कापसाचा नवीन हंगाम (२०१९-२०) सुरू होऊन जवळपास दोन महिने संपायच्या बेतात आहेत, परंतु आज सु
बातम्या
अठराशेवर गावांमध्ये घेतल्या जाणार २६५२ शेतीशाळा
औरंगाबाद : येत्या खरीप हंगामात शेतकऱ्यांचे शेती, पिकांविषयी शास्त्रोक्त प्रबोधन होण्यासाठी कृषी विभागाच्या विविध यंत्रणांमार्फत औरंगाबाद, जालना व बीड या तीन जिल्ह्यांतील १८८९ गावांमध्ये २६५२ शेतीशाळा घेण्यात येणार आहेत.
औरंगाबाद : येत्या खरीप हंगामात शेतकऱ्यांचे शेती, पिकांविषयी शास्त्रोक्त प्रबोधन होण्यासाठी कृषी विभागाच्या विविध यंत्रणांमार्फत औरंगाबाद, जालना व बीड या तीन जिल्ह्यांतील १८८९ गावांमध्ये २६५२ शेतीशाळा घेण्यात येणार आहेत.
कृषी विभागाकडून १०४२, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या माध्यमातून १५२६, तर आत्माच्या माध्यमातून ८४ शेतीशाळांचे नियोजन करण्यात आले आहे. ११८१ कर्मचारी या शेतीशाळांसाठी काम करणार आहेत. कृषी विभागाच्या माध्यमातून औरंगाबाद जिल्ह्यात ३५६, जालना ३११; तर बीड जिल्ह्यात ३७५ शेतीशाळा घेतल्या जातील. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या माध्यमातून औरंगाबाद जिल्ह्यात ४८६, जालना ४८८; तर बीड जिल्ह्यात ५५२ शेतीशाळा घेतल्या जातील. आत्माच्या माध्यमातून औरंगाबाद जिल्ह्यात २७, जालना २४; तर बीड जिल्ह्यात ३३ शेतीशाळा घेतल्या जातील.
औरंगाबाद जिल्ह्यात तीनही यंत्रणांच्या माध्यमातून ८६९, जालना जिल्ह्यात ८२३; तर बीड जिल्ह्यात ९६० शेतीशाळा घेण्याचे नियोजन कृषी विभाग, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प व आत्माच्या यंत्रणेने केले आहे. कापूस पिकाच्या क्रॉपसॅपच्या माध्यमातून ३६६, राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून २६९ अशा ६३५ शेतीशाळा होतील. सोयाबीनच्या क्रॉपसॅपच्या माध्यमातून ९१, राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून ६० व राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानातून ११ अशा एकूण १६२ शेतीशाळा घेतल्या जातील. मका पिकाच्या क्रॉपसॅपच्या माध्यमातून ५७, राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून ५६ अशा एकूण ११३ शेतीशाळा घेतल्या जाणार आहेत.
तीनही जिल्ह्यांतील आत्माच्या २८ बीटीएमच्या माध्यमातून ८४ गावांत शेतीशाळा घेतल्या जातील. त्यामध्ये कापूस पिकाच्या २०, मकाच्या २२, भाजीपाल्याच्या १३, सोयाबीनच्या १९, रेशीमच्या २, तुरीच्या ७; तर सेंद्रिय शेतीची एकमेव कार्यशाळा बीड जिल्ह्यात घेण्याचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या माध्यमातून तीनही जिल्ह्यांतील ७६३ गावांत शेतीशाळा घेतल्या जातील. त्यामध्ये कापूस अधिक मुगाच्या ७६३, बाजरी अधिक तुरीच्या ६६, सोयाबीन अधिक तुरीच्या ६९७, उसाविषयी १८; तर बाजरी पिकाच्या १२ मिळून एकूण १५२६ शेतीशाळांचे नियोजन करण्यात आल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.
जिल्हानिहाय शेतीशाळा
- औरंगाबाद : ८६९
- जालना : ८२३
- बीड : ९६०
- 1 of 914
- ››