लाच प्रकरणात होणार कृषी अधिकाऱ्यांची चौकशी

लाच प्रकरणात होणार कृषी अधिकाऱ्यांची चौकशी
लाच प्रकरणात होणार कृषी अधिकाऱ्यांची चौकशी

यवतमाळ : बनावट निविष्ठा प्रकरणातील आरोपींच्या बचावासाठी लाच मागितल्याप्रकरणी कृषी विभागातील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी होणार असल्याने खळबळ उडाली आहे. लवकरच याप्रकरणी एसीबीकडून संबंधितांना नोटीस बजावली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. जिल्ह्यातील कळंब येथे पोलिस आणि कृषी विभागाच्या संयुक्‍त छापेमारीत एचटी बियाणे, बनावट कीडनाशक, बनावट खतांचा साठा सापडला होता. सुमारे दीड कोटी रुपयांचे हे साहित्य होते. ११ सप्टेंबर २०१८ रोजी ही कारवाई करण्यात आली, त्यानंतर १२ सप्टेंबर रोजी कृषी विभागाने याप्रकरणी पोलिसात तक्रार दिली. प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेकडे हे प्रकरण वर्ग करण्यात आले.  पोलिस निरीक्षक मुकुंद कुळकर्णी, उपनिरीक्षक चव्हाण हे याप्रकरणाचा तपास करीत होते. चौकशी दरम्यान पोलिसांकडून आरोपीच्या बचावासाठी पुढे येत त्यांना २५ लाख रुपयांच्या लाचेची मागणी झाली. आरोपींना पैशाची सोय करता यावी याकरिता त्यांच्या जामीनासाठी देखील पोलिसांनीच पुढाकार घेत दस्तऐवज तयार केले. आरोपींकडून पैशाची हमी मिळावी याकरिता आरोपींची शेती नोटरी करून घेण्यापर्यंत पोलिसांची मजल गेली होती, अशी माहिती सूत्रांनी दिली. लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने याप्रकरणी मुकुंद कुळकर्णी यांना अटक केली तर उपनिरीक्षक चव्हाण फरार आहे. चव्हाणच पैशासाठी आरोपींच्या संपर्कात होता. त्याकरिता त्याने मोबाईलवरुन अनेकदा संवाद साधला. या संवादात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर व उपविभागीय कृषी अधिकारी कैलास वानखडे यांची नावे असल्याने त्यांना चौकशीसाठी पाचारण केले जाणार आहे. कृषी खात्यालादेखील प्रकरण मॅनेज करण्यासाठी पैसे द्यावे लागतात, असे चव्हाणने या रेकॉर्डिंगमध्ये म्हटले आहे. प्रतिनिधी... फरार पोलिस कर्मचारी चव्हाण आणि आरोपींच्या संवादात दोन कृषी अधिकाऱ्यांचा नामोल्लेख असल्याने त्यांना चौकशीसाठी पाचारण केले जाणार आहे. त्याआधारे त्यांच्या याप्रकरणातील सहभागाची माहिती कळेल. - गजानन पडघन, उपअधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती.

कारवाईपुरताच आमच्या विभागाचा संबंध आहे. त्यामुळे एसीबीच्या कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहे. - नवनाथ कोळपकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, यवतमाळ

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com