...सरकारला गुडघे टेकायला लावू : राजू शेट्टी

राजू शेट्टी
राजू शेट्टी

सोलापूर : फसव्या सरकारने शेतकऱ्यांना किरकोळीत काढू नये. शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा झालाच पाहिजे आणि उत्पादन खर्चावर आधारित ५० टक्के जादा नफा मिळायलाच हवा, या मागण्यांसाठी नोव्हेंबरमध्ये जंतरमंतरवर दहा लाख शेतकऱ्यांसह आंदोलन करून सरकारला गुडघे टेकायला लावू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी दिला.

शेतकरी संघटनेची दुसऱ्या टप्प्यातील पदयात्रा १६ सप्टेंबरपासून सुरू होत असल्याचे शेट्टी यांनी सांगितले. ते मंगळवारी सोलापूर दौऱ्यावर आले होते. या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

श्री. शेट्टी म्हणाले, ‘‘मोठ्या विश्‍वासाने आम्ही सरकारला साथ दिली. पण मोठमोठी आश्‍वासने देऊन आमची फसवणूक केली. आयात-निर्यातीची चुकीची धोरणे, शेतमालाचे पडलेले बाजारभाव, पूर्वी २८ हजार कोटी रुपयांच्या शेतमालाची आयात होत होती, आज एक लाख कोटीवर गेली आहे.

पूर्वी ४२ हजार डॉलरपर्यंतचे चलन निर्यातीतून मिळत होते. आज ते ३२ हजार डॉलरवर आले आहे, हे काय आहे? ्यामुळे सरसकट सात-बारा कोरा व्हायला हवा आणि उत्पादन खर्चाच्या ५० टक्के जादा नफा द्यावा.’’

यासाठी देशभरातील १६२ संघटना एकत्र येऊन आता आंदोलन करणार असल्याचे खासदार शेट्टी म्हणाले. या वेळी त्यांनी कर्जमाफीच्या अर्जासाठीची मुदत वाढवण्याची मागणीही केली.

मंत्रीच काय, सरकारच गोंधळलेले

कर्जमाफी योजनेमध्ये दहा लाख शेतकरी बोगस आहेत, असे स्वतः महसूलमंत्री चंद्रकांत पाटील म्हणतात. मुळात सरकारला किती माहिती आहे, हाच प्रश्‍न असल्याचे खासदार राजू शेट्टी म्हणाले. तसेच ३४ हजार कोटींची कर्जमाफी म्हणतात, पण सगळे नियम, अटी, निकषांचा विचार करता अवघी ५-७ हजार कोटींची कर्जमाफी होईल, त्यातही राज्यातील शेतकऱ्यांकडे पीककर्ज किती, मध्यम कर्ज, दीर्घमुदत कर्जे किती याची साधी आकडेवारी नाही. आता मंत्री कर्जमाफीत बोगस शेतकरी असल्याचे सांगतात. मुळात मंत्रीच नाही, तर सरकारच गोंधळलेले असल्यचे श्री. शेट्टी म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com