शेती, शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी संशोधन करावे ः दादा भुसे

कृषी पदवीधरांना शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी पिकांचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी आवश्यक संशोधनावर लक्ष केंद्रित करावे लागेल, असे प्रतिपादन कृषिमंत्री तथा कृषी विद्यापीठांचे प्रतिकुलपती दादा भुसे यांनी सोमवारी (ता. २५) येथे केले.
Agriculture, research should be done for the progress of farmers: Dada Bhuse
Agriculture, research should be done for the progress of farmers: Dada Bhuse

परभणी ः कृषी विद्यापीठातून बाहेर पडणारे दहा ते पंधरा टक्के पदवीधर कृषीशी संबंधित क्षेत्राची निवड करतात.बदलत्या हवामान स्थितीत शेतकऱ्यांना विविध आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. त्यासाठी कृषी पदवीधरांना शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी पिकांचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी आवश्यक संशोधनावर लक्ष केंद्रित करावे लागेल, असे प्रतिपादन कृषिमंत्री तथा कृषी विद्यापीठांचे प्रतिकुलपती दादा भुसे यांनी सोमवारी (ता. २५) येथे केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचा २३ व्या दीक्षान्त समारंभाच्या अध्यक्षस्थानी भुसे होते. माजी कुलगुरू तथा दक्षिण आशिया जैवतंत्रज्ञान केंद्राचे अध्यक्ष, कृषी शास्त्रज्ञ निवड मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. चारुदत्त मायी हे प्रमुख अतिथी होते. कुलगुरू डॉ. अशोक ढवण, दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत, माजी कुलगुरू डॉ. के. पी. गोरे, विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्य आमदार डॉ. राहुल पाटील, डॉ. एस. टी. बोरीकर, संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, शिक्षण संचालक डॉ. डी. एन. गोखले, विस्तार शिक्षण संचालक डॉ. डी. बी. देवसरकर, कुलसचिव डॉ. धीरजकुमार कदम आदी उपस्थित होते.

डॉ. ढवण म्हणाले, की गेल्या ५० वर्षात मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान विद्यापीठाचे आहे. 

डॉ. चारुदत्त मायी म्हणाले, की केवळ डिजिटल तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांची प्रगती होणार नाही. तर त्यांच्यासोबत काम केल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढेल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com