agriculture news in Marathi agriculture mechanism scheme started but portal is down Maharashtra | Agrowon

यांत्रिकीकरण योजना सुरु, पोर्टल मात्र बंदच 

टीम अॅग्रोवन
बुधवार, 23 सप्टेंबर 2020

शेती अवजारांसह अन्य वैयक्तिक लाभाच्या योजनेचा लाभ मिळण्यासाठी यंदा उशिराने का होईना अखेर कृषी यांत्रिकीकरण योजना सुरु झाली. 

नगर ः शेती अवजारांसह अन्य वैयक्तिक लाभाच्या योजनेचा लाभ मिळण्यासाठी यंदा उशिराने का होईना अखेर कृषी यांत्रिकीकरण योजना सुरु झाली. त्यानुसार शेतकऱ्यांनी शासनाने सुरु केलेल्या ‘महाडीबीटीमहाआयटी’ या पोर्टलवर नोंदणी व अर्ज सादर करण्याचे अवाहनही केले, मात्र हे पोर्टलच बंद असल्याने शेतकऱ्यांना अर्ज करता येईनात. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनीही हे पोर्टल बंद असल्याचे मान्य केले. ‘‘आम्ही वरिष्ठ पातळीवर पोर्टल बंद असल्याचे कळवले आहे,’’ असे नगरच्या कृषी विभागातून सांगण्यात आले. मात्र हे पोर्टल कधी सुरु होणार, शेतकऱ्यांना सुरळीतपणे अर्ज नेमके कधी करता येतील हे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनाही सांगता येईना. 

शेतकऱ्यांना अनुदानावर टॅक्टर, पॉवर टिलर व अन्य शेती अवजारे मिळण्यासाठी राज्यात चालू वर्षीही कृषी यांत्रिकीकरण उपअभियान योजना राबविण्यात येते. यंदा कोरोना व्हायरसच्या पाश्वभूमीवर योजना राबवण्याला तीन महिने उशिर झालाय. यंदा राज्यात या योजनेसाठी साधारण ९४ कोटी रुपये निधी उपलब्ध होणार असल्याचे सांगण्यात आले.

अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून ‘महाडीबीटीमहाआयटी’ या शासनाच्या पोर्टलवर नोंदणी व अर्ज सादर करावेत, असे आवाहन कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी केले. त्यानुसार चार दिवसापासून तालुका कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक त्याबाबतचे संदेश तयार करुन ते सोशल मिडीयावर टाकत अर्ज नोंदणी करण्याचे अवाहन करत आहेत. मात्र प्रत्यक्षात जेव्हा शेतकरी शासनाच्या mahadbtmahait.gov.in या पोर्टलवर अर्ज करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा हे पोर्टलच बंद असल्याचे दिसते. 

याबाबत कृषी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही ‘‘हे पोर्टल सुरु होत नसून त्याबाबत वरिष्ठ पातळीवर कळवले आहे,’’ असे सांगितले. मात्र हे पोर्टल नेमके कधी सुरु होणार हे कृषीच्या अधिकाऱ्यांनाही सांगता येईना. त्यामुळे कृषी यांत्रिकीकरण योजनेची किती दिवस प्रतिक्षा करावी लागेल असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. 

यंदा गांभिर्य दिसेना 
शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून अनुदानावर अवजारे मिळण्यासाठी कृषी यांत्रिकीकरणातून लाभ मिळतो. गेल्यावर्षी नगर जिल्ह्यात सुमारे पंधरा कोटींची अवजारे दिली. मागणी मात्र तब्बल पस्तीस ते चाळीस कोटींच्या अवजारांची होती. यंदा तर गेल्यावर्षीच्या ३३ टक्केच निधीनुसार अवजारे मिळण्याची शक्यता आहे. त्यातही तीन महिने उशिर झालाय. असे असतानाही यंदा कृषी यांत्रिकीकरणाबाबत नगर जिल्हा कृषी विभागाने अजून गांभिर्याने घेतल्याचे दिसत नाही. 


इतर अॅग्रो विशेष
मोह फुलांचा वाढेल गोडवाराज्यामध्ये ऐन नवरात्रीमध्ये मॉन्सून देवतेने...
देखो तो कहीं चुनाव है क्या?‘स रहद पर तनाव है क्या, देखो तो कहीं चुनाव है...
कांदा खरेदीनंतर व्यापाऱ्यांना मिळणार...नाशिक : बाजार समितीत कांदा खरेदी केल्यानंतर...
मराठवाड्यात साठ टक्के कपाशीवर गुलाबी...नांदेड : ‘‘मराठवाड्यात लवकर येणारे कापूस वाण...
कंपन्यांनी सर्वेक्षण न केल्यास विमा...पुणे: राज्यात विमा कंपन्यांनी पीक नुकसानीचे...
इथेनॉल दरात तीन रुपयांपर्यंत वाढकोल्हापूर : यंदाच्या हंगामात इथेनॉलनिर्मितीला गती...
एक लाख टन कांदा आयातीची शक्यतानवी दिल्ली ः देशातील कांदा दरवाढीवर नियंत्रण...
कापूस खरेदीसाठी तीस केंद्रे अंतिमनागपूर : गेल्या हंगामात नव्वद केंद्र आणि १५०...
फळ पीकविमा योजनेवर केळी उत्पादकांचा...जळगाव ः हवामानावर आधारित फळ पीकविमा योजनेत केळी...
द्राक्ष निर्यातदार, पॅकहाउसवरील निलंबन...नाशिक: नाशिकमधून गेलेल्या ४१ कंटेनरमध्ये कीड...
हातचं सारं गेलं, आता जगावं कसं?नाशिक : यंदा वेळेवर पाऊस नसल्याने भाताची रोपे...
धानाच्या हमीभावात ११ वर्षांत केवळ एक...भंडारा: व्यवस्थापन खर्चात दरवर्षी होणारी वाढ,...
राज्यात उन्हाची तीव्रता वाढली पुणे ः राज्यातील अनेक भागात उन्हाची तीव्रता वाढली...
कांदा लिलाव सुरू करण्याचे आदेशनाशिक : जिल्ह्यात विविध बाजार समित्यांमध्ये...
सर्वांगीण विकासातून गुंडेगावचा झाला...गुंडेगाव (ता. जि. नांदेड) या गावाने शेती,...
कृषी उद्योजकतेची ‘एबीसी’सन २०२० च्या दुसऱ्या तिमाहीत भारताचा जीडीपी ...
आयकर भरणाऱ्या ६५१ शेतकऱ्यांना नोटिसाशहादा, जि. नंदुरबार : आयकर भरत असूनही केंद्र...
कांद्याची कोट्यवधीची उलाढाल ठप्प नाशिक: केंद्र सरकारने कांद्याच्या वाढत्या दरावर...
करार शेतीची जबाबदारी कृषी विभागाकडेचपुणे: करारशेतीचा नवा कायदा अस्तित्वात आल्यानंतर...
मॉन्सूनने घेतला देशातून निरोपपुणे ः परतीच्या पावसाला देशातून माघार घेण्यासाठी...