कृषी विद्यापीठ तज्ज्ञांची शिवाराला भेट

कृषी विद्यापीठ तज्ज्ञांची शिवाराला भेट
कृषी विद्यापीठ तज्ज्ञांची शिवाराला भेट

गडचिरोली ः केव्हीके सोनापूर तसेच कृषी विद्यापीठाचा कडधान्य संशोधन विभाग यांच्या संयुक्‍त सहकार्याने माळंदा (ता. धानोरा)  येथे शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले.

प्रशिक्षण वर्गात कडधान्य संशोधन विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. ए. एन. पाटील, डॉ. एम. डी. गिरी, डॉ. राजेश झंझाड, कार्यक्रम समन्वयक संदीप कऱ्हाळे, श्री. कपाळे, ज्ञानेश्‍वर ताथोड, पुष्पक बोथीकर, समीर कुरेशी, सरपंच काशीराम कोवा, प्रयोशगील शेतकरी कानोजी पदा, देवीदास पदा, परसराम पदा, क्रिष्णा भुरकुऊया उपस्थित होते. 

लाखोळी आणि उडीद पिकाच्या वाढीसाठी तणनियंत्रण करणे आणि योग्य व्यवस्थापन याबाबींची गरज डॉ. ए. एन. पाटील यांनी विशद केली. या पिकांविषयी उपस्थित शेतकऱ्यांच्या शंकाचे निरसनदेखील त्यांच्याव्दारे करण्यात आले. डॉ. गिरी यांनी दाळवर्गीय पिकांची वाढ आणि फळधारणेच्या वेळी घ्यावयाची काळजी याविषयी माहिती दिली. 

कडधान्याची वाढती मागणी लक्षात घेता उत्पादनात वाढ करणे आणि अधिक उत्पन्न मिळविण्याकरिता डाळवर्गीय पिकांच्या लागवडीत सातत्य ठेवण्याचा सल्लाही त्यांनी दिला. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com