परभणीतील ग्रामीण कृषी मौसम सेवा केंद्र ठरले 'देशातील सर्वोत्‍कृष्‍ट'

weather station award
weather station award

परभणी: ग्‍वाल्हेर (मध्य प्रदेश) येथील राजमाता विजयाराजे सिंधिया कृषी विद्यापीठामध्ये बुधवार (ता. १८) ते शुक्रवार (ता. २०) या कालावधीत ग्रामीण कृषी हवामान सेवा योजनेच्‍या १३ व्‍या राष्‍ट्रीय वार्षिक आढावा बैठक पार पडली. बैठकीत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील अखिल भारतीय समन्‍वयीत कृषी हवामानशास्‍त्र संशोधन प्रकल्‍प अंतर्गत ग्रामीण कृषी मौसम सेवा केंद्रास सन २०१८ चे देशातील सर्वोत्‍कृष्‍ट केंद्र म्‍हणून सन्‍मानित करण्‍यात आले.  हा सन्‍मान नवी दिल्‍ली येथील भारतीय हवामान विभागाचे व्‍यवस्‍थापकीय संचालक डॉ. एम. मोहापात्रा यांच्‍या हस्‍ते ग्रामीण कृषी मौसम सेवा योजनेचे मुख्‍य समन्‍वयक डॉ. कैलास डाखोरे, प्रमोद शिंदे यांनी स्‍विकारला. ग्‍वालियर येथील कृषी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. एस. के. राव, जबलपूर येथील अटारीचे संचालक डॉ. अनुपम मिश्रा, भारतीय कृषी हवामान विभागाचे प्रमुख डॉ. के. के. सिंग, भारतीय कृषी संशोधन परिषदेचे सहायक उपसंचालक (कृषी विस्‍तार) डॉ. रणधीर सिंग, ग्‍वाल्हेर कृषी महाविद्यालयाचे अधिष्‍ठाता डॉ. जे. पी. दीक्षित, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. एस. एन. उपाध्‍याय, संयोजक डॉ. यू. पी. एस भथुरीया आदींची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील शास्‍त्रज्ञांनी लिहिलेल्या हवामान आधारित शेती व्‍यवस्‍थापन पुस्तिकाचे विमोजन मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले.  कुलगुरू डॉ. अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असुन योजनेचे मुख्‍य समन्‍वयक डॉ. कैलास डाखोरे आहेत. तसेच यात संशोधन सहयोगी प्रमोद शिंदे, डॉ. यू. एन. आळसे, प्रा. डी. डी. पटाईत, डॉ. ए. टी. दौंडे, डॉ. सी. बी. लटपटे, डॉ. विनोद शिंदे, डॉ. राहुल बगेले, प्रा. ए. टी. शिंदे, पांडुरंग कानडे आदी शास्‍त्रज्ञांचे पथक कार्यरत आहे.   केंद्रीय कृषी मंत्रालय तसेच पृथ्‍वी विज्ञान मंत्रालय यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने भारतीय हवामानशास्‍त्र विभागाच्‍या ग्रामीण कृषी हवामान सेवा योजनेअंतर्गत देशात १३० कृषी हवामान केंद्र कार्यरत आहेत. परभणी कृषी विद्यापीठातील केंद्र २००७ मध्ये सुरू झाले. या केंद्रामार्फत पेरणीपूर्व ते पीक काढणीपर्यंत प्रत्‍येक अवस्‍थेतील शेतातील कामाचे हवामान आधारित नियोजन कसे करावे यांचे सल्‍ला व मार्गदर्शन देण्‍यात येते. पुढील पाच दिवसांकरिता पाऊस, तापमान, आर्द्रता, वाऱ्याचा वेग, दिशा, ढगांची स्थिती या हवामान घटकांचा समावेश असतो. हा सल्‍ला ५० लाख पेक्षा जास्‍त शेतकऱ्यांपर्यंत पोचविला जातो.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com