agriculture news in Marathi agriculture produce export cost became doubled Maharashtra | Page 2 ||| Agrowon

शेतमाल निर्यात खर्च झाला दुप्पट 

मुकुंद पिंगळे
शनिवार, 23 जानेवारी 2021

लंडनमध्ये डिसेंबरअखेर कोरोनाचा नव्या स्ट्रेन आढळून आल्याने हवाई वाहतूक सेवा प्रभावित झाली. हवाई वाहतूक फेऱ्या कमी झाल्याने निर्यात करण्यासाठी येणारा वाहतूक खर्च दुपटीने वाढला आहे.

नाशिक : लंडनमध्ये डिसेंबरअखेर कोरोनाचा नव्या स्ट्रेन आढळून आल्याने हवाई वाहतूक सेवा प्रभावित झाली. हवाई वाहतूक फेऱ्या कमी झाल्याने निर्यात करण्यासाठी येणारा वाहतूक खर्च दुपटीने वाढला आहे. परिणामी, नाशिकमधून होणारी शेतीमाल निर्यात ७० टक्क्यांनी घटली आहे. तर त्याचा मोठा परिणाम कामकाजावर झाल्याने निर्यातदार व शेतकरी अडचणीत सापडले आहेत. 

लंडनमध्ये कोरोनाचा नवीन स्ट्रेन आढळून आल्याने हवाई वाहतूक फेऱ्यांची संख्या कमी झाली. त्यामुळे सुरू असलेल्या काही विमानांसाठी हवाई वाहतुकीचे दर निर्यातदारांना परवडणारे नाहीत. परिणामी, निर्यातदारांनी कामकाज कमी केल्याने सरासरी होणारी निर्यात अवघी ३० टक्क्यांवर आली आहे. त्यामुळे माल निर्यात होत नसल्याने पिकविलेला निर्यातक्षम शेतमाल स्थानिक बाजारात विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. 

युरोपियन देशांच्या मानकाप्रमाणे रासायनिक अवशेषमुक्त शेतीमाल जिल्ह्यातील शेतकरी पिकवीत आहेत. या अनुषंगाने शेतकऱ्यांशी निर्यातदारांना करारही केले आहेत. काढणीपश्‍चात शेतीमालाची हाताळणी प्रतवारी व पॅकिंग ही कामे भारत सरकारच्या ओझर मिग (ता. निफाड) येथील हॉलकॉन सुविधा केंद्रावरून होते. नंतर मुंबईवरून हवाईमार्गे शेतीमाल लंडन बाजारात जातो. या सुविधा केंद्रावरून दररोज ९० टक्के नाशवंत शेतीमाल निर्यात होतो; मात्र हवाई वाहतूक सेवा बंद झाल्याचा हा मोठा परिणाम आहे. 

काही महिन्यांपूर्वी कामकाज सुरळीत झाल्यानंतर आता पुन्हा नव्या स्ट्रेनमुळे सर्वच कामकाज विस्कळीत झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता प्रवासी वाहतूक विमानांमधून शेतीमाल पाठविण्याची वेळ आली आहे. मात्र दर अधिक असल्याने निर्यातीचे कामकाज कोलमडल्याचे चित्र आहे. 

वाहतूक दराची स्थिती 
टाळेबंदीपूर्वी प्रतिकिलोला ११० ते १२५ रुपये वाहतुकीचा दर होता. मात्र त्यानंतर हवाई वाहतूक मंदावल्याने सुरू असलेल्या काही विमानांमधून २५० ते ३०० रुपये प्रतिकिलो दरम्यान दर द्यावा लागत आहे. त्यामुळे दैनंदिन सरासरी १२ टनांपर्यंत होणारी निर्यात अवघ्या २ टनांवर आल्याची माहिती सुविधा केंद्रातील सूत्रांनी दिली. परिणामी चालू महिन्यात २५० टनांवर निर्यात घटली आहे. 

