agriculture news in Marathi agriculture technology festival in krushi vidnyan kendra form today Maharashtra | Agrowon

कृषी विज्ञान केंद्राच्या तंत्रज्ञान महोत्सवाला आजपासून सुरुवात

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 21 जानेवारी 2020

सोलापूर ः ‘‘सोलापुरातील कृषी विज्ञान केंद्राच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त सोलापुरातील कृषी विज्ञान केंद्रात ‘कृषी तंत्रज्ञान महोत्सव २०२०’ चे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी (ता.२१) आणि बुधवारी (ता.२२) असा दोन दिवस हा महोत्सव चालेल. या महोत्सवादरम्यान सकाळी १० ते ११ या वेळेत शिवारफेरीचे आयोजन करण्यात आले आहे,’’ अशी माहिती वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा केंद्राचे प्रमुख लालासाहेब तांबडे यांनी दिली. 

सोलापूर ः ‘‘सोलापुरातील कृषी विज्ञान केंद्राच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त सोलापुरातील कृषी विज्ञान केंद्रात ‘कृषी तंत्रज्ञान महोत्सव २०२०’ चे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी (ता.२१) आणि बुधवारी (ता.२२) असा दोन दिवस हा महोत्सव चालेल. या महोत्सवादरम्यान सकाळी १० ते ११ या वेळेत शिवारफेरीचे आयोजन करण्यात आले आहे,’’ अशी माहिती वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा केंद्राचे प्रमुख लालासाहेब तांबडे यांनी दिली. 

मंगळवारी (ता. २१) सकाळी ११ वाजता बार्शी रस्त्यावरील कृषी विज्ञान केंद्रात खासदार डॉ. जयसिद्धेश्‍वर महास्वामी यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्‌घाटन होईल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शबरी कृषी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रदीप गायकवाड असतील. एम. एस. सी. पी. चे संचालक डी. एल. तांभाळे, राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राच्या संचालिका डॉ. ज्योत्स्ना शर्मा, विभागीय कृषी संशोधन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. व्ही. एम. अमृतसागर, डॉ. नितीन मार्कंडेय, डॉ. सी. बी. देवेज्ञ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार उपस्थित राहणार आहेत. 

महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी तांत्रिक सत्रात शास्त्रज्ञ डॉ. सुजोग सहा, स्टेट बॅंक ऑफ इंडियाचे सहायक महाव्यवस्थापक सुभाष उकरंडे, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक बी. जी. यशवंते मार्गदर्शन करणार आहेत. समारोप कार्यक्रमाला आमदार प्रणिती शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहेत. या वेळी प्रगतिशील द्राक्ष उत्पादक दत्तात्रय काळे आणि उद्योजिका वैशाली आवारे त्यांचे अनुभव कथन करणार आहेत. 

कृषी प्रदर्शनाचेही आयोजन
दोन दिवसाच्या महोत्सवाच्या कालावधीत कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात आधुनिक कृषी तंत्रज्ञानाबाबत माहिती देणारी साधने, भित्तिपत्रके, घडीपुस्तिका, सुधारित अवजारे, कृषी निविष्ठा, सोयाबीनयुक्त प्रक्रियायुक्त पदार्थविक्री आदींची माहिती दिली जाणार आहे. १५ पिकांतील ३६ वाण व सुधारित व आधुनिक शिफारशीवर आधारित ४८ कृषी तंत्रज्ञान प्रात्यक्षिके आयोजिली आहेत.


इतर अॅग्रो विशेष
संघर्ष येथील संपणार कधी? शेती कसत असताना शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी, करावा...
`ज्ञानेश्‍वरी'त दडलंय कृषी विज्ञान कां सु क्षेत्री बीज घातले।  ते आपुलिया परी...
निर्यातबंदी उठविल्याचे कांदा बाजारात...नाशिक : केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री...
साडेआठशे कोटींची एफआरपी थकलीपुणे: राज्यातील साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक...
‘जानुबाई’, ‘केशवराज’ संस्था ठरल्या...पुणे: पाणीवापर संस्थांच्या माध्यमातून प्रभावी...
साम टीव्ही न्यूज महाराष्ट्रात ‘नंबर १’मुंबई ः सर्वोत्तम न्यूज चॅनेल्सच्या स्पर्धेत ‘...
कृषी परिषदेने विद्यापीठांसाठी नेमले...पुणे : महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन...
विदर्भात वादळी पावसाची शक्यतापुणे: पावसाला पोषक हवामान होत असल्याने विदर्भ,...
शेतकऱ्यांना खते, बियाणे अन् महिलांना...शुद्ध पाणीपुरवठा, गावाअंतर्गत सिमेंट रस्ते,...
सांगलीत तूर खरेदी ठप्पसांगली ः जिल्ह्यात हेक्टरी २५७ किलोच तूर खरेदी...
राज्यात गारठा वाढलापुणे  : उत्तरेकडून थंड वाऱ्यांचे प्रवाह...
चीनला द्राक्ष निर्यात सुरूसांगली ः जिल्ह्यात गेल्या वर्षी झालेल्या...
‘लिंकिंग’बाबत कंपन्यांना नोटिसापुणे  : रासायनिक खतांच्या बाजारपेठेत होत...
बाजार समित्यांच्या निवडणुका होणार...मुंबई  ः राज्यातील कृषी उत्पन्न बाजार...
भाजीपाला शेतीतून पेलल्या साऱ्या...लग्नानंतर अवघ्या तीन वर्षातच पतीच्या निधनामुळे...
कांद्यावरील निर्यातबंदी हटविली;...नवी दिल्ली : चार महिन्यापूर्वी कांद्यावर...
सूक्ष्म सिंचन योजनेचा सात वर्षानंतर...अकोला ः सूक्ष्म सिंचनाचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना...
कोल्हापुरातील गूळ हंगाम अंतिम टप्प्यातकोल्हापूर : यंदाचा गूळ हंगाम अंतिम टप्प्यात येत...
पाणीवापराचे तंत्र समजून निर्यातक्षम...सिंचन व्यवस्थापन हा प्रयोगशील व प्रगतिशील शेतीतील...
सकाळी गारठा, तर दुपारी चटकापुणे : राज्यात कमाल तापमानातील वाढीबरोबरच किमान...