agriculture news in marathi, agro agenda, amaravati, maharashtra | Agrowon

अमरावती विभागात सात-बारामध्ये सव्वा तीन लाख त्रुटी
टीम अॅग्रोवन
सोमवार, 30 जुलै 2018

अमरावती विभागात अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशीम व यवतमाळ या पाच जिल्ह्यांचा समावेश होतो. या पाचही जिल्ह्यांत सातबारामध्ये सव्वातीन लाख त्रुटी आढळून आल्या. ३१ जुलैपर्यंत या त्रुटी दूर करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यानंतर १ ऑगस्टपासून डिजिटल स्वाक्षरीचे काम होत ऑनलाइन सातबाऱ्याची उपलब्धता केली जाईल. या कामासाठी २७ जुलैला पाचही जिल्ह्यांतील जिल्हाधिकाऱ्यांची एक बैठक बोलावण्यात आली आहे.
- पीयूष सिंग, विभागीय आयुक्‍त, अमरावती.

अमरावती  ः सात - बारा उताऱ्याची डिजिटलकरणाची प्रक्रिया सुरू असून, या प्रक्रियेदरम्यान अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांत सुमारे तीन लाखांपेक्षा अधिक त्रुटी आढळल्या आहेत. हा प्रकार पीककर्ज वितरणात अडसर ठरू नये याकरिता हस्तलिखित सातबारा वितरणाची प्रक्रिया प्रभावीपणे राबविण्यात आली आहे.

राज्यात एक ऑगस्टपासून डिजिटल स्वाक्षरी असलेल्या सातबाऱ्याचे वितरण होईल, अशी घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली आहे. अमरावती विभागातदेखील त्यानुसार सात -बारा डिजिटल करण्याची प्रक्रिया राबविण्यात आली.

चावड्यांवर सातबारा वाचनातून अनेक हरकती, आक्षेप नोंदविण्यात आले. त्यानुसार काही ठिकाणी सुधारणाही करण्यात आल्या. त्यानंतर परत सातबारा वाचन झाले; त्या वेळी पुन्हा काही आक्षेप, सूचना व हरकती मिळाल्या. ही सारी प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना सव्वातीन लाख त्रुटी पाच जिल्ह्यांत समोर आल्या आहेत.

या त्रुटीचे निराकरण करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्रुटी दूर करून सातबारा शासनाने सुचविलेल्या सर्व्हरवर अपलोड केल्या जात आहे. पेरेपत्रकाचेदेखील अशा प्रकारचे नियोजन आहे. दरम्यान, खरीप हंगाम असल्याने शेतकरी पीककर्ज काढतात. या कामात त्यांना सातबाऱ्याचा अडसर भासू नये, याकरिता हस्तलिखीत सात-बारा वितरित केले जात आहेत. सातबारा उपलब्धतेबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारी नाहीत.
 

इतर ताज्या घडामोडी
उद्योजकांच्या कर्जमाफीसाठी सरकारची मदत...अकलूज, जि. सोलापूर : ‘‘देशातील काही श्रीमंत...
फांगदर येथे वाचन प्रेरणा दिनानिमित्त...नाशिक : देवळा तालुक्यातील फांगदर येथील...
यवतमाळ जिल्ह्यात ओल्या दुष्काळानंतरही...यवतमाळ  ः भूजल सर्व्हेक्षण विभागाने केलेल्या...
बागलाण व देवळा तालुक्यांत बाजरी काढणीला...नाशिक : बागलाण व देवळा तालुक्यांत लष्करी...
परभणी जिल्ह्यात कृषी संजीवनींतर्गत २१...परभणी : जिल्ह्यात जागतिक बॅंकेच्या अर्थसहाय्याने...
हमीभावापेक्षा कमी दराने कापसाची खरेदीनांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील...
सांगली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे...सांगली : महापुरात खरीप पिकांचे मोठे नुकसान...
बीड जिल्ह्यात हमीभाव शेतीमाल खरेदीची...बीड : हमीदराने शेतीमाल खरेदीच्या नोंदणीत...
भाजप सरकारच्या काळात शेतकरी आत्महत्या...बीड : आम्ही विविध भागात औद्योगिक वसाहती आणि...
पुणे जिल्ह्यातील ३१७६ हेक्टर क्षेत्राला...पुणे  ः जिल्ह्यात २५ सप्टेंबरला झालेल्या...
पुणे जिल्ह्यात होणार २३५४ पीककापणी...पुणे   ः पिकांची उत्पादकता आणि पीकविमा...
पुणे जिल्ह्यात लसीकरण पडताळणीसाठी...पुणे  : महाराष्ट्र राज्य लाळ खुरकूत रोगमुक्त...
नगर जिल्ह्यात बाराशे हेक्टरवर ज्वारी...नगर : कृषी विभागाच्या उन्नत शेती समृद्ध...
सातारा जिल्ह्यात पावसाची उघडीप; खरीप...सातारा  ः पावसाने उघडीप दिल्याने खरिपातील...
रविकांत तुपकर यांचा पुन्हा `स्वाभिमानी`...कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या अंतर्गत...
वऱ्हाडात टेक्स्टटाइल, अन्न प्रक्रिया...अकोला  ः विदर्भातील वऱ्हाड हा भाग...
पावसाळी वातावरणात डाऊनी नियंत्रणासाठी...सर्वच द्राक्ष विभागामध्ये गुरुवार ते सोमवार (ता....
लातूर, उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली,...उस्मानाबाद : मराठवाड्यातील लातूर, उस्मानाबाद...
धुळे : कांदा दरप्रश्‍नी शेतकरी संघटनेचे...धुळे  ः कांद्याचे दर बऱ्यापैकी वाढल्याने...
शिराळा तालुक्यात भाताचे उत्पादन २०...सांगली : शिराळा पश्‍चिम भाग हा भातपिकाचे माहेरघर...