Agriculture news in Marathi Agriculture revival campaign started from Buldana district | Page 2 ||| Agrowon

कृषी संजीवनी मोहिमेचा बुलडाणा जिल्ह्यातून प्रारंभ

टीम अॅग्रोवन
बुधवार, 23 जून 2021

२१ जून ते १ जुलै या कालावधीत कृषी संजीवनी मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेची सुरुवात राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले यांच्या उपस्थितीत बुलडाणा जिल्ह्यातील चिखला या गावातून झाली.

बुलडाणा ः कृषी विभागाच्या वतीने आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचण्यासाठी २१ जून ते १ जुलै या कालावधीत कृषी संजीवनी मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेची सुरुवात राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले यांच्या उपस्थितीत बुलडाणा जिल्ह्यातील चिखला या गावातून झाली.

प्रगतिशील शेतकरी मुकेश वाघ यांच्या शेतावर सोयाबीन लागवडीचे आधुनिक तंत्रज्ञान व बीबीएफ यंत्राद्वारे पेरणीबाबत प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले.

या वेळी श्री. डवले यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना सोयाबीन या मुख्य पिकाची पेरणी करताना अष्टसूत्रीचा वापर करण्याबाबत आवाहन केले. घरगुती बियाण्याची प्रतवारी करून घरगुती बियाणे वापरणे, बियाण्याची उगवणक्षमता घरच्या घरी तपासून पाहणे व ७० टक्कयांपेक्षा अधिक उगवण क्षमता असलेल्या बियाण्याचा पेरणीसाठी वापर करणे, बीजप्रक्रिया करून पेरणी करणे, योग्य वाणाची निवड करून त्याप्रमाणे बियाण्याची मात्रा वापरणे, पेरणी आधुनिक पद्धतीचा वापर करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी बीबीएफ यंत्राने किंवा पट्टा पद्धतीने पेरणी करणे, पेरणी योग्य खोलीवर व जमिनीत पुरेशी ओल असताना करणे, रासायनिक खताची मात्रा विद्यापीठाने ठरवून दिल्याप्रमाणे करणे तसेच गावाची जमीन सुपीकता निर्देशांकाचा विचार करून करणे आणि तणनाशकाचा योग्य पद्धतीने वापर करणे यामध्ये पेरणीपूर्व तणनाशक किंवा पेरणीनंतरच्या तणनाशकाचा योग्यवेळी व जमिनीत पुरेशी ओल असताना वापर करावा. 

या वेळी विभागीय कृषी सहसंचालक शंकर तोटावार यांनी शेतकऱ्यांना ‘पोकरा’ प्रकल्पातून विविध योजनांचा अधिकाधिक लाभ घेऊन त्याप्रमाणे शेतीत आधुनिक यंत्राचा वापर करण्याचे आवाहन केले.उपविभागीय कृषी अधिकारी संतोष डाबरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नरेंद्र नाईक यांनी सोयाबीनची बीबीएफ यंत्राद्वारे पेरणी करून ‘पोकरा’ योजनेतून मिळणाऱ्या अनुदानासाठी शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाला तालुका कृषी अधिकारी श्री. मेरत, मंडळ कृषी अधिकारी सुनील सुसर व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


इतर बातम्या
सत्तावीस कीडनाशकांच्या बंदीविषयी अहवाल...पुणे ः केंद्रीय कृषी मंत्रालयाने मागील वर्षी...
पंतप्रधान आवास योजनेसाठी ११ लाख नावे...नगर ः ग्रामीण भागातील गरीब, अल्पभूधारक, घर...
राज्यात 'शेतमाल तारणा'तून २७ कोटी...पुणे ः कृषी पणन मंडळाद्वारे बाजार समित्यांद्वारा...
राज्यात आज हलक्या सरींची शक्यता पुणे : राज्याच्या अनेक भागांत पावसाने उघडीप दिली...
पशुचिकित्सा व्यवसायींचा राज्यभर बेमुदत...नगर : पशुचिकित्सा व्यवसायी (डिप्लोमा, पदविकाधारक...
अमरावती : निकृष्ट बियाणेप्रकरणी भरपाईचे...अमरावती ः निकृष्ट बियाण्यासंदर्भाने तालुकास्तरीय...
ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये सर्वसाधारण पावसाची...पुणे : हवामान विभागाने ऑगस्ट व सप्टेंबर महिन्याचा...
पीकविमाधारकांना मिळणार २५ टक्के तात्काळ...पुणेः राज्यात प्रतिकूल परिस्थितीमुळे खरीप...
खोटे बोलण्यासाठी नाही, प्रामाणिक...भिलवडी, जि. सांगली : ‘‘मी तत्काळ मदतीबाबत विचार...
सात-बारासह फेरफारही मिळणार आता ऑनलाइन...पुणे : शेती संबंधीच्या दस्ताऐवजांची संगणकीकृत...
सांगली : पूरबाधितांच्या पंचनाम्यांचा...सांगली : महापुरानंतर आता नुकसानीचे पंचनामे सुरू...
अतिवृष्टीने नुकसान; ३४ हजारांवर अर्जअकोला : गेल्या महिन्यात जिल्ह्यात तीन दिवस...
जमीन अधिग्रहणाला विरोध; आळेफाट्यावर...आळेफाटा, जि. पुणे : पुणे-नाशिक हायस्पीड...
नगरमध्ये मिळाला पीकविमा; श्रेयासाठी...नगर : अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर गेल्या...
पदविकाधारकांना खासगी पशुवैद्यकीय...अकोला : दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन व पशुसंवर्धन...
राळेगावमध्ये कपाशीवर बोंडअळीचा...राळेगाव, जि. यवतमाळ : जिल्ह्याचे मुख्य पीक...
परभणीत ४४६ कोटी ५९ लाख रुपये वितरणपरभणी ः चालू आर्थिक वर्षात (२०२१-२२) जुलै...
अनेक नोंदणीधारक शेतकरी ज्वारी...भालेर, जि. नंदुरबार ः जिल्ह्यात शुक्रवार (ता. ३०...
डाळ व्यापाऱ्याची चार कोटींनी फसवणूक नागपूर : डाळ व्यापाऱ्याला आमिष दाखवून साखरेच्या...
महसूली प्रकरणांचा निपटारा तीन टप्प्यांत...नाशिक : सेवाहक्कांतर्गत १००पेक्षा अधिक व राज्यात...