Agriculture news in Marathi 'Agrovan' will honor the entrepreneurs who have been instrumental in the development of agriculture | Page 3 ||| Agrowon

कृषी विकासाचे भगीरथ ठरलेल्या उद्योजकांचा ‘अॅग्रोवन’ करणार सन्मान

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 22 ऑक्टोबर 2021

कष्टकरी शेतकऱ्यांच्या मनगटाला बारा हत्तींचे बळ मिळवून देत राज्यातील कृषी विकासाची गंगा खळखळती ठेवण्याची किमया साधलेल्या निवडक कृषी उद्योजकांचा ‘सकाळ-अॅग्रोवन’च्या वतीने सन्मान केला जाणार आहे.

पुणे : कष्टकरी शेतकऱ्यांच्या मनगटाला बारा हत्तींचे बळ मिळवून देत राज्यातील कृषी विकासाची गंगा खळखळती ठेवण्याची किमया साधलेल्या निवडक कृषी उद्योजकांचा ‘सकाळ-अॅग्रोवन’च्या वतीने सन्मान केला जाणार आहे. कृषिमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते ‘अॅग्रोवन बिझनेस एक्सलन्स अॅवॉर्ड’ने बुधवारी (ता. २७) या उद्योजकांना गौरविण्यात येणार आहे. 

गावशिवारातील शेतकऱ्यांपर्यंत यंत्र-उत्पादने, तंत्र-साधने, माहिती-सल्ला मिळवून देण्याचे कामे कृषी उद्योग करीत आहेत. त्यामुळे शेतीमधील विविध संकटांवर मात करीत प्रगतीचे वाटचाल चालू ठेवणे शेतकऱ्यांना शक्य होते आहे. या वाटेला महामार्गाचे रूप देण्याचा प्रयत्न ‘अॅग्रोवन’ करतो आहे. कृषी क्षेत्राच्या उभारणीत उद्योजकांचा असलेला वाटा ‘अॅग्रोवन’ने सातत्याने अधोरेखित केला आहे. खते, बियाणे, कीडनाशके, सूक्ष्मसिंचन, यंत्रे-अवजारे, रोपवाटिका अशा नानाविध क्षेत्रांत झेंडा रोवणारे विविध उद्योजक एका अंगाने राज्याचे भूमिपुत्रदेखील आहेत.

कृषी क्षेत्रातील काही जिगरबाज उद्योजकांची निवड करून त्यांचा गौरव करण्याची परंपरा ‘अॅग्रोवन’ने सुरू ठेवली आहे. यंदाही अशा २८ उद्योजकांचा गौरव होणार आहे. त्यासाठी पुण्यात २७ ऑक्टोबरला सायंकाळी ६ वाजता एका विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. कोविड प्रतिबंधक नियमावलीचे पालन करीत होत असलेला हा सोहळा निमंत्रितांसाठीच असेल.

‘अॅग्रोवन बिझनेस एक्सलन्स अॅवॉर्ड’ विजेते 
उज्ज्वल कोठारी, कोठारी ग्रुप, सोलापूर. 
मधुकर गवळी, ओम गायत्री नर्सरी, नाशिक. 
मिलिंद बर्वे, मल्टिलाइन ॲग्रो इंडस्ट्रीज, पुणे. 
मारुती चव्हाण, ऋषी ॲग्रो रिसर्च ॲण्ड डेव्हलपमेंट, सांगली. 
महेश दामोदरे, धनश्री क्रॉप सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड, पुणे. 
सुहास बुद्धे, बायोकेअर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, नागपूर. 
विनीत जैन, आर.एम. फॉस्फेट्‍स अँड केमिकल्स, धुळे. 
सूर्यभान ठाकरे, टीएस ऑर्गो ऑर्गेनिक, नागपूर. 
गौतम पाटील, जीएनपी ॲग्रो सायन्सेस, नाशिक. 
विजया गारुडकर, जी.के. प्लॅस्टिक, नगर. 
मच्छिंद्र लंके, कन्हैया ॲग्रो, नगर. 
संजय वायाळ, ईश्‍वेद समूह, बुलडाणा. 
सुहास कचरे, महापीक फर्टिलायझर्स इंडिया, सोलापूर. 
संजय पाटील, सुमीत टेक्नॉलॉजीज, पुणे. 
ज्ञानेश्‍वर भुसे, गोदावरी ॲग्रो स्प्रेअर्स, नाशिक. 
विश्‍वास सोंडकर, युनिव्हर्सल बायोकॉन, पुणे. 
राजाराम येवले, क्रेंटा केमिकल, सोलापूर. 
लक्ष्मणराव काळे, पवन ॲग्रो, औरंगाबाद. 
नितीन हासे, सह्याद्री ॲग्रोव्हेट, नगर. 
तेजराव बारगळ, अंकुर रोपवाटिका, औरंगाबाद. 
डॉ. सतीलाल पाटील, ग्रीन व्हिजन लाइफ सायन्सेस, पुणे. 
डॉ. विश्‍वजित मोकाशी, मोकाशी कृषी विकास प्रतिष्ठान, सातारा. 
बाळासाहेब सोळांकुरे-पाटील, भुदरगड नॅचरल फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी, पुणे. 
परिंद प्रभुदेसाई, स्तिल इंडिया, पुणे. 
अभय मस्के, एस. के. बायोबीझ, नाशिक. 
किरण शेवाळे, अथर्व हायटेक नर्सरी, नगर. 
दुअमोल मवाळ, सक्सेस बीज सायन्स, पुणे. 
सतीश पाटील, अशोका अॅग्रो फर्ट, सांगली.

