agriculture news in Marathi, agriculture ministry demands make yearly survey of farmers income, Maharashtra | Agrowon

शेतकरी उत्पन्नाचा वार्षिक सर्व्हे करा : कृषी मंत्रालयाची `एनएसएसओ’कडे मागणी

टीम अॅग्रोवन
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

अचूक माहितीच्या अभावी शेतकऱ्यांच्या उत्पन्नातील 
अचूकता, बदल आणि वाढ याची माहिती मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर नेमके कोणते घटक प्रभाव टाकतात याचा अंदाज येत नाही.
- रमेश चंद, सदस्य, निती आयोग

नवी दिल्ली: केंद्र सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. हे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी शेतकऱ्यांच्या उत्पन्नाबाबत अचूक माहिती मिळणे आवश्‍यक आहे. यासाठी नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑफिसने (एनएसएसओ) शेतकऱ्यांच्या उत्पन्नाबाबतचा पंचवार्षिक असलेला सर्व्हे वार्षिक करावा, अशी मागणी केंद्रीय कृषी मंत्रालयाची `एनएसएसओ’कडे मागणी केली. 

या बाबत कृषी मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, सध्या शेतकऱ्यांचे उत्पन्नातील वाढ मोजण्यासाठी अचूक असे कोणतेच साधन नाही. त्यातच ‘एनएसएसओ’ दर पाच वर्षांनंतर शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचा सर्व्हे जाहीर करत असल्याने त्याचा अभ्यास करणे कठिण जाते. त्यामुळे ‘एनएसएसओ’ने शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचा सर्व्हे दरवर्षी करावा जेणेकरून उत्पन्न वाढले की नाही याची अचूक माहिती मिळेल. 

मागील सर्व्हे २०१२-१३ मध्ये झाला होता आणि त्याचा अहवाल २०१४ मध्ये प्रसिद्ध करण्यात आला. अहवालातून प्रत्येक शेतकरी कुटूंबाचे मासिक उत्पन्न २०१२-१३ मध्ये ६ हजार ४२६ रुपये असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. 


इतर अॅग्रो विशेष
सोयाबीन दर विक्रमी पातळी गाठण्याचे संकेतनवी दिल्ली : देशातील महत्त्वाच्या सोयाबीन...
`उज्ज्वला` योजनेत मोठा भ्रष्टाचारनवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी...
गारठा पुन्हा वाढणारपुणे  ः राज्यात अंशतः ढगाळ हवामान असून...
पूरबाधित ऊस तोडीस कारखान्यांकडून टाळाटाळपुणे  ः राज्यातील गाळप हंगाम सुरू होऊन...
नाशिक जिल्ह्यात द्राक्षमणी पोखरणाऱ्या...नाशिक  : जिल्ह्यात द्राक्ष पीक फुलोरा व मणी...
मराठवाड्यातील ५५ प्रकल्प कोरडेचऔरंगाबाद : ऑक्‍टोबरमधील पावसाने दुष्काळाने...
पंजाबचे पशुपालक वापरतात सुधारित तंत्रलुधियाना (पंजाब) येथे प्रोग्रेसिव्ह डेअरी...
शेती, दुग्धव्यवसायाने बनविले...कोल्हापूर जिल्ह्यातील शेळेवाडी (ता. राधानगरी)...
म्हणे शेतात, पीक असल्याने वीज जोडणीस...अमरावती  ः शेतात पीक असल्यामुळे शेतकरी वीज...
देशी गोसंगोपन, गांडूळखतासह दूध...सातारा जिल्ह्यातील कोपर्डे हवेली (ता. कऱ्हाड)...
दर्गनहळ्ळी येथे वाढलाय पक्ष्यांचा...सोलापूर : पूर्वी सूर्यकिरणांसोबतच पक्ष्यांचा...
अवकाळी पावसामुळे बाधितांसाठी साडेचार...मुंबई : ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यांतील अवकाळी...
डाळिंब बियाच्या तेलापासून ‘सॉफ्टजेल...सोलापूर ः येथील राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राने...
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात...पुणे  ः मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व...
आव्हाने खूप सारी, तरीही मधमाशीपालनात...नाशिक येथे पूर्वा केमटेक या कंपनीतर्फे नुकताच...
आकस्मिकता निधीच्या मर्यादेत तात्पुरत्या...मुंबई : महाराष्ट्र आकस्मिकता निधीच्या...
खासगी प्रवासी बसमधून शेतमाल वाहतुकीला...सोलापूर : राज्याच्या ग्रामीण भागातून मुंबई,...
राज्यात बोरं ८०० ते ४००० रुपये...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
विदर्भात वादळी पावसाची शक्यता पुणे ः विदर्भाच्या काही भागांत हवामान ढगाळ आहे....
मूळ समस्यांशी थेट भिडावे लागेल ऑगस्टपर्यंत पावसाची वाट पाहणारा शेतकरीवर्ग...