कृषी सहायकांसाठी ग्रामपंचायतीत बैठक व्यवस्था करा ः कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे

विमा कंपन्यांनी जिल्हा, तालुकास्तरावर कार्यालये सुरू करावीत आणि शेतकऱ्यांमध्ये त्याबाबतच्या माहितीचा प्रचार, प्रसार करावा. - डॉ. अनिल बोंडे, कृषिमंत्री.
कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे
कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे

मुंबई : शेतकरी आणि शासन यांच्यातला दुवा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कृषी सहायकांसाठी ग्रामपंचायत अथवा तलाठी कार्यालयात स्वतंत्र बैठक व्यवस्था करावी जेणेकरून शेतकऱ्यांना सहज संपर्क साधणे शक्य होईल. त्याचबरोबर कृषी सहायकांशी संवाद साधण्यासाठी ऑडिओ ब्रिज यंत्रणा राबविण्याचे निर्देश कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी दिले.

ग्रामीण भागातील क्षेत्रीय स्तरावरील कृषी विभागाची रिक्त पदे तातडीने भरावीत जेणेकरून शेतकऱ्यांपर्यंत कृषी विभागाच्या योजनांचा लाभ पोचेल. राज्यभर असलेल्या कृषिमित्रांकडून अधिक प्रभावी कामगिरीसाठी त्यांना प्रशिक्षण देण्याकरिता आराखडा, मोबाईल अॅप तयार करण्याचे निर्देश कृषिमंत्र्यांनी दिले.

राज्याचे नवनियुक्त कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर विभागाची नुकतीच आढावा बैठक घेतली. विधानभवनात झालेल्या बैठकीस विभागाचे सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त सुहास दिवसे, संचालक आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

राज्यभरात सध्या १३ हजार कृषिमित्र कार्यरत आहेत. कृषिमित्रांना प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. त्यामुळे प्रशिक्षण आराखडा तयार करावा. मोबाईल अॅप तयार करून त्याद्वारे कृषिमित्रांनी शेतकऱ्यांच्या घेतलेल्या भेटी, त्यांना दिलेली माहिती याबाबत नियंत्रण करावे. शेतीक्षेत्रात राबविण्यात येणाऱ्या थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) योजनेमध्ये मानवी हस्तक्षेप होता काम नये, अशा सूचना डॉ. बोंडे यांनी केल्या.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com