या शेतीमालाला फटका 
भेंडी, दुधी भोपळा, हिरवी मिरची, वालपापडी, ढेमसे, सुरण, चिकू, शेवगा 
 
गत चार वर्षांतील निर्यातीची स्थिती : 
वर्ष :
निर्यात(टन) 
२०१७ : ४००० 
२०१८ : ३,८०० 
२०१९ : २००० 
२०२० : १००० 

प्रतिक्रिया 
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर हवाई फेऱ्यांची संख्या घटली. परिणामी, काही विमान कंपन्यांनी माल वाहतूक सुरू ठेवली. मात्र त्यांचे दर वाढल्याने निर्यात खर्च परवडणारे नाही. निर्यातक्षम भाजीपाला या ठिकाणी येतो. मात्र हवाई वाहतूक महागल्याने कामकाज अडचणीत आले आहे. पर्यायी जहाज वाहतूक अधिक काळ घेत असल्याने नाशवंत मालासाठी ती सुलभ नाही. त्यामुळे फटका मोठा आहे. 
- सुधाकर सेन, मुख्य कार्यकारी अधिकारी-हॉलकॉन, ओझर मिग, नाशिक  

 
 


इतर अॅग्रो विशेष
दावा अन् वास्तवशेतकरी सन्मान निधी योजनेच्या दोन वर्षपूर्तीच्या...
थंडीचा प्रभाव घटण्यास प्रारंभ पुणे ः अरबी समुद्राच्या परिसरात चक्रीय स्थिती...
केंद्र सरकारकडून ‘पीजीआर’ला मान्यता पुणे : शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या जैव उत्तेजकांना...
बत्तीसशे चौरस फुटांपर्यंतच्या ...मुंबई : राज्यातील ग्रामीण भागातील सुमारे ३,२००...
स्वच्छता, पायाभूत सुविधांमध्ये...पिण्याचे पाणी, वीज, रस्ते यांसारख्या पायाभूत...
एकत्र या अन् ठरवा भावसातारा जिल्ह्यातील एका शेतकऱ्याला कोबीला...
अद्ययावत ‘मंडी’चे स्वप्न!दिल्लीच्या सीमारेषेवर पाच ठिकाणी गेले ९२ दिवस...
राज्यात ७ कोटी ९७ लाख क्विंटल साखरेचे...नगर ः राज्यात यंदाही उसाचे जोरदार गाळप सुरू आहे....
‘लम्पी स्कीन’मुळे दूध उत्पादनाला...नगर ः ‘लम्पी स्कीन’ आजाराचा प्रादुर्भाव झालेल्या...
राज्यात चार नवे कृषी संशोधन प्रकल्पपुणे : राज्यातील कृषी शिक्षण व संशोधनाला चालना...
वंचित शेतकऱ्यांसाठी राज्यांनी पुढाकार...पुणे : ‘‘आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून देशातील...
राज्यात थंडीत किंचित वाढपुणे ः कोकण व मध्य महाराष्ट्रात आकाश निरभ्र...
रत्नागिरी हापूस पोहोचला लंडनलारत्नागिरी ः लंडनस्थित भोसले एंटरप्रायझेस यूके आणि...
रब्बी ज्वारीचा हुरडा वाण विकसितपरभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील...
डोंगरगावात फळपीक केंद्रित प्रयोगशील...नगर जिल्ह्यात अकोले तालुक्यातील डोंगरगाव येथील...
आगाप नियोजनातून आंब्याला उच्चांकी दरकोकणातील काही आंबा बागायतदार आगाप (हंगामपूर्व)...
५० वर्षांच्या वृक्षाचे पर्यावरणीय मूल्य...साधारणतः आपण कुठल्याही वस्तूचे मूल्यमापन विविध...
कोकणात ढगाळ वातावरण पुणे ः अरबी समुद्राच्या आग्नेय भागात चक्रिय...
उन्हाळ कांद्याची बाजारात ‘एन्ट्री’ नाशिक : जिल्ह्यात रब्बी हंगामातील आगाप उन्हाळ...
‘पीएम-किसान’मध्ये महाराष्ट्राचा डंका पुणे : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेत (पीएम-...