Agriculture news in Marathi Agriculture Minister to hold kharif review meeting in Akola tomorrow | Agrowon

कृषिमंत्री अकोल्यात उद्या घेणार खरीप आढावा बैठक

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 26 मे 2020

अकोला ः राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे बुधवारी (ता. २७) सकाळी ८.३० वाजता अकोल्यात विभागीय जिल्हा खरीप हंगाम आढावा बैठक घेणार आहेत. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ते अकोल्यासह अमरावती, बुलडाणा, वाशीम आणि यवतमाळ जिल्ह्यांचा आढावा घेणार आहेत.

अकोला ः राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे बुधवारी (ता. २७) सकाळी ८.३० वाजता अकोल्यात विभागीय जिल्हा खरीप हंगाम आढावा बैठक घेणार आहेत. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ते अकोल्यासह अमरावती, बुलडाणा, वाशीम आणि यवतमाळ जिल्ह्यांचा आढावा घेणार आहेत.

आढावा बैठक घेण्यासाठी श्री. भुसे मंगळवारी (ता. २६) सायंकाळी अकोल्यात मुक्कामी येत आहेत. अकोल्यातील बैठक घेतल्यानंतर ते सकाळी १० वाजता औरंगाबादकडे रवाना होणार आहेत. तेथे दुपारी ४.३० वाजता औरंगाबाद, जालना, बीड, हिंगोली, लातूर, नांदेड, उस्मानाबाद या जिल्ह्यांची विभागीय खरीप आढावा बैठक घेणार आहेत. या बैठकीत ते खते, बियाणे पुरवठा, गुणवत्ता नियंत्रण, प्रमुख पिकांचे विस्तार कार्य, पीककर्ज वितरण व वित्तपुरवठा कार्यवाही, पंतप्रधान पीकविमा योजना, पीएम किसान योजना आढावा घेणार आहेत.  

 


इतर ताज्या घडामोडी
पेरणीसाठी ‘बीबीएफ’ तंत्राचा वापर करा :...औरंगाबाद : ‘‘बीबीएफ टोकण यंत्राचा वापर वेगवेगळी...
जळगाव जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत बॅंका पीक...जळगाव ः केंद्र व राज्य सरकार, प्रशासनातील वरिष्ठ...
हतनूर धरणाची साठवण क्षमता घटलीभुसावळ, जि. जळगाव ः जिल्ह्यातील प्रमुख सिंचन...
शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करावा...जालना  : ‘‘शेतकऱ्यांनी शेतीत आधुनिक...
रिसोड बाजार समितीत हळदीची दोन दिवस खरेदीअकोला ः गेल्या काही वर्षांत वाशीम तसेच अकोला...
खानदेशात सर्वदूर पावसाची हजेरीजळगाव ः खानदेशात पेरणी ८८ टक्‍क्‍यांवर पोचली असून...
परभणीत २५ हजारांवर शेतकऱ्यांची कापूस...परभणी  : ‘‘राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन...
रत्नागिरी जिल्ह्यातील भाजीपाला,...रत्नागिरी : कोरोना टाळेबंदीत जिल्ह्यातील महिला...
सांगली जिल्ह्यात पावसाअभावी पेरणी वाया...सांगली : जिल्ह्यात गेल्या तीन आठवड्यांपासून...
नगर जिल्ह्यात साडेचार लाख हेक्टरवर पेरानगर ः यंदा रोहिणी, मृग, आर्द्रा नक्षत्रांमध्ये...
परभणी जिल्ह्यात ७४.४३ टक्के पेरणीपरभणी : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात शुक्रवार...
अकोला जिल्ह्यात पीक कर्जापासून ५२ टक्के...अकोला ः खरीप हंगामाला सुरुवात झाली असून,...
पाऊस नसल्याने संरक्षित पाण्यावर भातलागवडनाशिक : जिल्ह्यातील अतिपर्जन्य छायेखालील इगतपुरी...
बियाणे भरपाई दिलेल्या शेतकऱ्यांची नावे...नागपूर ः आपल्या सत्ताकाळात निकृष्ट बीटी...
जळगाव, धुळ्यात युरियाची टंचाई कायमधुळे ः जळगाव व धुळे जिल्ह्यांत युरियासह १०.२६.२६...
महाजॉब्स संकेतस्थळाच्या माध्यमातून...मुंबई : देशातील सर्वात मोठे प्लाझ्मा सेंटर असो की...
केंद्राकडून शेतकऱ्यांच्या मानगुटीवर पाय...कऱ्हाड, जि. सातारा ः अर्थव्यवस्थेला शेतकरी राजा...
करमाळ्यातील आदिनाथ कारखाना...करमाळा, जि. सोलापूर : करमाळा तालुक्‍यातील आदिनाथ...
हॉटेल्स, लॉज उद्यापासून सुरू होणारमुंबई : तब्बल साडेतीन महिन्यांनंतर ८ जुलैपासून...
जनहितचे धरणे अन् तत्काळ शेतकऱ्यांच्या...सोलापूर  ः मोहोळ तालुक्यातील ऑक्टोबर -...