कृषी निविष्ठा विक्रेत्यांचा राज्यात बंद सुरूच

कृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या मागण्यांबाबत कार्यवाही होत नसल्याने सुरू असलेला तीन दिवसीय संप शनिवारी (ता ११) दुसऱ्या दिवशीही सुरुच होता.
strike
strike

औरंगाबाद: कृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या मागण्यांबाबत कार्यवाही होत नसल्याने सुरू असलेला तीन दिवसीय संप शनिवारी (ता ११) दुसऱ्या दिवशीही सुरुच होता. मराठवाड्यासह राज्यभरातून या संपाला प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे महाराष्ट्र फर्टिलायझर्स पेस्टिसाइड सीड्स डीलर्स असोसिएशननकडून (माफदा) सांगण्यात आले. बियाणे उगविले नसल्याच्या कारणावरून विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करू नये, यासोबतच विक्रेत्यांकडून तपासणीसाठी बियाणे नमुन्याची पंधरा वर्षांची सुमारे १५ कोटीं पेक्षा अधिकची शासनाकडून येणे असलेली रक्कम परत द्यावी, मुदत संपलेली कीटकनाशके उत्पादक कंपन्यांनी विक्रेत्यांकडून परत घ्यावी, परवाना नूतनीकरणाची रक्कम राज्यांमध्ये एकाच दराने आकारणी करावी, दुकानातील मालाचे साठा रजिस्टर संगणकीय पद्धतीने ठेवण्याची मान्यता देणे, मयत विक्रेत्याची त्याच्या वारसाच्या नावे परवाना नोंदणी दुरुस्ती करणे आदी मागण्या कृषी विभागाकडे गेली अनेक वर्षांपासून केल्या जात आहेत. त्यावर कोणतीही कारवाई होत नसल्याने मागण्याविषयी न्याय मिळण्यासाठी हा बंद पुकारण्यात आला असल्याचे ‘माफदा’ने आधीच स्पष्ट केले आहे. मागण्यांविषयी निर्णय न झाल्यास बेमुदत संपाचा इशाराही ‘माफदा’ने दिला आहे.

बंदला प्रतिसाद संपाला राज्यात प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे. मागण्यांबाबत ‘माफदा’कडे शनिवारी(ता ११) दुपारपर्यंत शासन वा प्रशासनाकडून कोणतीही हालचाल झाली नसल्याची माहिती ‘माफदा’चे अध्यक्ष जगन्नाथ काळे यांनी दिली. मागण्यांबाबत सुरू असलेल्या या बंदबाबत शासन व प्रशासन स्तरावरून उद्या रविवार तारीख १२ पर्यंत निर्णय न आल्यास कृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या तसेच शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून पुढील निर्णय घेण्यात येईल, असे ‘माफदा’चे सचिव नितीन कासलीवाल यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com