दापोली : कृषिमंत्री भुसे आज साधणार शेतकऱ्यांशी ऑनलाइन संवाद

चिपळूण, जि. रत्नागिरी ः दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ आणि राज्य सरकारच्या कृषी विभागातर्फे गुरुवारी (ता. २८) ऑनलाइन भात पीक परिसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये कृषिमंत्री दादा भुसे शेतकऱ्यांशी ऑनलाइन संवाद साधणार आहेत.
Agriculture Minister Bhuse will have an online dialogue with farmers today

सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत, हैद्राबाद येथील भारतीय भात संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. एस. आर. वोलेटे, राज्याचे कृषी आयुक्त डॉ. सुहास दिवसे, अटारीचे संचालक डॉ. लाखन सिंग विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या तांत्रिक सत्रामध्ये चारही कृषी विद्यापीठातील भात पिकासंबंधी काम करणारे शास्त्रज्ञ तसेच कृषी विभागाचे अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com