agriculture news in Marathi agriculture secretary Review Mahabeez Maharashtra | Agrowon

कृषी सचिव डवले यांनी घेतला `महाबीज`चा आढावा

टीम अॅग्रोवन
बुधवार, 16 सप्टेंबर 2020

आगामी रब्बी हंगामासाठी `महाबीज`कडे कोणत्या वाणाचे किती बियाणे उपलब्ध आहे, यंदासाठी काय नियोजन केले याचा आढावा राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले यांनी घेतला.

अकोला ः आगामी रब्बी हंगामासाठी `महाबीज`कडे कोणत्या वाणाचे किती बियाणे उपलब्ध आहे, यंदासाठी काय नियोजन केले याचा आढावा राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले यांनी घेतला. मंगळवारी (ता.१५) श्री. डवले यांनी `महाबीज`ला धावती भेट देत काही अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. 

कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर श्री. डवले यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीला `महाबीज`चे व्यवस्थापकीय संचालक अनिल भंडारी, मार्केटींग व्यवस्थापक अजय कुचे, उत्पादन व्यवस्थापक सुरेश फुंडकर, गुणवत्ता नियंत्रण व्यवस्थापक प्रफुल्ल लहाने, प्रक्रिया व्यवस्थापक प्रशांत पाग्रुत आदी मोजकेच अधिकारी उपस्थित होते. 

येत्या काही दिवसात `महाबीज`च्या बोर्डाची बैठक होऊ घातली आहे. या बैठकीच्या अनुषंगाने असलेल्या मुद्यांचा आढावा श्री. डवले यांनी घेतला. सोबतच त्यांनी आगामी रब्बीसाठी `महाबीज`ने काय नियोजन केले याची माहिती जाणून घेतली. प्रामुख्याने हंगामात शेतकऱ्यांना हरभरा, ज्वारी, गव्हाचे दर्जेदार बियाणे उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी `महाबीज`च्या अधिकाऱ्यांना केल्‍या. 

श्री. डवले यांच्या या दौऱ्याबाबत कृषी खात्यालाही फारशी माहिती नव्हती. ते अकोल्यात पोचले आणि `महाबीज`मध्ये आढावा घेऊन पुढील ठिकाणी रवाना झाले.
 


इतर ताज्या घडामोडी
पुणे विभागात खरीप कांद्याची ४० हजार...पुणे ः खरिपात अति पावसामुळे कांद्याचे नुकसान...
सोलापूर जिल्ह्यात पीक विमा नुकसान...सोलापूर : जिल्ह्यात मागील आठवड्यात झालेल्या...
नुकसान भरपाई देण्यास सरकार कटिबद्ध :...औरंगाबाद  : ‘‘आता झालेल्या पावसाने...
कांदा बियाणे मिळवण्यासाठी अकोल्यात...अकोला ः रब्बी कांदा लागवडीची लगबग सुरु झाली...
लातूर जिल्ह्यात अतिवृष्टीचा...लातूर ः या वर्षी सुरवतीपासून चांगला पाऊस होत...
जळगाव जिल्ह्यात मक्याची ९० हजार...जळगाव  ः खानदेशात ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा...
आजरा तालुक्‍यात भात कापणी सुरूआजरा, जि. कोल्हापूर ः आजरा तालुक्‍यात भात...
कारखानदारांना वाढत्या साखर साठ्याची...मुंबई  : राज्यात गेल्या गाळप हंगामातील ७२...
धानावरील तुडतुड्यांचे वेळीच व्यवस्थापन...नागपूर  : ‘‘सद्यास्थितीत पूर्व विदर्भात...
‘बाभळी’तील पाणी अडविण्यासाठी प्रयत्न...नांदेड : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे...
नांदेड जिल्ह्यात पीकविम्यासाठी कंपनीकडे...नांदेड : जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच पुराच्या...
जायकवाडी प्रकल्पातून ५५ टीएमसी पाण्याचा...औरंगाबाद : जिल्ह्यातील जायकवाडी प्रकल्पातून गत २५...
सांगली जिल्ह्यात सोयाबीनचे उत्पादन...सांगली ः जिल्ह्यात गेल्या पाच ते सहा...
आता खुल्या मिठाईवरही ‘वापर कालावधी’...नागपूर  : मिठाईच्या दुकानातील ‘ट्रे’ वर...
कुलगुरू निवड निकषांबाबत प्र-कुलपतींच्या...पुणे : कुलगुरू निवड निकषांच्या बदलाबाबत कुलपती...
मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्तांना...मुंबई : विदर्भातील पुरापाठोपाठ मराठवाड्यातील...
कापूस खरेदीचे प्रभावी नियोजन करावे ः...मुंबई : आगामी हंगामामध्ये राज्यात सुमारे ४५० लाख...
ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ कार्यान्वित...मुंबई : लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार...
सीमाभागातील साखर कारखान्यांचे मजूर...कोल्हापूर : जिल्ह्यात ऊस तोडणी मजुरांचे आगमन होत...
जळगावात उडदाला ७५०० रुपये क्विंटल दरजळगाव  ः एकीकडे अतिपावसाने उडदाचे मोठे...