agriculture news in marathi, agriculture officers cant give a guidance for pest and disease control, pune, maharashtra | Agrowon

पुणे जिल्ह्यात पिकांवर कीड रोगांचा प्रादुर्भाव; पण मार्गदर्शन मिळेना
टीम अॅग्रोवन
बुधवार, 4 सप्टेंबर 2019

माझ्याकडे दहा एकर शेती आहे. त्यात कांदा, बाजरी, सीताफळ अशी पिके घेतली आहेत. या पिकांवर कीड-रोगांचा प्रादुर्भाव होतो. त्यावर कृषी विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. मात्र, आत्तापर्यंत एकही अधिकारी माझ्या शेतावर फिरकलेला नाही. त्यामुळे काही वेळा नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. 
- सुनील राजेभोसले, जोगवडी, ता. बारामती, जि. पुणे.

पुणे  ः जिल्ह्यात कमी - अधिक पाऊस व ढगाळ हवामानामुळे पिकांवर कीड रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यासाठी कृषी विभागाकडून मार्गदर्शन मिळण्याची गरज आहे. मात्र, कृषी विभागाचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे नुकसानीला सामोरे जावे लागत असल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत.

पुणे जिल्ह्यातील बहुतांशी भागात पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. पूर्व भागातील शिरूर, दौंड, खेड, इंदापूर, बारामती, पुरंदर भागात पावसाची गरज आहे. पश्चिम पट्ट्यातील भोर, वेल्हा, मुळशी, मावळ, खेड, आंबेगाव, जुन्नर या भागांत उशिरा पाऊस सुरू झाल्याने जूनच्या शेवटच्या आठवड्यात भात रोपवाटिकांमध्ये लागवड झाल्याने पुनर्लागवडी उशिराने झाल्या आहेत. सुमारे ५७ हजार ८१७ हेक्टरवर भाताच्या पुनर्लागवडी झाल्या आहेत. भात पीक वाढीच्या अवस्थेत असले तरी अनेक ठिकाणी अति पाऊस झाल्याने मोठे नुकसान झाले आहे. मात्र, काही ठिकाणी भात पिकाची स्थिती बऱ्यापैकी असल्याने या पिकावर कीड - रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये, म्हणून कृषी विभागाने योग्य ते मार्गदर्शन करण्याची गरज आहे.

पूर्व भागात पावसाने ओढ दिल्याने पिके सुकत आहेत. बाजरी पीक वाढीच्या अवस्थेत असून पावसाची गरज आहे.  जिल्ह्यात मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यासाठी कृषी विभागातील क्षेत्रिय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी भेटी देऊन लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी मार्गदर्शन करण्याची गरज आहे. तूर पीक वाढीच्या अवस्थेत असून पिकावर अल्प प्रमाणात किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.

पावसाच्या खंडामुळे उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे. मूग व उडीद पिके काही ठिकाणी फुले लागण्याच्या अवस्थेत आहे. त्यावर कीड - रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे पिकांची वाढ खुंटली असून काही ठिकाणी शेतकऱ्यांनी पिके मोडून टाकली आहेत. भुईमूग पिकावरही काही ठिकाणी किडीचा प्रादुर्भाव दिसून आल्याने एकात्मिक कीड नियंत्रणासाठी योग्य त्या उपाययोजना सुचविण्याची आवश्यकता आहे. परंतु कृषी विभागाकडून कोणत्याही प्रकारचे मार्गदर्शन मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर  आहे.    

पुणे जिल्ह्याच्या पूर्व भागात अजूनही दमदार पाऊस झालेला नाही. थोड्याफार प्रमाणात पिके चांगली असली तरी त्यावर कीड रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यासाठी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी मेळावे, बैठका घेऊन मार्गदर्शन करण्याची गरज आहे. कृषी विभागाकडून तसे काहीही होताना दिसत नाही. सर्व काही कागदोपत्रीच आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचे पुणे जिल्हा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष
पांडुरंग रायते यांनी सांगितले.

इतर ताज्या घडामोडी
सातारा जिल्ह्यात सोयाबीन काढणीत पावसाचा...सातारा ः जिल्ह्यात अतिवृष्टी आणि सध्या सुरू...
मराठवाडी धरणावर पुन्हा यंत्रणा सज्जढेबेवाडी, जि. सातारा ः पावसाळ्यात थांबविलेले...
परभणीत अतिवृष्टीमुळे बाधित पिकांची...परभणी ः जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या...
स्वाभिमानीच्या विदर्भ अध्यक्षांवरील...अमरावती ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ...
सततच्या पावसाने नगर जिल्ह्यात पिकांचे...नगर ः जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून पडत...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस; भात...सिंधुदुर्ग  ः जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच...
खाद्यउद्योगासाठी जंगली बुरशींचे...क्विण्वनयुक्त पदार्थांच्या चवीमध्ये त्यामध्ये...
पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील...नाशिक   : जिल्ह्यात द्राक्ष हंगामाला...
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा...अकोला  ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी...
फलटण तालुक्यात द्राक्षांचे घट फुटले;...सातारा  : फलटण तालुक्यातील निरगुडी, गिरवी,...
रसायनांच्या परिणामकारकतेसाठी नोझल,...तणनाशकाचे गुणधर्म असलेला एखादा क्रियाशील घटक...
जळगावात आले २८०० ते ५२०० रुपये...जळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
वऱ्हाडात सरासरी ६१.५९ टक्के मतदानअकोला ः गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेल्या...
सोलापूर जिल्ह्यात मतदान शांततेतसोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात रात्रभर पडत असलेल्या...
एकात्मिक कीड नियंत्रणासाठी स्वयंचलित...किडीच्या एकात्मिक नियंत्रणासाठी विविध प्रकारच्या...
दिंडोरी, नाशिक भागांत डाऊनीचा...नाशिक   : जिल्ह्यात दिंडोरी, नाशिक...
इंदापुरात १२०० एकर द्राक्ष बागा उद्‌...भवानीनगर, जि. पुणे  : इंदापूर तालुक्‍यातील...
सांगली जिल्ह्यात २० टक्के क्षेत्रावर...सांगली  ः गेल्या आठवड्यात झालेला पाऊस,...
पुणे जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरीपुणे : जिल्ह्याच्या सर्वच भागांत दोन-तीन...
अमेरिकेमध्ये कपाशीवर विषाणुजन्य ब्ल्यू...अमेरिकेमध्ये कपाशीवर प्रथमच विषाणूजन्य ब्ल्यू...