agriculture news in marathi agrowon agralekh on bumper food grains production in india | Agrowon

विक्रमी उत्पादनाचे करा योग्य नियोजन

विजय सुकळकर
शनिवार, 27 फेब्रुवारी 2021

देशाला अन्नधान्यात स्वयंपूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांचे उत्पन्न मात्र वाढताना दिसत नाही. त्यामुळे अन्नधान्य उत्पादक आर्थिकदृष्ट्या हलाखीचे जीवन जगतोय. 
 

वर्ष २०२०-२१ च्या हंगामात देशात अन्नधान्याचे उत्पादन ३०३ दशलक्ष 
टनांवर असे विक्रमी राहण्याचा अंदाज केंद्रीय कृषिमंत्रालयाने नुकताच व्यक्त केला आहे. सोयाबीन आणि तूर वगळता भात, गहू, भरडधान्ये, कडधान्ये अशा बहुतांश पिकांच्या उत्पादनात वाढ होणार असल्याचा अंदाज आहे. मागील खरीप हंगामात देशात चांगला पाऊस झाला. त्यामुळे ही उत्पादनवाढ शक्य असल्याचे बोलले जात आहे. खरे तर कोरोना लॉकडाउन आणि अतिवृष्टी अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये देखील शेतकऱ्यांच्या अथक कष्टांच्या बळावर उत्पादनवाढ होत असेल तर ही बाब स्वागतार्हच आहे. अन्नधान्याच्या एकूण उत्पादनात ७६ टक्क्यांहून अधिक वाटा हा भात आणि गहू या दोन पिकांचा आहे. या अन्नधान्यामध्ये आपण स्वयंपूर्ण आहोत. गहू, भाताचे उत्पादन वाढत असताना डाळी (कडधान्ये) आणि खाद्यतेलात (तेलबिया पिके) आपल्याला अजूनही स्वयंपूर्णता लाभलेली नाही. अशावेळी भात, गहू उत्पादक राज्यांमध्ये कडधान्ये, तेलबिया पिकांबरोबर फळे-भाजीपाला पिकांचे क्षेत्र आणि पर्यायाने उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न व्हायला पाहिजेत. कृषी विभागाने याबाबत सविस्तर आढावा घेऊन शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन केले तर हे शक्य आहे. 

दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे देशात अन्नधान्य उत्पादन वाढत असताना त्यांची खरेदी, साठवणूक आणि ते अन्नधान्ये (खासकरून भात आणि गहू) योग्य पद्धतीने खऱ्या गरजूपर्यंत पोहोचविण्याची सक्षम यंत्रणा मात्र उभी राहिलेली नाही. त्यामुळे सरकारने खरेदी केलेले हे धान्य साठवणुकीच्या सोयीअभावी उघड्यावर पडून असते. उघड्यावरील हे धान्य दरवर्षी भिजून, सडून मोठ्या प्रमाणात वाया जाते. हा या देशातील शेतकऱ्यांच्या कष्टाचा अपमान आहे. ३० टक्के धान्य साठवणुकीअभावी वाया जात असलेल्या देशात दररोज ३० ते ४० कोटी लोकांना पुरेसे अन्न मिळत नसल्याने उपाशीपोटी झोपावे लागते. हे धान्य पुरवठा क्षेत्रातील शासकीय-प्रशासकीय यंत्रणेचे अपयश आहे. यावर सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढून देखील या दिशेने फारसे काम होताना दिसत नाही. देशात धान्य खरेदी, साठवणूक, मूल्यवर्धन यांच्या पुरेशा सोयीसुविधा नसल्याने शेतकऱ्यांना देखील कष्टाने पिकविलेल्या धान्याचे उचित दाम मिळत नाही. अनेक ठिकाणी अन्नधान्यास हमीभावदेखील दिला जात नाही. अन्नधान्यात देशाला स्वयंपूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांचे उत्पन्न मात्र वाढताना दिसत नाही. त्यामुळे अन्नधान्य उत्पादक शेतकरी आर्थिकदृष्ट्या हलाखीचे जीवन जगतोय, हेही लक्षात घ्यायला हवे.

