अकोला ः पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना यशस्वीरीत्या राबविल्याबद्दल दोनच दिवसांपूर्वी दिल्ल
अॅग्रोमनी
शेतमाल बाजारातील सुधारणा कायम राहील
गव्हाचे दर ५ डॉलर प्रतिबुशेल्सपर्यंत, मका ४.३० सेंट प्रतिबुशेल्स, भात ०.२० ते १३.४० डॉलर प्रतिबुशेल्स, कापसाचे दर ६८ सेंट प्रतिपाउंडने वाढण्याचा अंदाज आहे.
वॉशिंग्टन ः शेतीमालाचा आंतरराष्ट्रीय बाजार यंदा सुधारलेला आहे. ही सुधारणा कायम राहील. गव्हाचे दर ५ डॉलर प्रतिबुशेल्सपर्यंत, मका ४.३० सेंट प्रतिबुशेल्स, भात ०.२० ते १३.४० डॉलर प्रतिबुशेल्स, कापसाचे दर ६८ सेंट प्रतिपाउंडने वाढण्याचा अंदाज आहे. तर सोयाबीनचे दर ११.१५ डॉलर प्रतिबुशेल्स राहण्याचा अंदाज अमेरिकेच्या कृषी विभागाने (यूएसडीए) व्यक्त केला आहे.
गहू बाजाराचा विचार करता जागतिक पातळीवर चांगला पुरवठा, वापरात वाढ, निर्यातीत होणारी वाढ आणि साठ्यात घट होण्याचा अंदाज आहे. यंदा जागतिक गहू उत्पादन ७७३.४ दशलक्ष टन होण्याचा अंदाज आहे. जागतिक पातळीवर कझाकस्तानमध्ये उत्पादनात वाढ, तर अर्जेंटिना आणि पाकिस्तानमध्ये घट होण्याची शक्यता आहे.
चीनमध्ये पशुखाद्यासाठी आणि घरगुती वाढता वापर आणि भारतात खाण्यासाठी, बियाणे आणि औद्योगिक वाढता वापर यामुळे जागतिक गव्हाचा वापर यंदा ९.८ दशलक्ष टनांनी वाढून ७६९.३ दशलक्ष टन होण्याची शक्यता आहे. अमेरिकेच्या कृषी मंत्रालयाने गव्हाचे दर यंदा ०.१५ डॉलर ते ५ डॉलर प्रतिबुशेल्स राहण्याची शक्यता आहे.
गहू बाजारातील घडामोडी
- चीनचा गहू वापर विक्रमी ३० दशलक्ष टन राहणार
- चीनमध्ये मक्याच्या दरातील वाढीने गव्हाला मागणी
- भारतात कोरोनाकाळात गव्हाचे मोठे वाटप
- युरोपियन देश, कझाकस्तानमधून निर्यात वाढण्याची शक्यता
- जागतिक साठा ३०४ दशलक्ष टन राहण्याचा अंदाज
- चीनमध्ये ५१ टक्के, तर भारतात ९ टक्के साठा
मका दरात वाढीची शक्यता
जागतिक पातळीवर मक्याचे उत्पादन वाढण्याची शक्यता आहे. दक्षिण आफ्रिकेत मका उत्पादन वाढण्याची शक्यता आहे, तर ब्राझीलमध्ये उत्पादन स्थिर राहण्याचा अंदाज आहे. अमेरिका, भारत आणि दक्षिण आफ्रिकेतून मका निर्यात वाढण्याची शक्यता आहे. विपणन वर्ष फेब्रुवारी २०२१ मध्ये अर्जेंटिना आणि ब्राझीलमधून मका निर्यात वाढली आहे. चीनने मका आयात वाढविली आहे तर युरोपियन देश, दक्षिण कोरिया, जपान, भारत, सौदी अरेबिया आणि टर्कीमध्ये आयात घटली आहे. चीन, दक्षिण आफ्रिका आणि मेक्सिकोमध्ये मका लागवडीत वाढ झाली तर अर्जेंटिना आणि ब्राझीलमध्ये घट झाली. जागतिक मका साठा २८६.५ दशलक्ष टन राहण्याची शक्यता आहे. मक्याचे हंगामातील दर हे १० सेंट ते ४.३० सेंट प्रतिबुशेल्सने वाढण्याची शक्यता आहे, असे ‘यूएसडीए’ने म्हटले आहे.
