agriculture news in Marathi agriculture university employee will be agitate for seventh pay Maharashtra | Agrowon

कृषी विद्यापीठ कर्मचारी करणार वेतन आयोगासाठी आंदोलन

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 20 ऑक्टोबर 2020

सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीची पूर्तता होत नसल्याने कृषी विद्यापीठ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासून (ता.२७) आंदोलनाची हाक दिली आहे.

नागपूर: सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीची पूर्तता होत नसल्याने कृषी विद्यापीठ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासून (ता.२७) आंदोलनाची हाक दिली आहे. विविध टप्प्यात हे आंदोलन केले जाईल, अशी माहिती कर्मचारी समन्वय संघाकडून देण्यात आली.

 राज्यात बहुतांश शासकीय विभागांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे. पारंपरिक विद्यापीठांचा देखील यामध्ये समावेश आहे. राज्यातील कृषी विद्यापीठाचे कर्मचारी मात्र अद्यापही सातव्या वेतन आयोगापासून वंचित आहेत. शासन, प्रशासनस्तरावर गेल्या पंधरा महिन्यांपासून याकरिता पाठपुरावा केला जात आहे.  कृषिमंत्र्यांकडे देखील याबाबत वारंवार चर्चा झाली. परंतु त्यातून काहीच सकारात्मक निघत नसल्याने अखेरीस आंदोलन करण्याचा निर्णय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनांनी घेतला आहे.

रविवारी राज्यातील चारही कृषी विद्यापीठातील संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची ऑनलाइन बैठक या संदर्भाने पार पडली. या बैठकीत आंदोलनावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यानुसार मंगळवारी (ता.२०) चारही कृषी विद्यापीठातील कुलसचिव, स्थानिक तहसीलदार, जिल्हाधिकारी यांना निवेदन देत आंदोलनाची माहिती दिली जाणार आहे. 

मंगळवारी (ता.२७) ऑनलाइन जॉइंट अग्रोस्को होणार आहे. त्याच दिवसापासून काळ्या फिती लावून काम केले जाईल. दुपारी एक ते दोन जेवणाची वेळ आहे. यातील एक ते दीड या वेळेत गांधीगिरी म्हणून श्रमदान करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २ नोव्हेंबरपासून लेखनिबंद तर सहा नोव्हेंबरपासून सामूहिक रजा आंदोलन केले जाईल. दोन दिवस सामूहिक रजा आंदोलन केल्यानंतर दखल न घेतल्यास बेमुदत संपावर जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.

प्रतिक्रिया
राज्यात केवळ कृषी विद्यापीठाचे कर्मचारी सातव्या आयोगापासून वंचित आहेत. गेल्या पंधरा महिन्यांपासून याकरिता पाठपुरावा केला जात आहे. तरी दखल घेण्यात न आल्याने आंदोलनाशिवाय आमच्याकडे पर्याय उरला नाही. विविध टप्प्यात हे आंदोलन केले जाणार आहे. 
- डॉ. सि.डी. देवकर, समन्वयक, महात्मा फुले कृषी विद्यापीठ कर्मचारी समन्वय संघ, राहुरी, जि. नगर


इतर ताज्या घडामोडी
नाशिकमध्ये ‘स्वाभिमानी’चा रात्रभर...नाशिक  : दिल्लीत गेल्या सात दिवसांपासून...
सोलापूर जिल्ह्यातील ६५८...सोलापूर : जिल्ह्यातील मुदत संपलेल्या ६५८...
कसमादेत बायोगॅस संयंत्र उभारण्यास पसंती देवळा, जि. नाशिक : मृत कोंबडी पक्षांची...
नांदेडमध्ये ‘पणन’कडून कापसाची २६ हजार...नांदेड : महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक...
कृषी कायद्यांविरोधात जागरण आंदोलनपुणे ः केंद्र सरकारच्या नवीन कृषी आणि पणन...
परभणीत केंद्र सरकारविरुद्ध निदर्शनेपरभणी : शेतकरीविरोधी कायदे रद्द करण्याच्या...
निम्न दुधनाच्या दोन्ही कालव्यात पाणीपरतूर, जि. जालना ः ‘‘रब्बी हंगामातील...
औरंगाबादमध्ये `स्वाभिमानी’चे...औरंगाबाद : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा...
सोलापुरात ‘स्वाभिमानी’चा जागर सोलापूर : दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी...
धुळे- नंदुरबार मतदारसंघात पटेलांपुढे...धुळे ः विधान परिषदेच्या धुळे- नंदुरबार...
आश्वासनानंतर शेतकरी संघटनेचे आंदोलन...पुणे ः राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये...
साताऱ्यात स्वाभिमानी संघटनेचे रात्रभर...सातारा : कृषी विधेयकाविरोधात पंजाब आणि हरियाना...
सिंचनासाठी ‘वान’वरून जलवाहिनी उभारावीतेल्हारा, जि. अकोला ः शासनाने अगोदर सिंचनासाठी...
वहितीदारांना ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी...नांदेड : ‘‘शेती करताना विविध कारणांनी शेतकऱ्यांचा...
बीड जिल्ह्यात अडीच लाखांवर शेतकरी...बीड ः महाविकास आघाडी सरकारच्या महत्वकांक्षी...
काँग्रेसने ५८ वर्षांनी भेदला भाजपचा गडनागपूर : नागपूर पदवीधर मतदारसंघात ५८ वर्षांनी...
लाडांच्या घरात ५८ वर्षांनंतर आमदारकीसांगली : तास धरून काम करणाऱ्या हाडाच्या...
जमिनीची सुपीकता जपण्यासाठी जैवविविधतेचे...परभणी ः मातीची पर्यायाने शेत जमिनीची सजीवता,...
आघाडीने चारली भाजपला धूळपुणे ः महाविकास आघाडी म्हणून एकत्रित लढलेल्या...
रत्नागिरीत जमिनीमध्ये नत्र, स्फुरदचे...रत्नागिरी ः जिल्ह्यातील जांभ्या जमिनीत नत्रासह...