'कोरोना'मुळे 'मोबाईल कॉन्फरन्सव'र शेतकरी गटास मार्गदर्शन; ॲग्रो इंडियाचा उपक्रम

औरंगाबाद : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखून शेतीविषयक ज्ञानाचे आदानप्रदान होण्याच्या अनुषंगाने ॲग्रो इंडिया गट शेती संघाचा १८० वा द्वादश कार्यक्रम शनिवारी (ता. २१) चक्क व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्यात आला.
Agro India's Duadasha Fair through Video Conferencing
Agro India's Duadasha Fair through Video Conferencing

औरंगाबाद : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखून शेतीविषयक ज्ञानाचे आदानप्रदान होण्याच्या अनुषंगाने ॲग्रो इंडिया गट शेती संघाचा १८० वा द्वादश कार्यक्रम शनिवारी (ता. २१) चक्क व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्यात आला.

जवळपास २००४-०५ पासून ॲग्रो इंडिया गटशेती संघाच्यावतीने द्वादस कार्यक्रमाची प्रथा सुरू करण्यात आली. आजवर खंड न पडता सुरू होता. या वेळी नियोजीत कार्यक्रमानुसार मुख्य कार्यक्रम किन्ही (ता. जाफराबाद जि. जालना) येथे तर, न्याहरी व शिवारफेरीचा कार्यक्रम मौजे भातोडी व मौजे पोखरी येथे नियोजित होते. मात्र कार्यक्रमाला कोरोनाचा फटका बसण्याची शक्यता होती. त्यामुळे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कार्यक्रम घेण्याची डॉ. भगवानराव कापसे आणि सहकारी शेतकऱ्यांनी ठरविले. त्यासाठी शेतकरी शरद सवडे व  रतन पवार यांनी दोन दिवस वेगवेगळ्या ठिकाणांहून माहिती घेऊन अँड्रॉइड मोबाईलच्या माध्यमातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचे नियोजन केले. 

सर्व संबंधित शेतकऱ्यांना आपापल्या शेतात तर, तज्ज्ञांना सुद्धा दुपारी १२ वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसाठी तयार राहण्यास सांगितले गेले. डॉ. भगवानराव कापसे, महाकॉटचे जयश माने, कापूस पैदासकार डॉ. एस. एस. माने हे तीन तज्ज्ञ वेगवेगळ्या ठिकाणांहून यामध्ये सहभागी झाले. त्यांना कायम ठेवून टप्प्याटप्प्याने एकेक शेतकरी जोडून त्या शेतकऱ्याला त्याच्या पिकाविषयी मार्गदर्शन करण्यात आले. 

सुरुवातीला नांदखेडा येथे रतन पवार यांच्या डाळिंब बागेची सविस्तर पाहणी करून, नर-मादी फुलांचे प्रमाण, एकूण झालेली फुलधारणा याबाबत चर्चा करून पुढील काळात निर्यात योग्य डाळिंबासाठीचे तंत्र सांगण्यात आले. त्यानंतर  शरद सवडे यांच्या द्राक्षबागेत अतिपावसाने झालेले नुकसान, तसेच यावर्षी करावयाच्या खरड छाटणी बाबतची चर्चा करून माहिती देण्यात आली. डोणगाव येथील डाळिंब बागेत सविस्तर चर्चा करून बिघडलेल्या बहार प्रक्रियेत सुधारणा कशी करता येईल याबाबत सविस्तर विवेचन करण्यात आले. उमरखेड येथील नवनाथ वैजनाथ फुके यांच्या शेडनेटमधील कारले व दोडके यांची अतिउत्कृष्ट अशी लागवड पहिली. भातोडी येथील  रामेश्वर गायके यांची द्राक्ष बाग तर ब्रह्मवडगाव ता.  

परतूर येथील उद्धव भिसे यांच्या आधुनिक पद्धतीने लागवड केलेल्या टरबुजाची पाहणी करण्यात आली. शेवटी पोखरी येथील गजानन पाचरणे यांच्या आधुनिक असे अतिघन लागवड आंबा बागेमध्ये छाटणी, आधार देणे व विद्राव्य खताचे नियोजन करण्यात आले. 

जवळपास दीड तास चाललेल्या या मोबाईल व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये २८ ते ३० शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. महाकॉटचे व्यवस्थापक जयेश महाजन यांनी एक गाव एक वाण तसेच कॉटन टू क्‍लॉथ या संकल्पनेबाबत माहिती दिली. कापूस पैदासकार डॉ. एस. एस. माने  यांनी सुद्धा सेंद्रिय बोंड आळी नियंत्रणासंदर्भात मार्गदर्शन केले. शेवटी कोरोनाबाबत काळजी घ्यावी, गर्दीचे ठिकाण टाळावे, शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करण्यात यावे व लग्न समारंभ सामुदायिक कार्यक्रम न घेण्याचा संदेशही तज्ञांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे व शेतकऱ्यांनी दिला.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नियोजीत द्वादस कार्यक्रम व्हीडीओ कॉन्फरंसींगद्वारे घेत शेतीविषयक मार्गदर्शन केले. हा अनुभव चांगला राहिला. प्रत्येकाने कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाच्या निर्देशांचे पालन करायला हवे.  - डॉ. भगवानराव कापसे, फळबाग तज्ञ, औरंगाबाद.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com