करपलेल्या पिकाच्या सर्व्हेक्षणासह भरपाईची कृषिमंत्र्यांकडे मागणी

करपलेल्या पिकाच्या भरपाईची कृषिमंत्र्यांकडे मागणी
करपलेल्या पिकाच्या भरपाईची कृषिमंत्र्यांकडे मागणी

अमरावती ः नांदगाव खंडेश्‍वर तालुक्‍यातील हिवरा मुरादेसह परिसरातील ५०० एकर क्षेत्रावरील सोयाबीन पीक पावसाअभावी जळाले. त्याची दखल घेत शेतकऱ्यांनी तातडीने सर्व्हेक्षणासह नुकसानभरपाईची मागणी केली आहे.

हिवरा मुरादे या गावातील शेतकऱ्यांनी पावसाला सुरवात होताच जवळपास ५०० एकरात सोयाबीनची पेरणी केली होती. त्यानंतरच्या काळात पीकही अंकुरले. मात्र, २५ दिवसांपासून पावसाने पाठ फिरविल्याने सोयाबीन पीक जळाले. आता पाऊस आला असला तरीही त्याचा काही एक फायदा पिकाला होणार नाही. हिवरा मुरादे, वडाळा, फत्तेपूर, पिंपळगाव, निपाणी, बोरगाव, पुसनेर, टाकळी कानडा, टाकळी गिलबा आणि पिंपळगाव या गावांतही पिकांची स्थिती भयावह आहे. त्या अनुषंगाने हिवरा मुरादे येथील शेतकऱ्यांनी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे व जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना भेटून सोयाबीन पिकांची वास्तविकतः त्यांच्यासमोर मांडली. 

परिसरातील नुकसानग्रस्त क्षेत्राची पाहणी करून आर्थिक मदत मिळावी, अशी मागणीही या वेळी करण्यात आली. त्याची दखल घेत कृषिमंत्री डॉ. बोंडे यांनी सर्व्हेक्षणाअंती मदतीचे आश्‍वासन दिले. सरपंच सुषमा मुरादे, उपसरपंच रमाकांत मुरादे, रवींद्र मुरादे, प्रमोद मुरादे, अजय मुरादे, अमोल जाधव, साहेबराव मोडक, गणेश डवले, राहल डांगे, महादेव गायकवाड, प्रशांत मुरादे यांच्यासह शेतकरी निवेदन देतेवेळी उपस्थित होते. 

चाऱ्याचाही प्रश्‍न गंभीर सोयाबीन जळाल्याने दुबार आणि पर्यायी पिकाची लागवड करावी लागणार आहे त्यासोबतच पशुधनाकरिता चाऱ्याची सोय नसल्याने चारा छावण्यांची सोय करावी, अशी मागणीही शेतकऱ्यांनी कृषिमंत्री डॉ. बोंडे यांच्याकडे केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com