agriculture news in Marathi, agrowon, 10 thousand ,500 hundred quintals of gram Buy in nagar | Agrowon

नगरमध्ये साडेदहा हजार क्विंटल हरभरा खरेदी
टीम अॅग्रोवन
रविवार, 1 एप्रिल 2018

नगर  ः बऱ्याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर जिल्ह्यात सुरू झालेल्या दोन खरेदी केंद्रांवर दहा हजार ४५३ क्विंटल हरभऱ्याची खरेदी झाली आहे. अन्य नऊ ठिकाणी खरेदी सुरू असून, त्याचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही, असे जिल्हा मार्केटिंग फेडरेशनकडून सांगण्यात आले. 

नगर  ः बऱ्याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर जिल्ह्यात सुरू झालेल्या दोन खरेदी केंद्रांवर दहा हजार ४५३ क्विंटल हरभऱ्याची खरेदी झाली आहे. अन्य नऊ ठिकाणी खरेदी सुरू असून, त्याचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही, असे जिल्हा मार्केटिंग फेडरेशनकडून सांगण्यात आले. 

जिल्ह्यात सुमारे दीड लाख क्विंटल हरभरा खरेदी होण्याचा अंदाज आहे. जिल्ह्याच्या अनेक भागात कापसाचे पीक वाया गेले. त्यामुळे शेतकऱ्यांनी कपाशी काढून हरभरा पेरला गेला. त्यामुळे हरभऱ्याचे ८३ हजार ७९५ हेक्‍टर क्षेत्र असून, यंदा सरासरीपेक्षा जास्त म्हणजे ८५ हजार ४५३ हेक्‍टर क्षेत्रावर हरभऱ्याची पेरणी झाली. हरभऱ्याची काढणी झालेली असल्याने बाजार समितीत दर दिवसाला ३०० ते ४०० क्विंटल हरभऱ्याची आवक होत आहे. मात्र, हमीभावाच्या तुलनेत बाजार समितीत १००० ते १२०० रुपये कमी दर मिळत आहे. त्यामुळे शासकीय खरेदी केंद्र सुुरू करण्याची मागणी केली जात होती. 

जिल्हा मार्केटिंग कार्यालयाने शेतकऱ्यांच्या मागणीच्या पार्श्‍वभूमीवर चौदाही तालुक्‍यांतील बाजार समितीत हरभऱ्याची होणारी आवक, मिळणारा दर आणि लोकांची मागणी याबाबींचा विचार करून हरभरा खरेदी केंद्र सुरू करण्याची गरज असल्याबाबत नाफेडला पत्र देऊन कळवले होते. जिल्हाभरात साधारण दीड लाख क्विंटल खरेदी अपेक्षित असल्याचे त्यात नमूद केले होते. मनुष्यबळ आणि शेतकऱ्यांची अडचण समजून घेत ज्या ठिकाणी तूर खरेदी सुरू आहे, तेथेच हरभरा खरेदी केंद्र सुरू करण्याचे निश्‍चित करू जिल्हाभरातील अकरा ठिकाणी हरभरा खरेदी केंद्रे सुरू करण्याला परवानगी मिळाली.

विक्रीसाठी शेतकऱ्यांकडून ऑनलाइन नोंदणीही करून घेतली. सध्या श्रीगोंदा व जामखेड येथे खरेदी सुरू आहे. श्रीगोंद्यात १८२ शेतकऱ्यांनी १५७२ क्विटल व जामखेडला ७६३ शेतकऱ्यांनी ८८८१ क्विंटल अशी १० हजार ४५३ क्विंटल खरेदी झाली, असे जिल्हा मार्केटिंग अधिकारी भारत पाटील यांनी सांगितले. 

इतर बातम्या
रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपलेरत्नागिरी ः मुसळधार पावसाने जिल्ह्याला चांगलेच...
गोसे खुर्दमधून होणार चार हजार हेक्‍टरवर...चंद्रपूर ः धानपट्ट्यात पावसाअभावी अस्वस्थता आहे....
नाशिक जिल्ह्यात धरणांच्या तपासणीसाठी...नाशिक : जिल्ह्यातील धरणांच्या सुरक्षितेतसाठी...
पेठ तालुक्यात जमिनीतून निघताहेत...नाशिक : पेठ तालुक्यातील निरगुडे गावात दोन...
नांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून २८...नांदेड : जिल्ह्यात पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत...
पुणे, नगर जिल्ह्यात पावसाअभावी चारा...पुणे  : पावसाळ्यात जनावरांसाठी चाऱ्याची अडचण...
`स्वाभिमानी`चे नाशिक जिल्हा बॅंकेसमोर...नाशिक : जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. ती...
आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली...मुंबई   : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे...
नवती केळी दरात सुधारणाजळगाव  ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या...
रत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यातरत्नागिरी   ः जिल्ह्यात उशिरा पण...
रत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी...रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
युवा कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्य करारपुणे ः आंतरराष्ट्रीय युवा कौशल्य दिनाचे औचित्य...
नगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये...नगर  ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला...
नाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप...नाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या...
दक्षिण महाराष्ट्रात देशी बेंदूर...कोल्हापूर : वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या...
महाराष्ट्राला ‘स्किल कॅपिटल' बनवावेः...मुंबई ः महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती राजाराम...
कोकण, घाटमाथ्यावर हलक्या सरींचा अंदाज पुणे ः  उत्तर भारतामध्ये असलेल्या कमी...
तीन हजार शेतकऱ्यांच्या मूल्यांकनाचा...कोल्हापूर ः कृषी कौशल्य विकास प्रशिक्षण पूर्ण...
सांगली जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांचे...सांगली : जिल्ह्यातील एक हजारांवर द्राक्ष उत्पादक...
कर्जमाफीतील तक्रार निवारणासाठी समिती...पुणे ः छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...