agriculture news in Marathi Agriculture PhD admission process will be start tomorrow Maharashtra | Agrowon

राज्यात कृषी पीएचडीची प्रवेश प्रक्रिया उद्यापासून

टीम अॅग्रोवन
रविवार, 17 जानेवारी 2021

राज्याच्या चारही कृषी विद्यापीठांमधील पीएचडी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया उद्यापासून (ता. १८) सुरू होत आहे. महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या नियंत्रणाखाली ही प्रक्रिया पार पडणार आहे.

पुणे ः राज्याच्या चारही कृषी विद्यापीठांमधील पीएचडी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया उद्यापासून (ता. १८) सुरू होत आहे. महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या नियंत्रणाखाली ही प्रक्रिया पार पडणार आहे.

विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज व स्कॅन केलेली कागदपत्रे www.maha-agriadmission.in या संकेतस्थळावर २७ जानेवारीपर्यंत अपलोड करावी लागणार आहेत. राज्यात १३ महाविद्यालयांमध्ये आचार्य, अर्थात पीएचडीच्या २३३ जागा आहेत.

पीएचडीसाठी कृषी, गृहविज्ञान, मत्स्यविज्ञान, अन्न तंत्रज्ञान, कृषी जैव तंत्रज्ञान आणि कृषी अभियांत्रिकी असे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. पीएचडीसाठी महाराष्ट्र कृषी विद्यापीठे परीक्षा मंडळाने सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) घेतली होती. त्यामुळे या परीक्षेचे ७० टक्के गुण आणि पदव्युत्तर पदवीचे ३० टक्के गुण विचारात घेतले जाणार आहेत. विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी संकेतस्थळावर नियमांचे वाचन करावे, असे आवाहन कृषी परिषदेचे शिक्षण संचालक डॉ. हरिहर कौसडीकर यांनी केले आहे. एकापेक्षा जास्त सीईटी दिली असली, तरी अर्ज मात्र एकच भरता येणार आहे. 

‘‘विद्यार्थ्यांना महाविद्यालये व विषय असे विकल्प देण्याची सुविधा आहे. अर्ज जास्त असले, तरी शेवटचा अर्ज विचारात घेतला जाणार आहे. उमेदवारांची गुणवत्ता, प्रवर्ग, विकल्प विचारात घेत जागावाटप होईल,’’ असे परिषदेने स्पष्ट केले आहे. 

परिषदेकडून दुसऱ्या प्रवेश फेरीची वाटप यादी २१ फेब्रुवारीला प्रसिद्ध होईल. २२ ते २३ असा दोन दिवस रिपोर्टिंगचा कालावधी असेल. यानंतर २३ फेब्रुवारीला रिक्त जागा प्रसिद्ध केल्या जातील. २५ ते २६ फेब्रुवारीला तिसरी यादी प्रवेशवाटप फेरी झाल्यानंतर एक मार्चपासून वर्ग सुरू होण्याची शक्यता आहे.

३१ जानेवारीला अंतरिम गुणवत्ता यादी 
पीएचडी प्रवेशासाठी अर्ज दाखल केल्यानंतर अंतरिम गुणवत्ता यादी ३१ जानेवारी प्रसिद्ध केली जाणार आहे. दोन ते पाच फेब्रुवारीदरम्यान तक्रार नोंदणी कालावधी राहील. अंतिम गुणवत्ता यादी ९ फेब्रुवारीला प्रसिद्ध होईल. पहिल्या फेरीची वाटप यादी १२ फेब्रुवारीला प्रसिद्ध होईल. १५ ते १७ फेब्रुवारी हा रिपोर्टिंगचा कालावधी राहणार आहे.


इतर ताज्या घडामोडी
शेतीच्या उन्नतीसाठी ज्ञानच महत्त्वाचे...पुणे : कृषीप्रधान देश असलेल्या भारतात शेतीला...
अवकाळीच्या तडाख्यात शेवग्याचे पुन्हा...नाशिक : गत जानेवारी महिन्यात झालेल्या अवकाळी...
खानदेशात वीजबिल वसुलीसाठी शेतकऱ्यांमागे...जळगाव : खानदेशात कृषिपंपांची वीजबिल थकबाकी...
खानदेशात मका दर सुधारलेजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
नांदेड जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत...नांदेड : जिल्ह्यात खरीप व रब्बी हंगाम २०२०-२१...
‘महाखनिज’मध्ये परराज्यांतील वाळूची...परभणी ः ‘‘राज्य शासनाने परराज्यांतून होणाऱ्या...
पुणे बाजार समितीत पायाभूत सुविधा द्या,...पुणे ः पुणे बाजार समितीमधील भुसार विभागातील...
परभणी : संचालक मंडळाच्या निवडणूकीत...परभणी ः परभणी जिल्हा बॅंक संचालक मंडळाच्या...
सातारा जिल्हा बॅंकेसाठी दोन हजारांवर...सातारा : जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसाठी सोसायटीसह...
सात वर्षांत हमीभावात ऐतिहासिक वाढ ः...नवी दिल्ली : गेल्या सात वर्षांत केंद्र सरकारने...
सोलापुरात शेतकऱ्यांना थेट कर्जवाटप करणारसोलापूर : आर्थिक स्थितीमुळे गेल्या चार-पाच...
पणनची कापूस खरेदी रविवारपासून बंदनागपूर : बाजारात हमीभावापेक्षा कापसाला मिळणारा...
राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी...सोलापूर : सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा या...
शेतीला दिवसा आठ तास वीजपुरवठा करा :...मुंबई : राज्यात वीजेचे दर कमी करण्याचे व...
मराठा आरक्षणाची सुनावणी सर्वोच्च...मुंबई : ‘‘देशातील अनेक राज्यांमधून त्यांच्या...
शॉर्टसर्किटमुळे आग; अकराशे आंबा, काजू...रत्नागिरी : तालुक्यातील शीळ-सड्यावर वणव्याच्या...
घनकचरा पथदर्शी प्रकल्पांसाठी सिंधुदुर्ग...वैभववाडी : स्वच्छ भारत मिशनच्या दुसऱ्या...
अकोल्यात रब्बीसाठी ५४ कोटींचे पीककर्ज...अकोला : यंदाच्या रब्बी हंगमात जिल्ह्यात लागवड...
भाजपला दिला आयारामांनी झटका...सांगली : सांगली-मिरज-कुपवाड महालिकेवर गेल्या अडीच...
तंत्र कोथिंबीर लागवडीचे...कोथिंबीर पिकास नियमित ४ ते ५ दिवसांनी पाणी द्यावे...