Agriculture news in marathi With agriculture by rotation of palakhed Support for drinking water | Page 2 ||| Agrowon

पालखेडच्या आवर्तनाने शेतीसह पिण्याच्या पाण्याला आधार

टीम अॅग्रोवन
सोमवार, 19 एप्रिल 2021

पालखेड डाव्या कालव्यातून सिंचनासह बिगर सिंचनाचे आवर्तन देण्यात आल्याने टंचाईच्या झळा सहन करणाऱ्या तालुक्यातील गावांना त्याचा लाभ झाला आहे. 

येवला, जि. नाशिक : पालखेड डाव्या कालव्यातून सिंचनासह बिगर सिंचनाचे आवर्तन देण्यात आल्याने टंचाईच्या झळा सहन करणाऱ्या तालुक्यातील गावांना त्याचा लाभ झाला आहे. या पाण्यामुळे शेतीतील उभ्या पिकांना आधार मिळालाच पण टंचाईग्रस्त गावातील पिण्याच्या पाण्यासाठी देखील फायदा झाला आहे. लाभक्षेत्रातील गोई, कोळगंगा नदीवरील नऊ बंधारेही भरून देण्यात आले आहेत.

पालखेड धरण समूहाच्या लाभक्षेत्रात समाधानकारक पाऊस झाला तथापि धरणाच्या पाणलोट क्षेत्रात कमी पाऊस झाल्याने पालखेड धरण समूहात जवळजवळ ४०० दशलक्ष घनफूट पाण्याची तूट होती. मात्र पालखेड डावा कालव्याचे लाभक्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी रब्बीची मोठ्या प्रमाणात पिके घेतली आहेत. या वर्षी दोन आवर्तने मिळतील या अंदाजाने शेतकऱ्यांनी अधिक क्षेत्रावर पिके घेतली.

वाढीव क्षेत्रास रब्बीचे दोन आवर्तने तसेच पालखेड धरण समूह कमी पाणीसाठा असल्याने आणि रब्बी आवर्तनाची मागणी लाभक्षेत्रातील शेतकरी व संस्थांनी उशिरा केल्यामुळे रब्बी दोन व आकस्मित आरक्षण आवर्तन एकत्र करून पालखेड डावा कालव्याचे आवर्तन १५ मार्चपासून १३ एप्रिलपर्यत सुरू होते.

या आवर्तनात पालखेड डाव्या कालव्यावरील सर्व १६० पाणीवापर संस्थांना त्यांच्या मंजूर कोट्याप्रमाणे पाणी देण्यात आले. तसेच येवला नगरपालिका, ३८ गाव पाणीपुरवठा योजना, मध्य रेल्वे मनमाड व मनमाड नगर परिषद या संस्थाचे साठवण तलाव या आवर्तनातून पूर्ण क्षमतेने भरून देण्यात आले. आकस्मित आरक्षणात मंजूर असलेले दिंडोरी, निफाड व येवला तालुक्यातील सर्व म्हणजे जवळजवळ ५२ गावांना पिण्याचे पाणी देखील पुरविण्यात आले. पालखेडच्या लाभ क्षेत्रात येवल्यातील ४२ गावांचा समावेश असून, या गावांनाही पाण्याचा लाभ झाला आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव ग्रामीण भागात वाढलेला असताना व कार्यक्षेत्रावरील सिंचन कर्मचारी अतिशय कमी असताना देखील आवर्तन यशस्वीरित्या पार पाडण्यात आलेले असल्याची माहिती पालखेड पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राजेश गोवर्धने यांनी दिली. पुढील आवर्तन २५ जूननंतर देण्याचे नियोजन असल्याने सध्या पुरविण्यात आलेले पाणी येवला नगरपालिका, ३८ गाव पाणीपुरवठा योजना, मध्य रेल्वे मनमाड तसेच मनमाड पालिका यांनी जून अखेरपर्यंत पुरवावे, अशा सूचना देखील गोवर्धने यांनी दिल्या आहेत.


इतर ताज्या घडामोडी
भुईमुगाचे वाण निकृष्ट, कंपन्यांवर...यवतमाळ : जिल्ह्यात भुईमुगाच्या शेंगा न धरण्याचे...
नगरमध्ये महावितरणच्या पायाभूत सुविधांचे...नगर : कृषिपंप वीज धोरण २०२०च्या अंमलबजावणीमुळे...
धान चुकाऱ्याअभावी शेतकऱ्यांची आर्थिक...गोंदिया : गेल्यावर्षी आधारभूत दराने धान विक्री...
सांगलीत खरिपासाठी हवे ३३ हजार ६९०...सांगली  : यंदाच्या खरीप हंगामाची तयारी कृषी...
औरंगाबादमध्ये खरबुजाला सरासरी १०००...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
तुलनेत यंदा दुपटीने गाळपकोल्हापूर : गेल्या हंगामापेक्षा यंदाच्या हंगामात...
कृषी सल्ला : कापूस, भुईमूग, कांदा, फळ...जमिनीची खोल नांगरट करावी. त्यामुळे जमिनीत...
अस्वलाकडून होणाऱ्या नुकसानीमुळे शेतकरी...भंडारा : जंगलालगत असलेल्या शेतीत वन्यप्राण्यांचा...
अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल, ‘...मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर...
अति उष्ण, ढगाळ हवामानआठवडा अखेरपर्यंत ते १००६ हेप्टापास्कल इतके राहतील...
पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचे...पुणे ः बहुप्रतीक्षित पुणे-नाशिक सेमी हायस्पीड...
नाशिक : माथाडी युनियनकडून ‘काम बंद’नाशिक : राज्य शासनाच्या विविध माथाडी मंडळातील...
पुणे ‘जि.प.’तर्फे कर्मचाऱ्यांना मिळणार...पुणे ः ‘‘जिल्हा परिषदेच्या बक्षिस योजनेतून आता...
‘खरिपात सोयाबीनचे घरचेच बियाणे वापरा’सातारा : येत्या खरीप हंगामात  सोयाबीनचे...
वाशीम जिल्ह्यात कृषी निविष्ठा...वाशीम : जिल्ह्यातील शेतकरी, कंपनी प्रतिनिधी आणि...
रसवंतीचालक, ऊस उत्पादकांना आर्थिक...बुलडाणा : ‘‘जिल्ह्यासह राज्यभरातील लाखो शेतकरी...
‘ताकारी’तून तिसरे आवर्तन सुरूवांगी, जि. सांगली  : ताकारी योजनेतून यंदाचे...
नगर, नाशिकमध्ये १४ साखर कारखान्यांचा...नगर ः नगर, नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत २६...
सांगलीत द्राक्ष बागांची खरड छाटणी अंतिम...सांगली : पुढील हंगामातील घडांची निर्मिती आणि...
‘कादवा’कडून ३०० चा तिसरा हप्ता...नाशिक : ‘‘कादवा सहकारी साखर कारखान्याचे गळीत...