायतीचा अखर्चित निधी शासनाला...अकोला ः कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सुरु...
टोळधाडीचा अमरावती, वर्ध्यात शिरकावअमरावती ः लॉकडाउनमुळे आधीच अडचणीत असलेल्या...
सव्वा एकरांत सेंद्रिय भाज्यांचा `जगदाळे...कोल्हापूर जिल्ह्यातील नृसिंहवाडी (ता.शिरोळ) येथील...
टोळधाडीचा आठ राज्यांमध्ये धुडगूसपुणेः देशात एरव्ही जून आणि जुलैमध्ये येणाऱ्या...
उष्णतेच्या लाटेने पिके होरपळलीपुणे : राज्यात मराठवाडा, विदर्भासह खानदेशात...
संसर्गाचे थैमान, महाराष्ट्र, तामिळनाडू...नवी दिल्ली : जगातील अन्य देशांसोबतच भारतातही...
सहकारी क्षेत्रातील दुग्ध उद्योगांसमोर...नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनमुळे...
दूध रूपांतर योजनेचे १०० कोटी थकले पुणे: राज्यातील अतिरिक्त दुधाचे खरेदी करून भुकटी...
मॉन्सूनसाठी तयार होतेय पोषकस्थिती...पुणे: बंगालच्या उपसागरात आलेल्या ‘अम्फान’...
राज्यात उन्हाच्या झळा असह्य पुणे: सुर्य तळपू लागल्याने राज्यात उन्हाचा चटका...
नियमित कर्जदारांना द्या ५० हजाराचे...गोंदिया ः कोरोनामुळे प्रभावीत शेतीक्षेत्राला...
शेतकऱ्यांना बांधावरच बी-बियाणे देण्याचा...मुंबईः राज्यात  ५० हजार उद्योग सुरु झाले....
कापसाचा हमीभाव २६० रुपयांनी वाढवा :...नवी दिल्लीः कापसाच्या हमीभावात गेल्या वर्षीच्या...
भेसळयुक्‍त धान बियाणे पुरविणाऱ्या...भंडारा  ः गेल्या हंगामात भेसळयुक्‍त...