शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करावा ः डॉ. देवसरकर

जालना : ‘‘शेतकऱ्यांनी शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करावा,’’ असा सल्ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. डी. बी. देवसरकर यांनी दिला.
 Agriculture should adopt modern technology: Dr. Devasarkar
Agriculture should adopt modern technology: Dr. Devasarkar

जालना  : ‘‘शेतकऱ्यांनी शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करावा,’’ असा सल्ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. डी. बी. देवसरकर यांनी दिला.

कृषी विज्ञान केंद्र, खरपुडी जालनाअंतर्गत कृषी विज्ञान मंडळाचे २७५ वे मासिक चर्चासत्र ५ जुलै २०२० रोजी Google Meet App द्वारे ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आले होते. फळ संशोधन केंद्र, औरंगाबादचे प्रमुख शास्त्रज्ञ तथा प्रभारी अधिकारी डॉ. एम. बी. पाटील, परभणी कृषी विद्यापीठाचे कीटकशास्त्रज्ञ विभाग प्रमुख डॉ. एस. डी. बंटेवाड, कृषी विज्ञान केंद्र, खरपुडी जालनाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख एस. व्ही. सोनुने उपस्थित होते. 

डॉ. देवसरकर म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांनी एकत्रितपणे येऊन खरीप हंगामातील सर्व पिकांची एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन करावे. पेरू बाहेरच्या देशात मोठ्या प्रमाणावर निर्यात करण्यासाठी वाव आहे. शेतकऱ्यांनी अति घन लागवड करून अधिकचे उत्पादन वाढवावे. कापूस आणि तूर पिकाच्या आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा. सोयाबीन व हळद पिकासाठी बीबीएफ तंत्रज्ञानाचा वापर करावा.’’

डॉ. पाटील म्हणाले, ‘‘माती परीक्षण करूनच फळबागांची लागवड करावी. पेरूची विविध वाण आहेत. परंतु, ललित, लखनऊ-४९, अलाहाबाद सफेदा या वाणांची उत्पादकता मराठवाड्यात जास्त आहे. तर, मोसंबीमध्ये नुसेलर हे वाण  चांगले उत्पादन देतात. लागवडीनंतर फळबागेस पाणी व्यवस्थापन करणे आवश्यक आहे.’’

‘‘फळबागेस खत व्यवस्थापन करावे, फेर्टिगेशन पद्धतीने खत दिले, तर ८० टक्के फायदा होईल. पेरू व मोसंबीच्या बागांवर एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन करताना उत्पादकता वाढणे, खर्च कमी करण्यासाठी प्रयत्न करावे. फळबागेची दक्षिण-उत्तर दिशेने लागवड केली, तर हवा खेळती राहील,’’ असेही त्यांनी सांगितले.

डॉ. बंटेवाड म्हणाले, ‘‘कपाशीत गुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापन करताना रेफ्युजी म्हणून नॉन बीटी कापूस लागवड करावी. कमी कालावधीच्या कपाशी पिकांचा वाण निवडावा. उडीद, मूग, चवळी, मका या अंतरपिकाची लागवड करावी. सोयाबीनमध्ये घाटे अळी, उंट अळी, चक्री भुंगा अळी, केसाळ अळी, खोड माशी, पाने पोखरणाऱ्या अळीचे नियोजन न केल्यास ३० ते ३५ टक्के उत्पादनात घट होते. शेत तण मुक्त ठेवावे, जेणेकरून उत्पादनात घट येणार नाही. जैविक पद्धतीचा अवलंब करावा.’’ एस. व्ही. सोनुने यांनी प्रास्ताविक केले. राहुल चौधरी यांनी आभार मानले.    

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com