Agriculture news in marathi Agriculture related shops in Nashik will be open full time | Agrowon

नाशिकमधील शेती संबंधित दुकाने पूर्णवेळ खुली राहणार 

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 7 मे 2020

नाशिक : खरीप हंगामासाठी अतिशय कमी कालावधी शिल्लक असल्यामुळे शेती आणि शेतीसंबंधित यंत्रसामुग्री, बि-बियाणे आदी दुकानांसाठी मार्गदर्शन सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. गर्दी टाळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व कृषी सेवा केंद्रे, शेतीविषयक विक्री आणि दुरुस्तची दुकाने, केंद्रे, यंत्रसामुग्री दुकाने पूर्णवेळ उघडी ठेवण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी शासकीय आदेशान्वये दिली आहे. 

नाशिक : खरीप हंगामासाठी अतिशय कमी कालावधी शिल्लक असल्यामुळे शेती आणि शेतीसंबंधित यंत्रसामुग्री, बि-बियाणे आदी दुकानांसाठी मार्गदर्शन सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. गर्दी टाळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व कृषी सेवा केंद्रे, शेतीविषयक विक्री आणि दुरुस्तची दुकाने, केंद्रे, यंत्रसामुग्री दुकाने पूर्णवेळ उघडी ठेवण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी शासकीय आदेशान्वये दिली आहे. 

लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि महाराष्ट्र शासनाने ‘खरीप २०२०’ साठी शेतमाल उत्पादन, वाहतूक, वितरण तसेच शेतीसाठी आवश्यक सामुग्री, खते, बि-बियाणे, यंत्रसामुग्री आणि कृषीविषयक इतर बाबी यांच्या सुलभ उपलब्धतेसाठी काही सूचना केल्या आहेत. तसेच शेतीअवजारे, बि-बियाणे, यंत्रसामुग्री यांची दुकाने जरी पूर्णवेळ उघडी राहणार असली तरी अपवादात्मक परिस्थितीत गरज भासल्यास वेळेबाबतीत बंधन घालण्यात येतील. 

तसेच खरीप हंगामासाठी मर्यादित वेळ शिल्लक असल्यामुळे खरीप हंगामपूर्व कामे, मजुरांची वाहतूक, बि-बियाणे, खते आणि यंत्रसामुग्री यांची वाहतूक आणि पुरवठा सुरळीत होण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी तत्काळ योग्य ती कार्यवाही करावी, अशा सूचना मांढरे यांनी दिल्या आहेत. 

कृषी विभागाचा पास गृहीत धरावा 
शेतीच्या कामासाठी मजूर, शेतीपूरक पुरवठा उद्योगासाठी कामगार, कृषी संबंधी विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांच्याकरिता जिल्हा कृषी अधीक्षक, कृषी अधिकारी यांच्याद्वारे नियुक्त प्राधिकारी यांनी वितरित करण्यात आलेला परवाना पास पोलिस विभागाने ग्राह्य धरावा, असेही श्री. मांढरे यांनी सांगितले. 


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी...सोलापूर  : मराठा समाजाला आरक्षण...
मुक्त विद्यापीठात कृषीविषयक अभ्यासक्रम...नाशिक : ‘‘यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त...
सोलापूर जिल्ह्यात दहा हजार हेक्‍टरवर...सोलापूर : जिल्ह्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून...
सोलापूर जिल्हा बॅंक देणार अल्प मुदतीचे...सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी...
परभणी, हिंगोलीत ओल्या दुष्काळाचे सावटपरभणी : परभणी, हिंगोली जिल्ह्यातील अनेक मंडळांत...
जळगाव जिल्ह्यात उडीद, मूग खरेदीची...जळगाव : शासकीय उदीद, मूग खरेदीसंबंधीची प्राथमिक...
परभणीत भरपाईसाठी ‘स्वाभिमानी’ची पिकांसह...परभणी : अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान...
नाशिक जिल्ह्यात खरिपासह भाजीपाला पिके...नाशिक : जिल्ह्याच्या सर्वदूर भागात शनिवारी (...
`औरंगाबाद जिल्ह्यातील नुकासानग्रस्त...औरंगाबाद : सतत सुरू असलेल्या पावसाने कोणत्या...
ऊसतोडणी दर ठरविताना उत्पादकांवरील बोजा...पुणे : दहा लाख ऊसतोडणी कामगारांच्या वतीने विविध...
मराठा आरक्षणावरील अंतरिम स्थगिती उठवावीमुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च...
‘मुळा’तून विसर्ग बारा हजार क्युसेकवर...नगर ः नगर जिल्ह्यातील मुळा धरणाच्या पाणलोटात पाऊस...
शेतकऱ्यांना कॉर्पोरेट कंपन्यांच्या...कोल्हापूर : पाशवी बहुमताच्या बळावर भलेही तुम्ही...
मोताळा तालुक्यात वादळी पावसाने नुकसानबुलडाणा ः जिल्ह्यात शनिवारी (ता. १९) वादळी...
नाशिकमध्ये वाटाण्याची आवक कमीच; दरात...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नागपूर जिल्ह्यात पुराचा २९ हजार...नागपूर : पुरामुळे जिल्ह्यात २९ हजार २६२...
सोलापुरात पितृपंधरवड्यामुळे गवार,...सोलापूर ः पितृपंधरवड्यामुळे सोलापूर कृषि उत्पन्न...
डाळिंब फळपिकातील तेलकट डाग व्यवस्थापनसोलापूर, सांगली, नाशिक आणि नगर यासारख्या...
औरंगाबादमध्ये मूग, उडीद, ज्वारी,...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
बार्शी बाजार समितीत उडीद, मूग हमीभाव...सोलापूर : बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...