कृषिमित्र, कृषी सहायकांनी शेतकऱ्यांचे मित्र व्हावे ः जिल्हाधिकारी पापळकर

कृषिमित्र, कृषी सहायकांनी शेतकऱ्यांचे मित्र व्हावे ः जिल्हाधिकारी पापळकर
कृषिमित्र, कृषी सहायकांनी शेतकऱ्यांचे मित्र व्हावे ः जिल्हाधिकारी पापळकर

अकोला ः जिल्ह्यात शेतकऱ्यांपर्यंत सर्व योजना पोचविण्यासाठी कृषिमित्र व कृषी सहायकांनी खऱ्याअर्थाने शेतकऱ्यांचे मित्र व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले.  आगामी रब्बी हंगामाच्या अनुषंगाने कृषी विभाग व ‘आत्मा’च्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात रब्बी हंगामातील महत्त्वाच्या पिकांबाबत कार्यशाळा झाली. या वेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री. पापळकर बोलत होते.

व्यासपीठावर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मोहन वाघ यांच्यासह डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे मार्गदर्शक उपस्थित होते. 

जिल्हाधिकारी पापळकर म्हणाले, की क्रॉपसॅप योजनेमध्‍ये कापूस, तूर, हरभरा या पिकांची निरीक्षणे नोंदवा जेणेकरून पीक संरक्षण उपाययोजना वेळीच कररून विषबाधा कमी होतील. जलयुक्‍त अभियानाची अपूर्ण कामे पूर्ण करून त्याचा अहवाल पाठवा. पोकरा योजनेत कुठलाही गैरप्रकार होणार नाही याबाबत काळजी घ्यावी. पीककापणी प्रयोगाचे काम ॲपवर वेळीच नोंदवावे. गोपिनाथ मुंढे अपघात विमा योजनेतील त्रुटींची पुर्तता करीत आठ दिवसांत प्रस्‍ताव सादर करावेत. पीकविमा योजनेचे काम प्रभावीपणे करावे जेणेकरून शेतकऱ्यांच्‍या तक्रारी येणार नाहीत, असे पाहावे. पंतप्रधान मानधन योजनेमध्‍ये जास्‍तीत जास्‍त शेतकऱ्यांना सहभागी करून घ्यावे. या वर्षी पाऊस जास्‍त झाल्‍यामुळे खते बियाण्याचा काळा बाजार होणार नाही याकडे लक्ष द्यावे, अशी सूचनाही केली. फवारणी करणाऱ्या शेतमजुरांना फवारणी करताना काय काळजी घ्‍यावी, याचे प्रशिक्षण दर १५ दिवसाला देऊन वैद्यकीय तपासणी करुन घ्‍यावी. सिंचन विकास योजनेत अनुदान उपलब्‍ध होणार आहे. सर्व गावांतील १०० टक्के क्षेत्र ठिबक तुषार सिंचनाखाली खाली आणावे. गटशेतीला प्रोत्‍साहन देत शेतकरी उत्‍पादक कंपनी स्‍थापन करण्‍यासाठी जागृती करा. खारपाण पट्ट्यात जिप्समचा वापर वाढवा, असे ही ते म्हणाले. 

जिल्हा अधीक्षक मोहन वाघ म्हणाले, की जिल्ह्यात ओवा पिकाचे क्षेत्रविस्तार केला जाईल. ओव्याची १०० एकरावर प्रात्यक्षिके घेतली जातील. तर हरभऱ्याचे ५०० प्रात्यक्षिके व शेतीशाळा घेण्यात येतील. त्यातून पीक संरक्षण व उपाय योजनांबाबत सांगितले जाईल. जिल्ह्यात २६०० पीककापणी प्रयोग आहेत. त्याचे १०० टक्के आॅनलाइन काम केले जाईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com