कृषी विद्यापीठ देणार सेंद्रिय कापसाचा वाण

जागतिक आरोग्य संघटनेने जी. एम. तंत्रज्ञानाचे धोके अधोरेखित केले आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर सेंद्रिय कापडाची मागणी होत आहे. त्याची दखल घेत आम्ही थेट सेंद्रिय शेती व्यवस्थापनाद्वारे कापूस वाण तयार करून त्यापासून तयार कापडाचा पर्याय ग्राहकांकरिता उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याकरिता पहिल्या टप्प्यात ३० सेंद्रिय कापूस वाणावर काम करून त्यातील सर्वोतम वाणाचा पर्याय दिला जाईल. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाकडे हे संशोधनाचे कार्य सोपविण्यात आले आहे. - तनय जोशी, समन्वयक, सीडिंग द ग्रीन फ्युचर रिसर्च इन्‍स्‍टिट्यूट ऑफ ऑरगॅनिक ॲग्रिकल्चर, स्वित्झर्लंड
सेंद्रिय कापूस वाणाच्या संशोधनाचे कार्य डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर सुरू आहे. त्याविषयी माहिती देताना डॉ. आदिनाथ पसलावार.
सेंद्रिय कापूस वाणाच्या संशोधनाचे कार्य डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर सुरू आहे. त्याविषयी माहिती देताना डॉ. आदिनाथ पसलावार.

नागपूर ः सेंद्रिय अन्नधान्यासोबतच येत्या काही काळात सेंद्रिय पद्धतीच्या शेतीतून कापूस वाण आणि त्यापासून तयार कापडही उपलब्ध होणार आहे. स्वित्झर्लंड येथील एका अशासकीय संस्थेच्या निधीतून अकोला कृषी विद्यापीठात त्या पार्श्‍वभूमीवर संशोधनाचे काम हाती घेण्यात आले आहे.  जागतिकस्तरावर पूर्वी कापसाच्या सरळ वाणांची लागवड होत होती. त्यानंतरच्या काळात साधारणतः १९९५ पासून बीटी (जी. एम) तंत्रज्ञानाचा अंतर्भाव असलेल्या कापूस वाणाच्या लागवडीखालील क्षेत्र ९५ टक्क्यांपर्यंत पोचले. उर्वरित केवळ पाच टक्‍के क्षेत्रावरच सरळ कापूस वाणाची लागवड होते. दरम्यानच्या काळात जागतिक आरोग्य संघटनेने जी. एम. तंत्रज्ञानाचे धोके अधोरेखित केले. तणनाशक सहनशील जनुकाचा अंतर्भाव असलेल्या कापूस वाणामुळे कर्करोग होत असल्याचा अहवालदेखील जागतिक आरोग्य संघटनेने दिला. आरोग्याप्रती जागरूक असलेल्या अभ्यासकांमधून व ग्राहकांमधून त्यामुळे सेंद्रिय कापूस वाणांपासून निर्मित कापडाची मागणी होऊ लागली आहे. ही बाब लक्षात घेऊन स्वित्झर्लंड येथील रिसर्च इन्‍स्‍टिट्यूट ऑफ ऑर्गेनीक ॲग्रीकल्चर (एफ.आय.बी.एल) या संस्थेने सेंद्रिय कापूस वाण उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. ही संस्था या विषयात कार्य करणाऱ्या सर्व संस्था किंवा तज्ज्ञांना एकत्र आणण्याचे काम करणार आहे. भारतात या विषयावरील संशोधनाचे काम डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाकडे सोपविण्यात आले आहे. यासंबंधीच्या कापूस वाणाची लागवड जुलै २०१८ मध्ये विद्यापीठाच्या कृषी विद्या प्रक्षेत्रावर करण्यात आली. यात चाचण्या घेत वस्त्रोद्योग क्षेत्राकडून मागणी असलेल्या लांब धाग्याचा कापूस वाण संशोधित केला जाणार आहे, अशी माहिती कृषिविद्या शाखेचे विभागप्रमुख डॉ. आदिनाथ पसलावार यांनी दिली. 

पहिल्या टप्प्यात स्वित्झर्लंड येथील संबंधित संस्थेकडून सुमारे ८ लाख रुपयांचा निधी या प्रककल्पाकरिता उपलब्ध करून देण्यात आला आहे. सेंद्रिय पद्धतीने वाणनिमिर्ती करणार  डॉ. पसलावार म्हणाले, की या प्रकल्पात नॉन बीटी असे सरळ व संकरित कापूस वाण निवडण्यात येईल. यात कृषी विद्यापीठे व खासगी कंपन्या यांच्या वाणांचा समावेश असेल. त्यांची सेंद्रिय पद्धतीने लागवड व व्यवस्थापन करण्यात येईल. त्याद्वारे तयार झालेले बियाणे हे सेंद्रिय पद्धतीचे असेल. त्याचाच उपयोग पुढे मुख्य उद्दिष्टासाठी करता येईल.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com