agriculture news in Marathi agriculture trade will be promoted by export center Maharashtra | Page 2 ||| Agrowon

निर्यात केंद्रामुळे कृषी व्यापाराला चालना मिळेल : डॉ. चिंताला

टीम अॅग्रोवन
रविवार, 16 मे 2021

मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चरच्या (एमसीसीआयए) माध्यमातून साकारत असलेल्या ‘कृषी निर्यात माहिती व मार्गदर्शन केंद्रा’मुळे राज्याच्या कृषी अर्थव्यवस्थेला दिशा मिळेल.

पुणे ः मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चरच्या (एमसीसीआयए) माध्यमातून साकारत असलेल्या ‘कृषी निर्यात माहिती व मार्गदर्शन केंद्रा’मुळे राज्याच्या कृषी अर्थव्यवस्थेला दिशा मिळेल. तसेच निर्यातीला १०० दशलक्ष डॉलर्सच्या पुढे नेण्याचे ध्येय गाठता येईल, असे प्रतिपादन नाबार्डचे अध्यक्ष डॉ. जी. आर. चिंताला यांनी केले. 

‘एमसीसीआयए’ व ‘नाबार्ड’च्या संयुक्त प्रयत्नांतून पुण्यात सुरू झालेल्या कृषी निर्यात केंद्राचे उद्‌घाटन दूरदृश्‍यप्रणालीद्वारे करताना डॉ. चिंताला बोलत होते. या वेळी एमसीसीआयएच्या कृषी व्यवसाय समितीचे अध्यक्ष उमेशचंद्र सरंगी, कृषी आयुक्त धीरज कुमार, ‘एमसीसीआयए’चे अध्यक्ष सुधीर मेहता व महासंचालक प्रशांत गिरबाने तसेच इतर मान्यवर सहभागी झाले होते. विशेष म्हणजे भारतीय क्रिकेट संघाचा उपकर्णधार अजिंक्य राहणे यानेही कार्यक्रमाला हजेरी लावत शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी होत असलेल्या या उपक्रमाला भरभरून शुभेच्छा दिल्या. 

‘‘देशाच्या कृषी निर्यातीत या केंद्राची भूमिका मोठी राहील. जगात सध्या आपण निर्यातीत तेराव्या क्रमांकावर आहोत. यात राज्यातून होणारी कृषी निर्यात ३० दशलक्ष डॉलर्सच्या आसपास आहे. मात्र अशा उपक्रमांमुळे निर्यातीत आता १०० दशलक्ष डॉलर्सची झेप घेण्याची ताकद मिळेल,’’ असे डॉ. चिंताला यांनी नमूद केले. 

‘एमसीसीआयए’चे अध्यक्ष सुधीर मेहता यांनी या केंद्राच्या उभारणीत सहभागी झाल्याबद्दल नाबार्डचे आभार मानले. ‘‘सध्या राज्याची व्यवस्था एका चिंताजनक स्थितीतून जात आहे. मात्र कोरोनानंतरचे जग हे अतिशय वेगळे असेल. अशा स्थितीत नाबार्डच्या माध्यमातून कृषी निर्यातीच्या बळकटीकरणासाठी स्वतंत्र केंद्र सुरू होत आहे. चेंबरसाठी कृषी क्षेत्र मोलाचे आहे. या क्षेत्राला निर्यातीच्या माध्यमातून भविष्य मिळेल,’’ असा आशावाद मेहता यांनी व्यक्त केला. 

दरम्यान, राज्यातील शेतकरी, निर्यातदार व निर्यातीशी संबंधित सर्व घटकांना मार्गदर्शक ठरणाऱ्या कृषी निर्यात माहिती केंद्राबाबत www.mcciapune.com या संकेतस्थळावर तपशील देण्यात आले आहेत, असे एमसीसीआयएच्या वतीने सांगण्यात आले. 

प्रशिक्षणातून बळकटी देणार 
गरजेनुसार नेमकी माहिती व मार्गदर्शन करून राज्याच्या कृषी व्यवस्थेला निर्यातवाढीच्या माध्यमातून बळकट करण्याचे ध्येय या केंद्राचे आहे. त्यासाठी आम्ही विविध घटकांना प्रशिक्षण देणार आहोत. फळबाग व्यवस्थापन, गुणवत्तापूर्ण उत्पादन, ब्रॅंडिंग, पॅकहाउस व वाहतूक व्यवस्थापन तसेच जागतिक दर्जाचे निर्यात निकष याची माहिती या केंद्रातून दिली जाणार आहे, असे श्री. सरंगी यांनी सांगितले. 


इतर बातम्या
सोमवारपासून पावसाचा प्रभाव कमी होणार पुणे : दक्षिण कोकण व मध्य महाराष्ट्रात पावसाने...
कृषी परिषदेत संचालक नेमण्यासाठी मुहूर्त...पुणे ः राज्याच्या कृषी संशोधनाला चालना देण्यासाठी...
कोकणात जोरदार पाऊसपुणे : कोकणातील बहुतांशी भागांत पावसाने चांगलेच...
अमरावती विभागात कर्जवाटपात...यवतमाळ : पीककर्ज वाटपासाठी शासनाने बँकांना...
आदिवासींच्या जमिनींचा शोध घेण्यासाठी ‘...बुलडाणा : संग्रामपूर तालुक्यातील चिचारी येथील...
‘एफआरपी’चा अभ्यास सुरू पुणे ः राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिल्या...
‘क्रॉपसॅप’ प्रकल्पात १७ पिकांचा समावेश पुणे ः राज्यात यंदा पिकांवरील कीड-रोग सर्वेक्षण व...
यवतमाळमध्ये ६५ लाखांचे बोगस बीटी...यवतमाळ : जिल्ह्यात खरिपाची लगबग सुरू आहे. याचा...
काळ्याफिती लावून किसानपुत्रांचे आंदोलनआंबेजोगाई, जि. बीड : किसानपुत्र आंदोलनाच्या...
हमीभावाने एक हजार क्विंटल मका खरेदीऔरंगाबाद : आधारभूत किमतीने शेतीमाल खरेदी...
नांदेडमध्ये खरीप पेरणी सुरूनांदेड : जिल्ह्यात जून महिन्याच्या प्रारंभापासून...
‘पशुसंवर्धन’च्या योजनांसाठी केंद्राकडून...पुणे ः पशुसंवर्धनाबरोबरच दूध आणि प्रक्रिया उद्योग...
पीककर्ज व्याज सवलत योजनेस ३० जूनपर्यंत...अकोला : शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी पेरणीच्या आधी...
पुणे जिल्ह्यातील आठवडी बाजार बंदचपुणे : ग्रामीण भागातील अर्थ व्यवस्थेचा कणा असलेले...
औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यांत तीन...औरंगाबाद : यंदाच्या खरीप हंगामात १५ जून...
जळगाव जिल्ह्यातील कृषी केंद्रांची तपासणीजळगाव ः जिल्ह्यात कृषी केंद्रांमधील बियाणे साठा,...
नगरमध्ये साडेपाच हजार हेक्टरवर फळबाग... नगर : नगर जिल्ह्यात गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही...
मराठवाड्यात पीककर्ज वाटप धीम्या गतीनेच औरंगाबाद : मराठवाड्यात यंदाच्या खरीप हंगामासाठी...
कोल्हापुरात पाऊस सुरूच; नद्यांच्या...कोल्हापूर : जिल्ह्याच्या बहुतांशी भागात पावसाच्या...
साखर कारखान्यांच्या कर्जांची चौकशी करानगर : शेतकऱ्यांना पीककर्ज द्यायचे झाल्यास अत्यंत...