agriculture news in marathi Agro chemical industries urges government not to ban pesticides | Agrowon

कीटकनाशकांवर बंदी आणल्यास न्यायालयात जावू; कृषी रसायन उद्योग

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 22 मे 2020

कृषी रसायन क्षेत्रात वापरल्या जाणाऱ्या २७ कीटकनाशकांवर बंदी आणण्याच्या निर्णयाच्या विरोधात पेस्टीसाईडस् मॅन्युफॅक्चरर्स अन्ड फॉर्म्युलेटर्स असोसिएशन ऑफ इंडियाने (आयएमएफएआय) कायदेशीर लढा देण्याचा इशारा दिला आहे.

पुणे : कृषी रसायन क्षेत्रात वापरल्या जाणाऱ्या २७ कीटकनाशकांवर बंदी आणण्याच्या निर्णयाच्या विरोधात पेस्टीसाईडस् मॅन्युफॅक्चरर्स अन्ड फॉर्म्युलेटर्स असोसिएशन ऑफ इंडियाने (आयएमएफएआय) कायदेशीर लढा देण्याचा इशारा दिला आहे. किटकनाशकांवर बंदी आणली गेल्यास ५० अब्ज रुपयांची बाजारपेठ धोक्यात येईल. यातील ३५ अब्ज रुपयांची मुलद्रव्ये देशांतर्गत शेतकरी वापरतात व उर्वरित १५ अब्ज रुपयांच्या रसायनांची निर्यात होते. त्यामुळे होणारी हानी मोठी राहील, असे उद्योजकांचे म्हणणे आहे. 

“गेल्या हंगामात देखील ३४ मूलद्रव्यांवर बंदी आणण्याच्या हालचाली झाल्या असता उद्योगातून विरोध झाला होता. त्यामुळे केवळ ९ मूलद्रव्यांवर बंदी आणली गेली. मॅन्कोझेब व क्लोरपायरिफॉस ही दोन्ही मूलद्रव्ये भारताकडून सर्वाधिक उत्पादित केली जातात. त्याचा जगभर पुरवठा केला जातो,” असे या संघटनेचे म्हणणे आहे. 

देशातील किटकनाशके निर्मिती उद्योगाची उलाढाल ४०० अब्ज रुपयांची आहे. त्यापैकी १८० अब्ज रुपयांची रसायने देशांतर्गत वापरली जातात. बहुराष्ट्रीय कंपन्यांना भारतीय उद्योगांकडून होणारी रसायनांची निर्यात रोखायची आहे. विदेशी कंपन्यांना स्वतःची उत्पादने भारतात घुसवायची आहेत. विदेशी कंपन्यांची उत्पादने महाग आहेत. देशातील ऑर्गेनोफॉस्फरस गटातील ५०० रुपये प्रतिलिटर गटातील मूलद्रव्यांना घालवून तेथे महागड्या किमती असलेली आयातीची रसायने घुसविण्याचे प्रयत्न विदेशी कंपन्यांचे आहेत, असेही या कंपन्यांचे म्हणणे आहे.  

“देशात वापर व उत्पादनाला बंदी करताना निर्यात मात्र चालू ठेवता येईल. यापूर्वी अशी स्थिती उद्भवली असता उद्योजकांनी कायदेशीर मदत घेतली होती. आता देखील आम्ही सरकारसमोर आमच्या समस्या मांडू तसेच न्यायालयीन मदत देखील घेवू,” असे आयएमएफएआयच्या सूत्रांचे म्हणणे आहे.

कृषी रसायन निर्मिती उद्योगावर या बंदीचा परिणाम होवू शकतो. वर्मा समितीने ६६ उत्पादनांचा अभ्यास केला होता. त्यातून ३४ उत्पादने बंदीच्या प्रक्रियेसाठी निवडली. मात्र, ९ उत्पादनावर अंतिम बंदी टाकली गेली. उर्वरित २७ उत्पादनांची तांत्रिक माहिती संबंधित उत्पादकांनी पुरवली होती. तरीही काढलेली बंदीची अधिसूचना धक्कादायक आहे.”
— प्रदीप दवे, अध्यक्ष, आयएमएफएआय 

टॅग्स

इतर अॅग्रो विशेष
देशात यंदा सर्वसाधारण मॉन्सून; १०२...नवी दिल्ली : देशात यंदा सर्वसामान्य मॉन्सून आणि...
Breaking : मॉन्सून एक्सप्रेस केरळात...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) सोमवारी (ता....
राज्य सरकारचे ‘पुनश्‍च हरीओम्’ :...मुंबई : कोरोनाच्या साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी...
अंतिम वर्षाची परीक्षा नाही :...मुंबई : सध्याच्या परिस्थितीत विद्यापीठाच्या...
पीकविम्याचे कामकाज या महिन्यातपुणे: राज्यातील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीकविमा...
टोळधाडबाधितांना मदत देणार : पंतप्रधान...नवी दिल्ली : देशातील अनेक भागांत टोळधाडीचे संकट...
मॉन्सून आज केरळात येण्याचे संकेतपुणे  : अरबी समुद्रात लक्षद्वीप बेटांलगत...
कोकणात मुसळधार पावसाचा इशारापुणे  : अरबी समुद्रातील कमी दाब क्षेत्रामुळे...
आठवडाभरापासून टोळधाड विदर्भातचनागपूर   ः गेल्या आठवडाभरापासून...
परभणीतील खरेदी केंद्रावर कापूस विक्रीत...परभणी  ः राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन...
चाकणच्या जनावरे बाजारात एक कोटींची...पुणे  ः गेल्या सव्वा दोन महिन्यांपासून ‘...
भाजीपाला लागवडीतून उघडला प्रगतीचा मार्गसोयाबीन, भात अशा पारंपरिक कोरडवाहू पिकांवर भिस्त...
सक्रिय रुग्णांची संख्या घटली; एका...नवी दिल्ली : कोरोना महामारीविरूद्धच्या...
विदर्भात टोळधाडीची अस्तित्व कायमनागपूर : कृषी विभागाकडून टोळधाड नियंत्रणासाठी...
राज्यातील भाजीपाला लागवड खोळंबली कोल्हापूर: सध्याच्या स्थितीत भाजीपाल्याचे...
राज्यात देशी कोंबडी पिलांना मागणी वाढली नगर ः काही महिन्यांपूर्वी कोरोना आणि चिकनबाबत...
शेतकऱ्यांची खत विक्री दरात फसवणूक करू...बुलडाणा ः या खरीप हंगामात शेतकऱ्यांना रास्त...
राज्यात बेदाण्याचे सव्वा दोन लाख टन...सांगली : यंदा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांवर ‘कोरोना...