भात निर्यातीत भारताला संधी
आंतरराष्ट्रीय पातळीवर भाताचा अधिक पुरवठा, वापरात वाढ, व्यापारातील वाढ आणि साठा कमी राहण्याची शक्यता आहे. इंडोनेशिया, श्रीलंका आणि फिलिपिन्समध्ये उत्पादनात वाढ झाली असून, जागतिक भात उत्पादन ५०४ दशलक्ष टन राहण्याची शक्यता आहे. यंदा जागतिक भाताचा वापरही २.२ दशलक्ष टनांनी वाढून ५०४.२ दशलक्ष टन होण्याची शक्यता आहे. मक्याचे दर वाढल्याने चीनमध्ये भाताचा वापर वाढण्याची शक्यता आहे. भाताची थायलंडमधून निर्यात घटणार असली, तरी भारतातून निर्यात वाढणार आहे. भारतात भाताचा पुरवठा पुरेसा असल्याने तसेच भारताच्या भाताचे दर हे इतर निर्यातदार देशांच्या तुलनेने कमी असल्याने निर्यातीला संधी आहे. त्यामुळे भारतातून निर्यात विक्रमी १५ दशलक्ष टन होण्याची शक्यता आहे. यंदा भाताचा साठा कमी म्हणजेच १७८.१ दशलक्ष टन राहण्याचा अंदाज आहे. तर भाताचे हंगामातील दर हे ०.२० ते १३.४० डॉलर प्रतिबुशेल्सने वाढले आहेत, असे ‘यूएसडीए’ने म्हटले आहे.
सोयाबीनचा कमी साठा
जागतिक पातळीवर सोयाबीनची मागणी वाढली आहे. त्यामुळे सोयाबीनची निर्यात वाढली असून पुढील वर्षासाठी शिल्लक साठा कमी राहण्याची शक्यता आहे. अर्जेंटिनामध्ये आयात वाढण्याची शक्यता असून युरोपियन देश, कॅनडा आणि बांगलादेशमध्ये आयात किंचित कमी झाली आहे. सोयाबीनचा अमेरिका आणि ब्राझीलमध्ये साठा घटला असून अर्जेंटिनामध्ये काही प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे जागतिक साठा एक दशलक्ष टनाने घटून ८३.४ दशलक्ष टनांवर येण्याची शक्यता आहे. हंगामात सोयाबीनचे दर ११.१५ डॉलर प्रतिबुशेल्स राहण्याची शक्यता आहे, असे ‘यूएसडीए’ने म्हटले आहे.
कापूस निर्यात वाढणार
जागतिक पातळीवर कापूस उत्पादन, वापर आणि आयात वाढण्याची शक्यता आहे. चीनची कापूस खरेदी वाढली आहे. जागतिक कापूस उत्पादनात १३ लाख कापूस गाठींनी वाढ होण्याची शक्यता आहे. भारतात कापूस पिकावर किडीचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनात ५ लाख गाठींनी घट होण्याची शक्यता आहे. तर पाकिस्तानात २ लाख तर ऑस्ट्रेलियात १ लाख गाठींनी उत्पादन घटण्याची शक्यता आहे. जागतिक कापूस वापरही वाढणार आहे. भारत, पाकिस्तान, बांगलादेश आणि टर्कीमध्ये कापसाचा वापर वाढणार आहे, तर इंडोनेशिया आणि थायलंडमध्ये वापर घटण्याची शक्यता आहे. जागतिक कापूस व्यापारही वाढणार आहे. तर शिल्लक साठाही कमी राहण्याची शक्यता आहे. हंगामात कापसाचे दर ६८ सेंट प्रतिपाउंडने वाढण्याची शक्यता आहे.
- 1 of 30
- ››