Agriculture news in Marathi Agriculture officials should not leave headquarters: MLA Bhuyar | Agrowon

कृषी अधिकाऱ्यांनी मुख्यालय सोडू नये ः आमदार भुयार

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 27 ऑक्टोबर 2020

मोर्शी तालुक्‍यात जून ते ऑगस्ट या कालावधीत अतिवृष्टी, पुरामुळे झालेल्या नुकसानीचा आमदार देवेंद्र भुयार यांनी आढावा घेतला. यावेळी कृषी विभागाचे अधिकारी, कृषी सहायक, तलाठी यांनी मुख्यालयी राहण्याचे  निर्देश त्यांनी दिले.

अमरावती : मोर्शी तालुक्‍यात जून ते ऑगस्ट या कालावधीत अतिवृष्टी, पुरामुळे झालेल्या नुकसानीचा आमदार देवेंद्र भुयार यांनी आढावा घेतला. यावेळी कृषी विभागाचे अधिकारी, कृषी सहायक, तलाठी यांनी मुख्यालयी राहण्याचे  निर्देश त्यांनी दिले.

तहसील कार्यालयात झालेल्या या बैठकीला उपविभागीय अधिकारी नितीन हिंगोले, उपविभागीय कृषी अधिकारी राहुल सातपुते, तहसीलदार डॉ. सिद्धार्थ मोरे, नगराध्यक्ष मेघना मडघे,  राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नरेंद्र जिचकार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष हितेश साबळे, जिल्हा परिषद सदस्य संजय घुलक्षे उपस्थित होते.

मोर्शी तालुक्यात जिरायती पिकाखालील १८ हजार ३५० शेतकऱ्यांचे सोयाबीन पिकाचे १७८६२ हेक्टर क्षेत्र बाधित झाले. कापूस पिकाचे १२.९९, मुगा खालील २३, उडिदाचे ७२, मका १४.८० असे एकूण १७ हजार ९६५  हेक्टर क्षेत्र बाधित झाले. या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना भरपाई मिळावी, याकरिता शासनाकडे तत्काळ प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश आमदार भुयार यांनी अधिकाऱ्यांना दिले.

कृषी अधिकारी, कृषी सहायक, तलाठी मिळत नसल्या संदर्भात शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. त्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांनी मुख्यालयी राहण्याचे निर्देश देण्यात आले. यावेळी राष्ट्रीय कुटुंब अर्थसाहाय्य योजनेतील लाभार्थी भावना बनसोड,  वंदना तिखीले, बेबी खुरसूडे, राजकन्या टिंगणे, रमेश गोबाडे, सिंधू मनोहर यांना प्रत्येकी वीस हजार रुपयांचा धनादेश आमदार भुयार यांच्या हस्ते देण्यात आला. पूर तसेच अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या गावातील नुकसान, नानाजी देशमुख कृषी संजीवनी,  कृषी योजना, अवजारे वाटप योजना यासह विविध योजनांचा आढावा घेण्यात आला.


इतर बातम्या
७२ तासांची सक्ती नको ः आयुक्तपुणे ः विमा कंपन्यांनी कामकाजात तातडीने सुधारणा...
पीकविमा योजनेच्या मूळ उद्देशालाच हरताळपुणे ः पंतप्रधान पीकविमा योजनेच्या माध्यमातून...
अखेर ‘इफ्को टोकियो’ विरोधात गुन्हा दाखलअमरावती : राज्य शासनाने केलेल्या करारानुसार इफ्को...
पळवाटांमुळे पीकविमा भरपाई दुरापास्तशेतकऱ्यांकडून पीकविम्याचा हप्ता भरतेवेळी...
अमरावतीतील २३ हजार हेक्टर शेती बाधित अमरावती : संततधार पावसाने जिल्ह्यातील ५०० गावे...
विमा कंपन्यांबाबत सरकारची बोटचेपी भूमिकापीकविमा योजनेमुळे शेतकऱ्यांऐवजी पीकविमा कंपन्याच...
खामगाव बाजार समितीच्या  कारभाराविरुद्ध...बुलडाणा : खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
केंद्र स्थापन करणार शेतकरी उत्पादक... नवी दिल्ली ः केंद्र सरकारने देशात सुमारे...
सांगलीत ४१ हजार हेक्टरवरील पिके...सांगली : गेल्या आठवड्यात झालेल्या पाऊस,...
धरणांतील पाण्याच्या विसर्गात घटपुणे : राज्यात पावसाचा जोर ओसरू लागल्याने धरणांत...
पुण्यात पंचनामे गतीने सुरूपुणे : जिल्ह्यात नुकसानीचे पंचनामे करण्यास वेग...
परभणी ः मूग, उडदाच्या पीक स्पर्धेसाठी...परभणी ः कृषी विभागातर्फे खरीप हंगामापासून...
रत्नागिरी ‘झेडपी’चे  ८० कोटींचे नुकसान रत्नागिरी : अतिवृष्टीने चिपळूण, खेड, संगमेश्वरसह...
सांगोल्यातील रोगग्रस्त डाळिंब बागांची...सांगोला, जि. सोलापूर : वातावरणात होणारे बदल आणि...
पशुसंवर्धन विकासासाठी पशुपालक,...नाशिक : ‘‘आत्मनिर्भर भारत अंतर्गत २०२०-२१...
खानदेशात भिज पाऊसजळगाव : खानदेशात गेले दोन दिवस अनेक भागात हलका ते...
पशुचिकित्साकांच्या कामबंद  आंदोलनाचा...रिसोड, जि. वाशीम : पशुचिकित्सा व्यावसायिकांनी १६...
हिंगोलीत विमा कंपनीचा अनागोंदी कारभारहिंगोली ः जिल्ह्यात पंतप्रधान पीकविमा योजना...
नाशिक विभागात मिळाल्या १६३१ भूमिहीनांना...नाशिक : कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व...
नुकसानभरपाईपोटी मिळाले २७० रुपयेपाचोरा, जि. जळगाव : खडकदेवळा (ता. पाचोरा) येथील...