 


इतर अॅग्रो विशेष
'शेकाप'चे ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी....कोल्हापूर - शेतकरी कामगार पक्षाचे ...
पुण्यात सिमला, हिरवी मिरचीच्या दरात...पुणे ः पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी...
राज्यात रोहयोची ४४ हजार कामे सुरू पुणे नगर ः ग्रामीण भागात मजुरांना रोजगार...
राज्यात ५७३ लाख टन उसाचे गाळप कोल्हापूर : राज्यात जानेवारीच्या मध्यापर्यंत ५७३...
पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण  ८.१...कोल्हापूर : गेल्या वर्षांमध्ये (२०२०- २१) देशात...
महावितरणची अनधिकृत पथदिवे काढणी मोहीमपरभणी : मराठवाड्यातील विविध शहरे तसेच ग्रामीण...
रब्बी पीकविमा योजनेत  १२.५ लाख...पुणे ः पंतप्रधान पीकविमा योजनेत राज्यातील...
तापमानात वाढ, थंडीही कायम पुणे : राज्यात बऱ्याच ठिकाणी दिवसा स्वच्छ...
कालवे अस्तरीकरणाची कामे दर्जेदार करावीत...पुणे ः कालव्यांमधून जास्त गळती होत असलेली ठिकाणे...
जागतिक कापूस वापर वाढणार पुणे ः अमेरिकेच्या कृषी विभागाने (युएसडीए)ने...
नुकसानग्रस्तांना भरपाई मिळावी ः सुनील...नागपूर : अवकाळी पाऊस व गारपीट अशा नैसर्गिक...
संगमनेर तालुक्यात रब्बी  मोहरीचा...पुणे नगर ः उत्तर भारतातील महत्त्वाचे पीक असलेल्या...
कृषी(चं) प्रदर्शनप्रदर्शनात कंपन्यांचे प्रतिनिधी बारीवर नोटा...
खतांच्या दरात मोठी वाढ जळगाव ः  खतांच्या दरात मोठी वाढ झाली आहे....
तापमानात चढ-उतार सुरूच पुणे : राज्यात गेल्या काही दिवसांपासून थंडी, धुके...
. आशियातील सर्वांत मोठा  इथेनॉल प्रकल्प...पुणे : उसाचा रस आणि बोयोसिरपवर आधारित आशियातील...
संक्रांतीतही कोल्हापुरी  गुळाला दराचा... कोल्हापूर : देशभरात संक्रातीचा सण उत्साहात...
जागतिक सोयाबीन  उत्पादन, वापर वाढणारपुणे ः जागतिक पातळीवर यंदा सोयाबीनचे उत्पादन आणि...
मराठवाड्यात साखर उत्पादन  १ कोटी १४ लाख...औरंगाबाद : यंदाच्या ऊस गाळप हंगामात प्रत्यक्ष...
ग्राम, पर्यावरण अन शेती विकास हेच ध्येय...चांदूररेल्वे (जि. अमरावती) येथील साईबाबा ग्रामीण...