देशात अन्नधान्याचे विक्रमी उत्पादन होत असताना खरेदीची सक्षम यंत्रणा उभी करायला हवी. अन्नधान्याची खरेदी हमीभावापेक्षा कमी दरात होता कामा नये. अन्नधान्य साठवणूक क्षमताही देशात वाढवावी लागणार आहे. याकरिता एफसीआय तसेच राज्यस्तरीय शासन वखारी यांचा विस्तार केला पाहिजेत. त्यात साठवणूक, प्राथमिक प्रक्रियेबाबतच्या अत्याधुनिक सोयीसुविधा असायला हव्यात. उत्पादित अन्नधान्याचा स्थानिक तसेच देशांतर्गत बाजारपेठेत सुरळीत पुरवठा होईल, हे देखील पाहायला हवे. महत्त्वाचे म्हणजे स्वस्त धान्य पुरवठा योजनेतील त्रुटी, गैरप्रकार दूर व्हायला हवेत. आपल्या गरजेपेक्षा अधिकचे धान्य हे निर्यात होईल, याची काळजी संबंधित राज्य शासनाबरोबर केंद्र शासनाने सुद्धा घ्यायला हवी. फळे-फुले-भाजीपाल्याबरोबरच अन्नधान्याची निर्यात देखील देशातून वाढली पाहिजेत. असे झाले तरच अन्नधान्याच्या बाबतीत समृद्ध देशातील शेतकरी देखील आर्थिकदृष्ट्या संपन्न असणार आहे.


इतर संपादकीय
श्रीलंकेचा आदर्श आपण कधी घेणार?श्रीलंका सरकारने पाम तेलाच्या आयातीवर बंदी घातली...
महाराष्ट्रातील मधुक्रांतीची दिशामार्च महिन्यामध्ये ‘मन की बात’मध्ये...
बाजारपेठेचा सन्मान करूयागोरगरिबांना स्वस्तात धान्य उपलब्ध करून...
सालगडी पाहिजेत!काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक जाहिरात फिरत...
आर्थिक प्रश्नचिन्हे कायमचआर्थिक वर्ष २०२१-२२ सुरू झाले आहे. २०२०-२१ हे...
हंगाम गोड, पण साखर कडूचखरे तर २०२०-२१ च्या गळीत हंगामापुढे अनेक आव्हाने...
पुन्हा कोरोना, पुन्हा लॉकडाउनकोरोना संकटाशी दोन हात करण्यासाठी महाराष्ट्रासह...
अस्तित्व टिकविण्यासाठीचा जागतिक संघर्षभारतातच नाही तर इतर अनेक देशांतही शेतकरी आपल्या...
आता पाया करा मजबूतराज्य-राष्ट्राचा कारभार असो की एखाद्या संस्थेचा,...
तंत्र शून्य मशागतीचे, अनंत फायद्याचेसन २०१० च्या दशकातील शेती व्यवसायात जमिनीतील...
दूरचे महासागर आणि आपले हवामानभारतीय शेती मोठ्या प्रमाणात हवामानावर अवलंबून आहे...
कारभारवाडीचा आदर्शलहानमोठ्या धरण लाभक्षेत्रातील तसेच नदी काठच्या...
मूळ प्रश्‍नाला सोईस्कर बगल !जागतिक भूक निर्देशांकातील आकडेवारीनुसार १०७...
संकट अस्मानी आणि सुलतानीहीयावर्षाच्या खरीप, रब्बी आणि उन्हाळी या तिन्ही...
ही कसली सहवेदना!यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाणच्या साहेबराव करपे या...
ग्रामविकासाचं घोडं, नेमकं कुठं अडलंमहात्मा गांधी तसेच संत गाडगेबाबा तुकडोजी महाराज...
दिलासा कमी फरफटच अधिक ‘‘माझ्या आईवडिलांच्या नावे असलेल्या शेतातील...
यशवंत कीर्तिवंत...महाराष्ट्र राज्याचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण हे...
करकपातीतूनच होतील इंधनदर कमी अनेक शहरांत पेट्रोल दराने शंभरी, तर डिझेलने...
अवास्तव अंदाज उत्पादकांच्या मुळावरवर्ष २०१९-२० चा कापूस हंगाम महापूर आणि कोरोनाच्या...