agriculture news in marathi, agriculture minister demand to increase guarantee price of cotton, nagpur, maharashtra | Agrowon

कापसाच्या हमीभावात ५०० रुपयांनी वाढ करावी : कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे
टीम अॅग्रोवन
बुधवार, 17 जुलै 2019

देशातील इतर कापूस उत्पादक राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात सिंचनसोयी कमी आहेत. सिंचन क्षेत्रातील कापूस पाच टक्‍केच आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांचा नाही तर सरकारचा दोष आहे. त्याचा फटका कापूस उत्पादनाला बसत आहे. परिणामी, हमीभावासाठी महाराष्ट्राकरिता वेगळा निकष लावावा किंवा बोनस तरी द्यावा.
- गोविंद वैराळे, ज्येष्ठ कापूस तज्ज्ञ, नागपूर.

अमरावती   ः राज्याची कमी असलेली कापूस उत्पादकता आणि वाढता उत्पादन खर्च यामुळे हमीभावात किमान ५०० रुपयांनी वाढ करावी, अशी मागणी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्याकडे सोमवारी (ता. १५) एका पत्राव्दारे केली. 

कापूस क्षेत्रातील जाणकारांच्या माहितीनुसार, देशातील इतर भागांत ५५ ते ६० टक्‍के सिंचनसोयी आहेत. परिणामी, देशातील नऊ कापूस उत्पादक राज्यांची उत्पादकता साडेनऊ ते दहा क्‍विंटल प्रती एकर आहे. परंतु, महाराष्ट्र याला अपवाद असून या ठिकाणी कापसासाठीचे सिंचन केवळ पाच टक्‍के असल्याने प्रती एकर उत्पादकता चार क्‍विंटल आहे. कापसाचा हमीभाव ठरविताना सिंचनसोयी असलेल्या भागातील कापसाची उत्पादकता विचारात घेतली जाते. यामध्ये महाराष्ट्राचा विचार केला जात नाही. त्यामुळे कापसाचा हमीभाव ठरविताना महाराष्ट्रासाठी वेगळा निकष लावावा किंवा बोनस तरी दिला जावा, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून आहे. परंतु, केंद्र व राज्य सरकारकडून ही बाब गंभीरपणे घेतली गेली नाही.

यावर्षी कापसाच्या हमीभावात १०० रुपयांची वाढ करण्यात आल्याने दर ५४५० रुपये क्‍विंटलवरुन ५५५० रुपयांवर पोचले आहेत. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना याचा फायदा होणार नाही. त्यामुळे हमीभावात किमान ५०० रुपयांची व्हावी, अशी मागणी होती. त्याची दखल घेत कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्याकडे हमीभावात किमान ५०० रुपयांची वाढ करावी, अशी मागणी केली आहे. त्यासाठी वाढता उत्पादन खर्च विचारात घ्यावा, अशी अपेक्षा आहे. 
 

इतर ताज्या घडामोडी
वांग्यावरील शेंडा व फळे पोखरणाऱ्या...वांगी पिकामध्ये येणाऱ्या शेंडा व फळे पोखरणारी...
पूरस्थितीतील द्राक्ष बागेचे व्यवस्थापनसां गली, कोल्हापूर व कर्नाटक शेजारील काही भागांत...
अकोल्यातील प्रकल्पात अत्यल्पच साठाअकोला : यंदाच्या पावसाळ्याचे सुमारे अडीच महिने...
सांगलीत गूळ ३३०० ते ४४०० रुपये...सांगली : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी...
अकोला जिल्ह्यात ६० हजार हेक्टर क्षेत्र...अकोला ः यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात असमतोल...
सिंधुदुर्गात कालव, जिताडा मस्त्यबीज...मुंबई : राज्यात सागरी उत्पादनवाढीस...
ठिबकला ८० टक्के अनुदान; आंदोलनाला...भोसे, जि. सोलापूर : राज्य शासनाने कोरडवाहू...
मांडाखळीत संत्रा बागांत फळगळपरभणी : कमी पाण्यामुळे जमिनीमध्ये ओलाव्याची...
रश्‍मी बागल यांचा शिवसेनेत प्रवेशसोलापूर : जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसची...
माशांच्या पाच नव्या जातींचा घेतला शोध अरुणाचल प्रदेश राज्यातील इटानगर येथील राजीव गांधी...
कोल्हापुरात मोहीम स्वरूपात पंचनाम्यास...कोल्हापूर: महापुराच्या प्रलयानंतर आता...
सांगली जिल्हा बॅंकेच्या १२ शाखांचे...सांगली   ः महापुराचा फटका शेती आणि...
एकात्मिक शेती पद्धत वापरासाठी ‘कृषी’...मुंबई  : पीक उत्पादन वाढून शेतकऱ्यांचे...
पूरग्रस्तांसह अतिवृष्टीत पिके...कोल्हापूर   : पूरग्रस्तांसह अतिवृष्टीत...
युतीतील अनेक जण आमच्या संपर्कात ः अजित...यवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आणि...
मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन शरद पवार...मुंबई  ः कोल्हापूर, सांगली, सातारा या...
खानदेशात शेतीकामात मजूरटंचाईजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व...
पोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्यविटा, जि. सांगली : पोल्ट्रीधारकांना...
नाशिक जिल्ह्यात पावसामुळे पूर्वहंगामी...नाशिक : संततधार सुरू असलेल्या पावसामुळे...
नांदेड जिल्ह्यात पीककर्जाचे ७३ हजारांवर...नांदेड : चालू आर्थिक वर्षाच्या (२०१९-२०) पहिल्या...