Agriculture news in Marathi Agriculture system will be ready: Dheeraj Kumar | Agrowon

कृषी यंत्रणेला तत्पर करणार ः धीरजकुमार

टीम अॅग्रोवन
सोमवार, 18 जानेवारी 2021

मराठवाड्यासह राज्यातील कृषी विस्तार व विकास कार्यालयातील अडचणी दूर करून त्याला चालना देण्याचा प्रयत्न आपण सुरू केला आहे. त्यासाठी प्रत्येक विभागाचा आढावा घेऊन वस्तुनिष्ठता जाणून घेऊन कृषी यंत्रणेला सेवेसाठी तत्पर करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे मत कृषी आयुक्‍त धीरजकुमार यांनी रविवारी (ता. १७) ‘ॲग्रोवन’शी बोलताना व्यक्‍त केले.

औरंगाबाद : मराठवाड्यासह राज्यातील कृषी विस्तार व विकास कार्यालयातील अडचणी दूर करून त्याला चालना देण्याचा प्रयत्न आपण सुरू केला आहे. त्यासाठी प्रत्येक विभागाचा आढावा घेऊन वस्तुनिष्ठता जाणून घेऊन कृषी यंत्रणेला सेवेसाठी तत्पर करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे मत कृषी आयुक्‍त धीरजकुमार यांनी रविवारी (ता. १७) ‘ॲग्रोवन’शी बोलताना व्यक्‍त केले.

कृषी आयुक्‍त धीरजकुमार म्हणाले, की विविध योजनांची अंमलबजावणी सुरू असली, तरी त्याला अधिक गती देण्याची गरज आहे. कृषी विस्तार कार्यातून वेळेवर व उचित सल्ला शेतकऱ्यांना देण्याची व्यवस्था निर्माण करणे आवश्‍यक आहे. उत्पादनापुरते मर्यादित न राहता प्रक्रिया, उत्पादक ते ग्राहक थेट विक्री, शेतीमाल मूल्यवर्धनाच्या साखळ्या निर्माण करण्यावर भर हवा. ग्राहक व उद्योगाची गरज, मागणी लक्षात घेऊन शेतकऱ्यांना तसे उत्पादन वा प्रक्रिया तंत्र अवगत करून द्यावे लागेल. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, स्मार्ट, विकेल ते पिकेल यासह योजनांची अंमलबजावणी हवी. फरदड मुक्‍ती, घरचेच सोयाबीन बियाणे वापर याबाबत जागरूकता करण्याच्या सूचना दिल्या आहेत. डीबीटी पोर्टलवरील तांत्रिक अडचणी दूर केल्याने पुढील आठवड्यापर्यंत लाभासाठीच्या अर्जांची ऑनलाइन लॉटरी पद्धतीने निवडीचे काम सुरू होणे अपेक्षित आहे.

बैठकीला आत्माचे संचालक किशनराव मुळे, विभागीय कृषी सहसंचालक डॉ. डी. एल. जाधव यांच्यासह औरंगाबादचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. तुकाराम मोटे, जालनाचे अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांच्यासह उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी आदींची उपस्थिती होती.

अडीच तास चालली आढावा बैठक
औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यांत कृषी विभागाच्या योजनांची स्थिती, अंमलबजावणी याविषयीचा आढावा कृषी आयुक्‍त धीरजकुमार यांनी शनिवारी (ता. १७) घेतला. शनिवारी जालना जिल्ह्यातील क्षेत्रीय भेटीवरून परतल्यानंतर औरंगाबाद येथील राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाच्या सभागृहात बैठक घेण्यात आली. रात्री ८.३० वाजता सुरू झालेली ही बैठक रात्री ११.३० वाजेपर्यंत चालली. जिल्हानिहाय योजनांचा आढावा तसेच यंत्रणेची कामाची गती, त्यामधील उणिवा, त्या दूर करण्यासाठी नेमक काय करता येईल याचा सविस्तर आढावा या बैठकीत घेण्यात आला.


इतर ताज्या घडामोडी
शेतीच्या उन्नतीसाठी ज्ञानच महत्त्वाचे...पुणे : कृषीप्रधान देश असलेल्या भारतात शेतीला...
अवकाळीच्या तडाख्यात शेवग्याचे पुन्हा...नाशिक : गत जानेवारी महिन्यात झालेल्या अवकाळी...
खानदेशात वीजबिल वसुलीसाठी शेतकऱ्यांमागे...जळगाव : खानदेशात कृषिपंपांची वीजबिल थकबाकी...
खानदेशात मका दर सुधारलेजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
नांदेड जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत...नांदेड : जिल्ह्यात खरीप व रब्बी हंगाम २०२०-२१...
‘महाखनिज’मध्ये परराज्यांतील वाळूची...परभणी ः ‘‘राज्य शासनाने परराज्यांतून होणाऱ्या...
पुणे बाजार समितीत पायाभूत सुविधा द्या,...पुणे ः पुणे बाजार समितीमधील भुसार विभागातील...
परभणी : संचालक मंडळाच्या निवडणूकीत...परभणी ः परभणी जिल्हा बॅंक संचालक मंडळाच्या...
सातारा जिल्हा बॅंकेसाठी दोन हजारांवर...सातारा : जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसाठी सोसायटीसह...
सात वर्षांत हमीभावात ऐतिहासिक वाढ ः...नवी दिल्ली : गेल्या सात वर्षांत केंद्र सरकारने...
सोलापुरात शेतकऱ्यांना थेट कर्जवाटप करणारसोलापूर : आर्थिक स्थितीमुळे गेल्या चार-पाच...
पणनची कापूस खरेदी रविवारपासून बंदनागपूर : बाजारात हमीभावापेक्षा कापसाला मिळणारा...
राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी...सोलापूर : सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा या...
शेतीला दिवसा आठ तास वीजपुरवठा करा :...मुंबई : राज्यात वीजेचे दर कमी करण्याचे व...
मराठा आरक्षणाची सुनावणी सर्वोच्च...मुंबई : ‘‘देशातील अनेक राज्यांमधून त्यांच्या...
शॉर्टसर्किटमुळे आग; अकराशे आंबा, काजू...रत्नागिरी : तालुक्यातील शीळ-सड्यावर वणव्याच्या...
घनकचरा पथदर्शी प्रकल्पांसाठी सिंधुदुर्ग...वैभववाडी : स्वच्छ भारत मिशनच्या दुसऱ्या...
अकोल्यात रब्बीसाठी ५४ कोटींचे पीककर्ज...अकोला : यंदाच्या रब्बी हंगमात जिल्ह्यात लागवड...
भाजपला दिला आयारामांनी झटका...सांगली : सांगली-मिरज-कुपवाड महालिकेवर गेल्या अडीच...
तंत्र कोथिंबीर लागवडीचे...कोथिंबीर पिकास नियमित ४ ते ५ दिवसांनी पाणी द्यावे...