agriculture news in Marathi agriculture inputs seller strike continue Maharashtra | Page 2 ||| Agrowon

कृषी निविष्ठा विक्रेत्यांचा राज्यात बंद सुरूच

टीम अॅग्रोवन
रविवार, 12 जुलै 2020

कृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या मागण्यांबाबत कार्यवाही होत नसल्याने सुरू असलेला तीन दिवसीय संप शनिवारी (ता ११) दुसऱ्या दिवशीही सुरुच होता.

औरंगाबाद: कृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या मागण्यांबाबत कार्यवाही होत नसल्याने सुरू असलेला तीन दिवसीय संप शनिवारी (ता ११) दुसऱ्या दिवशीही सुरुच होता. मराठवाड्यासह राज्यभरातून या संपाला प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे महाराष्ट्र फर्टिलायझर्स पेस्टिसाइड सीड्स डीलर्स असोसिएशननकडून (माफदा) सांगण्यात आले.

बियाणे उगविले नसल्याच्या कारणावरून विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करू नये, यासोबतच विक्रेत्यांकडून तपासणीसाठी बियाणे नमुन्याची पंधरा वर्षांची सुमारे १५ कोटीं पेक्षा अधिकची शासनाकडून येणे असलेली रक्कम परत द्यावी, मुदत संपलेली कीटकनाशके उत्पादक कंपन्यांनी विक्रेत्यांकडून परत घ्यावी, परवाना नूतनीकरणाची रक्कम राज्यांमध्ये एकाच दराने आकारणी करावी, दुकानातील मालाचे साठा रजिस्टर संगणकीय पद्धतीने ठेवण्याची मान्यता देणे, मयत विक्रेत्याची त्याच्या वारसाच्या नावे परवाना नोंदणी दुरुस्ती करणे आदी मागण्या कृषी विभागाकडे गेली अनेक वर्षांपासून केल्या जात आहेत.

त्यावर कोणतीही कारवाई होत नसल्याने मागण्याविषयी न्याय मिळण्यासाठी हा बंद पुकारण्यात आला असल्याचे ‘माफदा’ने आधीच स्पष्ट केले आहे. मागण्यांविषयी निर्णय न झाल्यास बेमुदत संपाचा इशाराही ‘माफदा’ने दिला आहे.

बंदला प्रतिसाद
संपाला राज्यात प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे. मागण्यांबाबत ‘माफदा’कडे शनिवारी(ता ११) दुपारपर्यंत शासन वा प्रशासनाकडून कोणतीही हालचाल झाली नसल्याची माहिती ‘माफदा’चे अध्यक्ष जगन्नाथ काळे यांनी दिली. मागण्यांबाबत सुरू असलेल्या या बंदबाबत शासन व प्रशासन स्तरावरून उद्या रविवार तारीख १२ पर्यंत निर्णय न आल्यास कृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या तसेच शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून पुढील निर्णय घेण्यात येईल, असे ‘माफदा’चे सचिव नितीन कासलीवाल यांनी सांगितले.


इतर अॅग्रो विशेष
आपत्कालीन परिस्थितीत राज्य सरकारांसोबत...मुंबई : आपत्कालीन परिस्थितीत केंद्र सरकार राज्य...
कीडनाशकांवर बंदीबाबत अभ्यासच झालेला नाहीपुणे: कृषी रसायन क्षेत्रात काही कीडनाशकांवर...
जालन्यात रेशीम कोषांची उलाढाल ६६...जालना: येथील रेशीम कोष खरेदी बाजारपेठेची यंदाच्या...
कलिंगड, भातशेतीसोबत ब्रॉयलर पक्षांची...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पेंडूर कनकवाडी येथील दीपक...
दूध आंदोलनाची पुढील दिशा आज ठरणारनगर ः दुधाला प्रतिलिटर तीस रुपये दर मिळावा आणि...
पॉवर टीलर आयातीवर निर्बंधपुणे: भारत-चीन वादाचा फटका आता पॉवर टीलर...
नगर जिल्ह्यात तेलकट डागांमुळे डाळिंब...नगर ः नगर जिल्ह्यात यंदा छोटी तसेच तोडणीला...
शेळीपालन, श्‍वान, देशी कोंबडीपालनातून...शेळीपालन, मग श्‍वानपालन व आता देशी कोंबडीपालन अशी...
राज्यात ठिकठिकाणी पावसाच्या हलक्या सरीपुणे ः  कोकण, मध्य महाराष्ट्र, खानदेश,...
लक्ष वळविण्याची राजकीय खेळी!एखाद्या महासंकटाचा राजकीय लाभ कसा उठवायचा हे...
जो पारदर्शी तोच टिकेलकेंद्र सरकारने ‘एक देश एक बाजार’ योजनेची घोषणा...
आदिवासी महामंडळातर्फे ४९ लाख क्विंटल...नाशिक : कोरोनाच्या संकट काळात आदिवासी विकास...
संशोधनासाठी मोसंबी वाणांचे जतन फायदेशीर...बदनापूर, जि. जालना : मोसंबी फळपिकांच्या विविध...
परभणी जिल्ह्यात कापसाची ३६ लाख क्विंटल...परभणी ः कोरोना साथीमुळे लांबत गेलेला परभणी...
अल्पभुधारक शेतकऱ्यांच्या सबलीकरणावर भर नवी दिल्ली: शेती क्षेत्राला चालना देण्यासाठी...
रानभाज्या विक्रीतून रोजगार निर्मितीचा...नाशिक: राज्यातील आदिवासी भागात नैसर्गिक पद्धतीने...
कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा शिडकावा पुणे ः पावसाचा जोर कमी झाल्याने कोकण, मध्य...
चीनकडून बियाणे दहशतवादाचा धोका पुणेः देशातील बियाणे वारसा आणि बीजोत्पादन उद्योग...
बेकायदा ‘एचटीबीटी’मुळे तीनशे कोटींचा...पुणे : बेकायदेशीर तणनाशक सहणशील (एचटीबीटी) कापूस...
कोल्हापुरात पावसाचा जोर ओसरला कोल्हापूर: जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला आहे....