agriculture news in Marathi agriculture weather technology training Maharashtra | Agrowon

अद्ययावत शेतीसाठी कृषी हवामान तंत्रज्ञान प्रशिक्षण 

टीम अॅग्रोवन
सोमवार, 27 एप्रिल 2020

हवामान अद्ययावत शेतीसाठी प्रगत कृषी हवामान तंत्रज्ञान याविषयावर ३० एप्रिल ते ०४ मे असे पाच दिवस ऑनलाइन प्रशिक्षण आयोजीत केले आहे. 

नगर ः जागतिक बँक अर्थसहाय्यीत राष्ट्रीय उच्च शिक्षण प्रकल्प व भारतीय कृषी संशोधन परिषद नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने हवामान अद्ययावत शेती व जलव्यवस्थापनाचे आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञान केंद्र, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत, हवामान अद्ययावत शेतीसाठी प्रगत कृषी हवामान तंत्रज्ञान याविषयावर ३० एप्रिल ते ०४ मे असे पाच दिवस ऑनलाइन प्रशिक्षण आयोजीत केले आहे. 

शंभर जणांना या प्रशिक्षणासाठी निवडण्यात येणार आहे. या प्रशिक्षणासाठी असणाऱ्या शंभर जागांपैकी ५० जागा या महात्मा फुले कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञ, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्यांसाठी असणार आहेत व उर्वरित ५० जागा इतर कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञ, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्यांसाठी असणार आहेत. 

या प्रशिक्षणामध्ये हवामान जनरेटर: परिचय आणि त्यांचे अनुप्रयोग, पीक हवामान संबंध, पाऊस आणि त्यात आंतर वार्षिक बदल , हवामान बदल, अनुकूलन आणि शमन पर्यायांमागील विज्ञान, हवामान आधारित कृषी सल्ला सेवा : सूक्ष्म स्तरावर भूमिका, हवामान अंदाज तंत्र आणि अंदाज मॉडेल , पीक सिम्युलेशन मॉडेल: पीक-हवामान संबंध आणि उत्पादन अंदाज समजून घेण्यासाठी साधने, मॉडेलचा वापर करून बदलत्या हवामानात पीक पाण्याची गरज निश्चित करणे, हवामान शास्त्रामधील उन्नत उपकरणे, लिनक्स सॉफ्टवेअर व कृषी हवामान शास्त्रातील वापर या विषयांचा समावेश करण्यात आला आहे. 
 


इतर अॅग्रो विशेष
ऊस गाळप यंदा वाढणार कोल्हापूर: गेल्या वर्षी महापूर व अवर्षणामुळे...
चिकन, अंड्यांची मागणी वाढली, दरात...नगर ः कोरोना व्हायरस संसर्गाच्या पार्श्वभूमीवर...
ऊस तोडणी कामगारांच्या मागण्यांबाबत साखर...पुणे: राज्यातील ऊस तोडणी व वाहतूक कामगारांच्या...
शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाणार लालपरी सोलापूर : एक लाखांहून अधिक कर्मचारी, साडेसतरा...
राज्यात सर्वदूर हलक्या पावासाची शक्यतापुणे ः राज्यातील अनेक भागांत कमी अधिक स्वरूपात...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पाऊस पुणे ः उत्तर भारतात परतीच्या पावसासाठी पोषक...
सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी : कृषिमंत्री...कन्नड, जि. औरंगाबाद: अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक...
तीनशे टन हळद बांगलादेशाला निर्यात नांदेड : शेतीमालास अधिकचा दर मिळावा, यासाठी...
मुहूर्ताचा कापूसच कवडीयुक्त अकोला: यंदा दसऱ्याआधीच कापूस वेचणीचा मुहूर्त अनेक...
कृषी उपसंचालकानेच घातली कृषी उपक्रमांना...यवतमाळ: आत्महत्याग्रस्त अशी जागतिक स्तरावर ओळख...
महिला गट बनवितो ३० प्रकारचे मसालेइटकरे (ता.वाळवा,जि.सांगली) येथील उपक्रमशील महिला...
मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधारपुणे : राज्यातील बहुतांशी भागातील पावसाचे...
राज्यात हलक्या पावसाची शक्यतापुणे : काही दिवस राज्यात मुसळधार पाऊस...
एक हजार प्राध्यापकांनी वयाची साठी...पुणे: राज्यातील कृषी विद्यापीठांमधील...
सूक्ष्म अन्न उद्योगांना मिळणार आता दहा...पुणे: राज्यात लवकरच पंतप्रधान सूक्ष्म अन्न उद्योग...
कृषी, कामगार विधेयकांची राज्यात...पुणे : केंद्र सरकारने घाईघाईत मंजूर करुन घेतलेली...
शेतकरी आंदोलनाचे सात राज्यांत पडसादचंडीगड ः केंद्र सरकारच्या कृषी विधेयकांना विरोध...
सोयाबीन बियाणे प्लॉटना फटकाऔरंगाबाद: सध्याचे पावसाचे प्रमाण व त्यामुळे...
केळी विमा निकषांबाबत उत्सुकताजळगाव ः राज्य सरकारच्या चुकांमुळे हवामानावर...
अडीच हजार हेक्टर भातशेती सततच्या...सिंधुदुर्ग ः हळवी आणि भिजवणीची लागवड केलेली...