कृषिमंत्री दादा भुसे थेट बांधावर; शेतकऱ्यांच्या भेटी

Dada Bhuse
Dada Bhuse

अकोला ः कृषिमंत्री दादा भुसे यांनी अकोला जिल्ह्याच्या दुसऱ्या दिवशी थेट गावशिवारात जाऊन शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या. शेतकऱ्यांना येत असलेल्या अडचणी जाणून घेतल्या. या वेळी त्यांच्यासोबत विभागीय कृषी सहसंचालक सुभाष नागरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मोहन वाघ, पोकरा प्रकल्पाच्या मुंबई कार्यालयातील रफीक नाईकवाडी यांच्यासह कृषी खात्याचे अधिकारी, कर्मचारी, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री. भुसे यांनी गुरुवारी सकाळी अकोला तालुक्यातील घुसर आपोती येथे भेट दिली. पोकरा प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या उपक्रमांची पाहणी केली. घुसर-आपोती गाव समूहामधील ग्राम कृषी संजीवनी समितीच्या सदस्यांसोबत चर्चा केली. त्यानंतर मूर्तिजापूर तालुक्यातील अंभोरा येथे सेवार्थ शेतकरी उत्पादक कंपनीला भेट दिली. सामूदायिक कृषी सेवा केंद्र, मिरची प्रक्रिया उद्योग व त्याचे विपणन करणाऱ्या शेतकरी उत्पादक कंपनीच्या सदस्यांची भेट घेत माहिती घेतली. शेवटी याच तालुक्यातील सिरसो येथे राष्ट्रीय अन्नसुरक्षा मोहिमेअंतर्गत सुरू असलेल्या महिलांच्या हरभरा शेतीशाळेस भेट दिली. या ठिकाणी त्यांनी शेतीशाळेत सहभागी महिलांसोबत चर्चा करून त्यांना येणाऱ्या अडचणी, समस्यांबाबत माहिती घेतली. शेतीत महिलांचे योगदान अमूल्य असल्याचे सांगत कृषी खात्याने विस्ताराचे काम अधिकाधिक करीत बांधापर्यंत पोचविण्याची सूचना केली.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com